शहरातील अस्वच्छतेविरुद्ध नगर पालिकेसमोर,जे.जे.फाऊंडेशन आंदोलन छेडणार !.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -  शहरातील अस्वच्छता दुर होऊन स्वच्छता निर्माण व्हावी याउद्देशाने श्रीरामपूर नगर परिषदेमार्फत श्रीरामपूर शहरातील भुयारी गटारीचे नियोजन करून शहरात विविध ठिकाणी भुयारी गटारींची कामे करण्यात आली,

मात्र सदरील कामे ही अर्धवट आणि अपूर्ण असल्याचे दिसून येते आहे, यामुळे शहरातील नागरीकांचा त्रास वाचण्याऐवजी वाढला असून याची प्रचंड चिड सध्या शहरातील नागरीकांमध्ये बघावयास मिळत आहे,

कारण या भुयारी गटारींचे अर्धवट झालेल्या कामांचा सर्वसामान्य नागरीकांना काहीही लाभ होत नाही, याउलट जास्तच मनस्ताप आणि त्रास वाढला आहे, सदरील भुयारी गटारीत कोणीही आपापल्या स्वतःच्या घरातील ड्रेनेज /बाथरुम घाण पाण्याचे कनेक्शन जोडून मोकळा होत आहे, व त्याचा त्रास इतरांना होत आहे, तसेच श्रीरामपूर शहरातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यालगतच्या गटारी देखील नेहमीच तुंबलेल्या दिसून येतात,त्यांची वेळोवेळी नित्य नियमाने योग्य साफसफाई होत नाही, शहरातील बहुतांश रस्त्यावरुन खळखळून हे दुर्गंधीयुक्त गटारीचे घाण पाणी वाहत असते, तथा वेळोवेळी कचरा उचलणारी घंटागाडी देखील येत नसल्यामुळे रस्त्यावर नेहमीच कचऱ्याचे ढीगारे बघावयास मिळतात,त्याचा सर्वच नागरिकांना मोठा त्रास होत होत असून या कमालीच्या अस्वच्छतेमुळे भविष्यकाळात शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची शक्यता ही नाकारता येऊच शकत नाही,

कधीतरी महिन्यातून एखादेवेळी  सदरील कचरा घंटागाडी येते, फक्त त्यावेळीच कचरा कुंड्या साफ दिसतात,मात्र दुसर्यादिवशी  पुन्हा त्या कचऱ्याने ओसांडून वाहताना दिसून येतात, याबाबत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते तथा दक्ष नागरीकांनी अनेकवेळा श्रीरामपूर नगर परिषदेच्या कार्यालयात समक्ष भेटून, तथा तोंडी व लेखी समस्या मांडूनही सदरीलबाबी रस्त्यावरील कचऱ्याची तसेच तुंबलेल्या गटारीची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन स्वच्छतेबाबत कुठलीही सुधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे,

याकरीता मा.मुख्याधिकारी

 साहेबांनी जे.जे.फाऊंडेशनच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन नागरीकांना त्रासापासून मुक्त करावे  तथा प्रथम भुयारी गटारीच्या नियोजनाचे काय झाले याचा खुलासा करावा आणि याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, तसेच शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने सदरील प्रकरणी नियमितपणे कमीतकमी दिवसांततरी गटारी साफ करण्यात याव्यात,तथा कचरा उचलणारी घंटागाडी ही दैनंदिन पाठविण्यात यावी, याबाबत आपण मा.मुख्याधिकारी साहेबांनी स्वत: जातीने लक्ष घालावे अन्यथा या गंभीर प्रकरणी याविरोधात जे.जे. फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आपल्या मित्र परिवारासह लोकशाही मार्गाने श्रीरामपूर नगर परिषद कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनासह अमरण उपोषणाचा मार्ग स्विकारणार आहेत तथा यापासून निर्माण झालेल्या बर्या वा वाईट परिणामास संबंधित श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनच जबाबदार राहील असेही शेवटी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे,सदरील निवेदन हे मा.मुख्यधिकार्यासह मा.नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,आमदार, खासदार आणि सर्व प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या या निवेदनावर जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोएफ जमादार,असिफ तंबोली, अय्युब पठान, अल्तमश शेख, दानिश पठान,जकरिया सैय्यद, अरबाज कुरैशी, मुबसशीर पठान, शाहिद शेख, शकील शेख, गुड्डू जमादार, अनवर तंबोली, मोसीन कुरैशी,नईम बागवान, शादाब पठान,फरहान शेख,आदींच्या स्वाक्षर्या आहेत.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget