January 2020

बुलडाणा - 31 जानेवारी
वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूराच्या लहान मुलाचा अपघाती निधन झाल्याची घटना काल 30 जानेवरीला दुपारी घडली आहे. अंगावरून रिक्षा गेल्याने बालकाचा उपचारा पूर्वीच दुर्दैवी निधन झाला.
     बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात अनेक भागात वीट भट्टया आहे.आपला व आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह साठी अनेक मजूर आपल्या परिवारा सह वीट भट्टयावरच राहतात.राजुर गावा जवळ एका वीट भट्टीवर पुन्हई या गावातील किसन शिंदे काम करतो व त्याचा परिवार ही याच भट्टीवर राहतो.30 जानेवारीला दुपारी किसन शिंदेचा 6 वर्षीय मुलगा सुधीर हा माती वाहून नेणाऱ्या रिक्षात बसला होता व तोल जाऊन तो खाली पडला व रिक्षा त्याच्या अंगावरुन गेला,त्याला तात्काळ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आनले पन डॉक्टरने त्याला मृत्यु घोषित केले. या प्रकरणी बुलडाणा शहर ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.मोताळा तालुक्यात शासकीय नियमानना धाब्यावर बसवून सर्रास वीट भट्टे सुरु आहे आहे.तहसीलदार व खनिकर्म विभागाने या कडे लक्ष देने गरजेचे आहे.

बुलडाणा - 31 जानेवारी
वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.एका ठिकाणी रानडुक्करचे मांस असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वन विभागाच्या पथकाने धाड टाकून 2 लोकांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून रानडुक्करचे मांस जप्त करण्यात आले आहे तर हे पथक कार्यवाही करत असतांना इतर 2 लोकांनी वन पथकाला लोटपाट करीत शिविगाळ केल्याची घटना आज 31 जानेवारीला ग्राम मोहेगांव येथे घडली आहे.
     मोताळा तालुक्यातील मोहेगांव येथील काही लोक रानडुक्करची शिकार करुण त्याचा मांस विकतात अशी गुप्त माहिती मिळाल्याने संजय एन.माळी उपवनसंरक्षक बुलडाणा, रंजित गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक, (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात आर.बी.कोंडावार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मोताळा, यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह 31 जानेवारीला मोहेगाव येथील अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंद पवार यांच्या राहत्याघरुन धाड टाकली असता घरातून वन्यप्राणी रानडुक्करचे मास आढळुन आले. सदर मास जप्त केलेले असुन आरोपी नामे अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंदु पवार दोन्ही रा.मोहेगाव यांच्या विरोधात  वन्यजिव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,43,44,48,49,50,51
अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.दोन्ही आरोपींना मा.न्यायालय, मोताळा समक्ष हजर केले असता दि. 3 फेब्रूवारी पर्यंत वनकोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास व्ही.डी. सानप, राजुर वर्तुळ अधिकारी करत आहेत. सदर कार्यवाहीत धनंजय पोटे, व्ही. डी. सानप, पी. पी. मुंढे,ए. एन. सपकाळ,एस. पी. कुशोड,एस. के. घुगे, अहीरे, संतोष जाधव व वाहन चालक यांचा समावेश होता. 

*शासकीय कामात अडथळा*

मोहेगांवात वन विभाग सदर कार्यवाही करीत असतांना संजय शंकर जाधव व सागर संतोष राठोड यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आरेरावी व शिवीगाळ करीत लोटपोट केली व शासकीय कामात अडथळा आनला म्हणुन या दोघांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन बोराखेडी येथे शासकिय कामी अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

शिरसगाव येथील कनोसा हॉस्टेल येथे नुकतेच सी.ए. ए, एन.आर. सी.व एन.पी.आर या केंद्र सरकारच्या जाचक नागरिकत्व सुधार कायद्याच्या अनुषंगाने महिलांमध्ये जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऍड.समीन बागवान यांनी उपस्थित महिलांना देशात नागरिकत्व सुधार कायदा अस्तित्वात आल्यानंतर आता पुढे राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर, राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर देशातील सर्व अल्पसंख्याक समुदायकरिता अन्याय कारक असल्याने त्याचा सर्वांनी तीव्र विरोध करावा असे आवाहन केले,यावेळी बोलताना ऍड बागवान यांनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने ख्रिस्ती समाज धर्मियांच्या असणाऱ्या अमुल्य योगदानाबद्दल विस्तृत विवेचन केले.तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.सर्वत्र अराजकता माजली आहे,या देशाचे मूलतः असणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहे कारण या कायद्याचे स्वरूप अत्यन्त गुंतागुंतीचे व जाचक अटींचे असणार आहे,याकरीता या कायद्याला कडाडून विरोध करून हा कायदा रद्द करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल संविधानाचे रक्षण करावे लागेल, कारण भारताला फक्त संविधान च वाचवू शकते.
यावेळी उपस्थित असंख्य महिलांनी सदर अन्याय कारक कायद्या विरुद्ध लढा उभा करण्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोयोला धर्मग्रामचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड, कनोसा हॉस्टेल च्या सुपिरिअर सिस्टर पाकुळी,रवी त्रिभुवन सर,धर्मभगिनी सि. मार्टिना,सि. ग्रेसी,सि. प्रेसिला, सि. रोड्रीग्स,श्री.खंडागळे गुरुजी व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन व परिचय रवी त्रिभुवन सर यांनी करून आपल्या सुमधुर वाणीत कवी वामन दादा कर्डक यांचे "माणसा इथे मी तुझे गीत गावे" हे गीत गायले.

गळनिंब येथे बिबट्याच्या हल्यात मृत्यू
गळनिंब (प्रतिनिधी)घराच्या पोर्च मध्ये कु.ज्ञानेश्वरी नामदेव मारकड(वय ३ वर्षे)आजी बरोबर ७:३०वा.खेळत असताना बिबट्याने आजीच्या हाताला हिसका देवून झडप घातली व शंभर दिडशे फुट उसात नेत आरडा ओरड होत लोक जमा झाल्यानंतर जखमी अवस्थेत तिला प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथील अति दक्षता विभागात  उपचारा दरम्यान प्राणज्योत मावळली.
   गळनिंब येथील नामदेव भाऊसाहेब मारकड यांची ३ वर्षाची मुलगी बंगल्याच्या पोर्च मध्ये आपल्या आजी बरोबर खेळत असताना बिबट्याने झडप घालून शेजारील उसाच्या उसाच्या शेतात नेले नागरीकांनी आरडा ओरड करुन उसात मुलीचा शोध घेतला जखमी अवस्थेत असलेल्या मुलीस तातडीने लोणी येथील  प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात  दाखल केले तिच्या मानेवर खोल जखम झालेली होती नुकत्याच आलेल्या माहीती नुसार उपचार चालु असताना तिची प्राणज्योत मावळली  मागे काही महीन्यापूर्वी गणपतीची आरती आटोपुन येत असलेल्या मुलास आजीच्या हातातुन दर्शन चंद्रकांत देठे यास  बिबट्याने ओढुन नेल्याची घटना लोक विसरलेले नसतानाच आजची ही ताजी घटना घडली या घटनेमुळे नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले आहे


बुलडाणा - 31 जानेवारी
चिखली तालुक्यातील गोद्री येथील मूळचे रहिवासी व हल्ली  चिखली येथील संभाजीनगर भागात वास्तव्यात असलेल्या बीएसएफ जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 31 जानेवारी रोजी घडली.
        यासंदर्भात दीपक देशमुख यांनी चिखली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की अंकुश अशोक देशमुख वय 35 वर्ष हा बीएसएफ मध्ये नोकरीला असून एक महिन्याची सुट्टी घेऊन घरी आलेला होता. दिनांक 28 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शहरातील स.द. म्हस्के मार्गावरून अंकुश हा आपला मुलगा देवेंद्र याच्यासह प्लेजर गाडीने येत असतांना समोरून येणाऱ्या गौतम इंगळे रा.चांधई यांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून अंकुश यांच्या दुचाकीस समोरासमोर जबर धडक दिली. यामध्ये अंकुश व त्याचा मुलगा देवेंद्र याला मार लागला, त्यांना स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र अंकुश यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्याचे सांगितले. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच तो कोमात गेला अश्या फिर्याद मृतकाचा भाऊ दिपक देशमुख यांनी दिनांक 30 जानेवारी रोजी चिखली पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादी वरून चिखली पोलिसांनी भांदवी कलम 279, 337 व मोटर वाहन अधिनियम 134 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आज दिनांक 31 जानेवारी रोजी उपचारादरम्यान जवान अंकुश देशमुख याचे दुर्दैवी मृत्यु झाले.ही माहिती शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.

