राहुरी (प्रतिनिधी )- संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकरी देविदास देसाई यांची विज मोटार चोरीस गेली असुन त्यांच्या तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशनला भांद वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या परिसरात शेतकर्यांच्या विज मोटारी चोरुन चार - दोन हजारात भंगारात विकणारी मोठी टोळी कार्यरत असुन पोलीसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील विहीरीतील पाणबुडी तसेच नदी काठावरील पाणबुडी चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असुन चोरलेली विज मोटार चार - दोन हजारात भंगारात विकली जात असुन विज मोटार चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत चोरीचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी आता तक्रर देण्याचेच टाळत आहे नदीवर टाकलेली विज मोटार व केबल चोरणारी टोळीच या परिसरात वावरत असुन पोलीसांनी विज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारे या दोघावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे भंगार व्यवसाय करणाराकडे साठा रजिस्टर असणे गरजेचे असताना एकाही भंगार व्यवसायीकाकडे तशी नोंद वही आढळत नसुन अनेक ठिकाणी चोरीचे सामान खरेदी केले जात आहे संक्रापुर येथील अनेकांच्या विज मोटारी अद्याप पर्यत चोरीस गेलेल्या आहेत काहींनी तक्रारी दिल्या परंतु त्याचा पुढे काहीच तपास न झाल्यामुळे आता शेतकरीही चोरी होवुनही गप्प बसत आहे संक्रापुर येथील शेतकरी देविदास देसाई यांनी राहुरी पोलीसाकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे संक्रापुर येथील शेतातील विहीरीतुन २७जानेवारी ते २८ जानेवारी रात्री १ ते सहा वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी विहीरीतील पाच हाँर्स पाँवरची पानबुडी तसेच १२५ फुट केबलची चोरी करुन अंदाजे आठ हजार रुपयाचे नुकसान केले आहे या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगाव पोलीस पुढील तपास करत आहे विज मोटार चोरांचा व चोरीच्या मोटारी विकत घेणार्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली असुन या बाबत लवकरच एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून निवेदन देणार आहे.
Post a Comment