गळनिंब (प्रतिनिधी)श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब ग्रामपंचायत सदस्यांची मासिकमिटींगचा अजेंठा देवूनही एकही सदस्य,ग्रामसेवक मासिक मिटींगकडे फिरकला नाही.तसेच प्रजाकसत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचा विसर देखील पदाधिकारी,ग्रामसेवक यांना पडला.
  गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु म्हणजे ग्रामसभा असल्याने या सभेला अनन्यसाधारण महत्व असते.विविध कामांच्या आराखड्याची व शासनाच्या अनेक योजनांचा या ग्रामसभेत ठरावाच्या रूपाने कागदपत्रांची आवश्यकता असते गावातील विविध समस्यांचा प्रश्न समस्या मांडण्याचे व्यासपीठ असते. परंतु याच ग्रामसभेबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी अभियज्ञ असल्याचे समोर आले आहे.याबाबत गावातील सुज्ञ नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विषेश म्हणजे येथील ग्रामसेवकांना दोन गावांचा पदभार असल्याने दोन्ही गावांच्या ग्रामसभेची वेळ एकच असल्याने ग्रामसभेस सचिव म्हणून जि.प. शाळेच्या मुख्यध्यापिका यांनी चार्ज घेण्यास नकार दिला असल्याने प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होवू शकली नाही.
 गावाच्या प्रश्नावर जर पदाधिकारीच गंभीर नसतील तर विकास कसा होणार आणि कोण करणार यावेळी अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाबतीत अनेक समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली.  प्रजाकसत्ताक दिनी न झालेली ग्रामसभा लवकरात लवकर घ्यावी असे मतही यावेळी व्यक्त केले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात श्रीरामपूर बंद
एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए 
या संविधानविरोधी कायद्याचा विरोध आज श्रीरामपूर बंद करून करण्यात आला.
बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने या कायद्याच्या विरोधात भारत बंद चे आवाहन केले होते.
श्रीरामपूर मधील सर्व नागरिक व व्यापारी यांनी आपापली दुकाने बंद करून बंद पाळला.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे या कायद्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली,यावेळी  एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए हे कायदे रद्द करून डी. एन.ए तपासणी करून एन.आर.सी लागू करावी हि मागणी करण्यात आली व निवडणुकीत इ.व्ही.एम मशीन बंद करण्यात यावे,ओबीसींची जातवार जनगणना करण्यात यावी याही मागण्या या वेळी करण्यात आल्या निषेध सभेत 
एस के चौदांते (संयोजक बहुजन क्रांती मोर्चा)
तुषार पारखे (संयोजक श्रीरामपूर शहर)
मुश्ताक तांबोळी (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा)
अहमद जहागीरदार(संविधान बचाव समिती)दिलीप त्रिभुवन,सुनील मगर(बी एस पी),अँथोनी शेळके(आर.पी.आय)
शिवाजी गांगुर्डे( राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना)
डॉ सलीम शेख
अमारप्रीत सिंग( शीख समुदाय)
अशोक बागुल (रिपब्लिकन नेते)
मुख्तार शहा(नगरसेवक)
सुधाकर भोसले(राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा)
दिलीप बडधे(राष्ट्रीय ओबीसी मोर्चा)
जोएफ जामदार( जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी)
साजिद मिर्झा(एम आय एम)दीपक कदम(अल्पसंख्यांक ख्रिस्ती संघटना)
फिरोज पठाण(जिल्हाध्यक्ष भीम आर्मी)
भगवान रोकडे(भीम आर्मी)
सुभाष तोरणे(ख्रिश्चन संघटना)
मास्टर सरवरअली
रज्जाकभाई शेख (भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष)
पोपट ढोकने,शब्बीर पठाण,रामदास रोकडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.वरील मागण्यासाठी बंद मध्ये भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,संविधान बचाव समिती,शीख समाज संघटना,एकलव्य भिल्ल समाज संघटना,विविध रिपब्लिकन गट,बी एस पी,समाजवादी पक्ष,एम आई एम,भीम आर्मी,ख्रिश्चन संघटना आदी संघटना सक्रिय सहभागी झाल्या होत्या.

नाशिक | प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या मेशी गावानजीक काल (दि.२८) सायंकाळी चारच्या सुमारास बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून अजूनही एका बेपत्ता मुलाचा शोध एनडीआरएफच्या टीमकडून केला जात आहे.देवळा तालुक्यातील मेशी फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली होती.  अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने अधिक जीवितहानी झाली. बसने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचा चक्काचूर होऊन रिक्षा विहिरीत कोसळली.या अपघातात २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती.विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. अंधार पडल्यामुळे आणि विहिरीत १५ ते २० फुट पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मध्यरात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
आज सकाळपासून पुन्हा एनडीआरएफकडून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. रात्री २३ मृतदेह हाती आल्यानंतर आज सकाळी पुन्हा एक मृतदेह मिळून आला. तसेच अजून एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तर जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. तर गंभीर जखमी प्रवाशांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तर बसही रीक्षापाठोपाठ विहिरीचा कठडा तोडून विहिरीत पडली. त्यामुळे बसमधील प्रवाशी अधिक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मृतांची ओळख पटवून शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दिलीप शिशुपाल पवार (स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक) 
अहमदनगर - प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी (दि.26) अहमदनगर पोलीस मुख्यालयातील सकाळी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड आणि चांगली प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल मंदार मल्लिकार्जुन जवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग), दिलीप शिशुपाल पवार (स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक) यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदी उपस्थित होते.अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये याप्रमाणे
श्रीहरी रामचंद्र बहीरट(पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे) 
श्रीहरी रामचंद्र बहीरट (पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे), अरुण भागीरथ परदेशी (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे), दौलतराव शिवराम जाधव (पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा पोलीस ठाणे), संदीप भगवान पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा), पवन शंकर सुपनर (पोलीस उप निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे, अ.नगर), पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे (स्थानिक गुन्हे शाखा),पोलीस नाईक रवींद्र आबासाहेब कर्डिले (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस नाईक संदीप कचरु पवार (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस हेड कॉन्स्टेबल जालिंदर काशिनाथ लोंढे (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुभाष जाधव (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश मनोहर गोसावी (सायबर पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल अभिजित दत्तात्रय आरकल (सायबर पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरसय्या गुंडू (सायबर पोलीस ठाणे), पोलीस नाईक संदीप विक्रम चव्हाण (एमआयडीसी पोलीस ठाणे), पोलीस नाईक विजय विठ्ठल नवले (एमआयडीसी, पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल रशिद बादशहा शेख (राहता, पोलीस ठाणे), पोलीस कॉन्स्टेबल अजित अशोक पटारे (राहाता, पोलीस ठाणे), संतोष ज्ञानेश्वर बोळगे (श्रीगोंदा) आदींचा सन्मान करण्यात आला.

अहमदनगर (प्रतिनिधी)  नेवासा तालुक्यातील पानेगाव-खेडले रस्त्यावर रस्ता विचारण्याच्या बहाण्याने डोळ्यात मिरची पूड टाकून निखील आंबिलवादे या सराफ व्यावसायिकाकडील 7 लाख 90 हजार 778 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ‘लुटी’ ची सुपारी चक्क कोल्हारमधील सराफ विजय उर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर यानेच दिली होती. त्यासाठी त्याने श्रीरामपूरच्या ‘लुटारू’ गँगला हाताशी धरून या कृत्याला अंजाम दिला. यातील चौघांना गजाआड करण्यात आले असून अन्य संबंधित सराफासह पाचजण पसार झालेत. त्यांचा एलसीबीचे पोलीस कसून शोध घेत आहेत.श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे हा लुटेरे टोळीचा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या लुटीत एका महिलेचाही सहभाग आहे.निखिल बाळासाहेब आंबिलवादे (रा. खेडले परमानंद, ता.नेवासा) हे त्यांचे मांजरीतील गुरूकृपा ज्वेलर्स दुकानातील 7 लाख 90 हजार रूपयांचे सोन्याचे, चांदीचे दागिने घेऊन पानेगाव ते खेडले परमानंद रोडने पानेगाव शिवारातून जात असताना मोटारसायकलवरील तिघांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील दागिन्यांची बॅग चोरून नेली. ही घटना 21 जानेवारीला सायंकाळी 5.15 वाजता घडली. याबाबत सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरविली. अशातच पो. नि. दिलीप पवार यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा टाकळीभान येथील निखील शशिकांत रणनवरे व त्याच्या सहकार्‍यांनी केला असल्याची माहिती कळाली. त्यानंतर पवार यांनी आपल्या सहकार्‍यांमार्फत टाकळीभानचा निखील रणनवरे (वय 21),श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधील सोहेल जुबेर शेख (21) श्रीरामपूरच्या वॉर्ड नं. 1, फातेमा हाऊसिंगमधीलच आवेज उर्फ बाबा जुबेर शेख (23), आणि नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता निखील रणनवरे याने कबुली दिल.निखील रणनवरेसह बेलापुरातील चाँदनगरचा शाहरूख सांडू सय्यद, टाकळीभानचे मतीन पठाण, सोहेल जुबेर शेख, आवेज उर्फ बाबा जुबेर शेख, गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भिमराव रणनवरे, निखील रणनवरेचा जोडीदार शहारूख सय्यद (रा. श्रीरामपूर) याची माहिला नातेवाईक आलिशा आजीज शेख हिची देडगावकराशी ओळख आहे. या महिलेच्या माध्यमातून कोल्हारचा सराफ विजय देडगावकराच्या घरी सर्वजण जमले. तेथे खेडले परमानंद येथील आंबिलवादे या सराफाचे मांजरी येथे श्रीगुरूकृपा नावाचे सराफी दुकान आहे. रात्री तो दुकानातील सोने बॅगमध्ये भरून मोटारसायकलने घरी जातो. रस्त्यात अडवून त्याला मारहाण करा, सोने लुटा, त्याचा मोबादला देऊ असा कट देडगावकरच्या घरात शिजला. त्यानंतर लूट करण्यासाठी या टोळीने नियोजन केले.त्यानुसार 21 तारखेला दुपारी शाहरूख सय्यद, गौरव अवसरमल, प्रकाश रणनवरे हे युनिकॉर्न मोटारसायकलवर होते. त्यानंतर आंबिलवादे यांच्या दुकानाजवळ पाहणी करण्यासाठी सोहेल शेखला सोडले. निखील रणनवरेसह अन्य आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. सोनार निखील आंबिलवादे यांनी दुकान बंद करताच, तेथे असलेल्या साहेलने रणनवरेला इशारा केला. लगेचच रणनवरेने स्वतःच्या मोबाईलवरून सोनार पांढर्‍या रंगाच्या मोपेड मोटारसायकलवर बॅग घेऊन निघाल्याची माहिती दिली. व या सोनाराचा पानेगाव चौकापर्यंत पाठलाग केला. व युनिकॉर्न मोटारसायकवर असणार्‍या शाहरूख, गौरव आणि प्रकाश यांनी आंबिलवादे यांना रस्ता विचारण्याचा बहाणा करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली आणि सोने-चांदीची दागिने असलेली बॅग लांबविली.लुटीनंतर टाकळीभान मार्गे ही टोळी श्रीरामपूरातील संजयनगरमधील अलिशा शेख हिच्या घरात एकत्र आली. तिने देडगावकराला फोन करून मोहीम फत्ते झाल्याची माहिती दिली. त्यावर देडगावकराने सोने घेऊन कोल्हारला येण्याचे सांगितले. शाहरूख सय्यद, निखिल रणनवरे, प्रकाश रणनवरे व अलिशा शेख नॅनो कारने कोल्हारला देडगावकरच्या घरी पोहचले. लुटलेल्या सोन्याचे 5 लाख वीस हजार रुपये देईल असे सांगत देडगावकराने काही पैसे दिले बाकीचे तीन दिवसांत देण्याचे ठरले असल्याची कबुली निखील रणनवरे याने पोलिसांना दिली.  अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेण्याचे आदेश देण्यात आले.लुटणारी गँग..निखील शशिकांत रणनवरे (रा. टाकळीभान), सोहेल जुबेर शेख, आवेज ऊर्फ बाबा जुबेर शेख (दोघेही रा. वॉर्ड नं. 1, फातेमा सोसायटी, श्रीरामपूर) आणि मतीन गुलाब पठाण (रा. बेलपिंपळगाव, ता.नेवासा) या चौघांना अटक.शाहरूख सांडू सय्यद (रा. बेलापूर), गौरव बारकू अवसरमल, प्रकाश उर्फ भावड्या भीमराव रणनवरे (रा. टाकळीभान), आलिशा अजीज शेख (संजयनगर,श्रीरामपूर) आणि विजय ऊर्फ बब्बू रामकृष्ण देडगावकर (कोल्हार)हे सगळे पसार आहे. 

शिरसगाव[वार्ताहर]हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अद्याप सुरु झाले नाही शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहेत.तेथे विविध पदाधिकारी,आमदार लहू कानडे,सार्वजनिक बांधकाम विभाग उजागरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक विधाते,श्रीरामपूर उपनगराध्यक्ष करण ससाणे,सभापती सचिन गुजर,मुन्ना पठाण सरपंच अस्मिता नवगिरे,अनिता भालेराव,सीताबाई गायकवाड,कोमल जाधव,सुर्यकांत चाबुकस्वार,रसूल पठाण,प्रा.किरण खाजेकर,डॉ,नंदकुमार वाघमारे,दिलीप त्रिभुवन चेतन त्रिभुवन,सुनील शिणगारे, भीमराज बागुल,जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी आदींनी उपोषणार्थी यांची भेट घेतली.पण हरिगाव ग्रामविकास अधिकारी मात्र ४ दिवसात फिरकले नाहीत.पालकमंत्री ना.मुश्रीफ यांना २५ जाने.ला शिष्टमंडळ भेटले उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली..त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.प्रा.किरण खाजेकर यांच्या नेतृत्वाखाली हरिगाव शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.त्यांचे समवेत दिलीप त्रिभुवन,सुनील शिणगारे,डॉ नंदकुमार वाघमारे,चेडे,चंद्रकांत खरात दीपक नवगिरे,रमेश भालेराव,रसूल पठाण,,अशोक  खरात,अमोल वाहूळ,विनायक वाघमारे,सुनील रूपटक्के,सचिन बोधककळू बावस्कर,हरीश मढीकर,अनिल लिहिणार,सुनील पवार,महेबूब शेख,,संदीप लोखंडे आदी होते.तेंव्हा सकारात्मक चर्चा झाली व हा प्रश्न सकारात्मक सोडविला जाईल असे निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.तसेच दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी सरपंच ग्रामस्थ हरिगाव,यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.बंद शांततेत पाळला.संध्यकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार महसूल निखारे,यांनी लेखी पत्र तातडीने नगररचना कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सूचना दिल्याचे प्रत दिल्याने तीन उपोषणार्थी यांचे आमरण उपोषण संध्यकाळी तहसीलदार नगर गिरीश वाखारे,यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले.त्यावेळी नेमाणे गृह विभाग,ठोंबरे,प्रा.किरण खाजेकर उपस्थित होते.

सातारा : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल खटल्यात सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवलं आहे.
उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांवर सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण केल्याचा आणि 24 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर राजकुमार जैन यांनी 23 मार्च 2017 रोजी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणात मध्यंतरीच्या काळात उदयनराजेंच्या अडचणी वाढल्याचंही बोललं गेलं. मात्र, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने यावर निकाल सुनावत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोना अलायन्स नावाची लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. उदयनराजे भोसलेंनी 18 फेब्रुवारी रोजी कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी केली आणि बेदम मारहाण केली, असा आरोप जैन यांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस तक्रारही दिली. या तक्रारीनुसार उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उदयनराजेंसह 9 जणांना 2017 मध्ये अटकही झाली होती.
उदयनराजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या.

कोल्हार ( साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
शिवशाही बस व ईरटीका कारच्या धडकेत सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना कोल्हार येथील पुलानजीक दुपारी साडे तीनच्या दरम्यान घडली
याबाबत सविस्तर असे की कोपरगाव पुणे ही शिवशाही बस क्रमांक mh 14 GD 8440दुपारी कोल्हारहून  पुण्याकडे जात असताना विरुद्ध दिशेने  शनिशिंगणापूर हुन शिर्डी कडे जाणाऱ्या ईरटीका कार नंबर एम एच 17 , 5150 नंबरच्या कारची  पुलानजीक धडक होऊन ईरटीका कार मधील अपर्णा अनिल लामा( वय 20 )पार्वती चंद्रप्रकाश लामा( वय 64) पूनम अनिल लामा( वय 42) कांची देढू डुबका (वय 65 )नारिम उदय  डुबका (वय 50) सर्व (राहणार दार्जिलिंग ) व ईरटीका कार चालक निखिल संजय अत्रे (वय  23) (राहणार राहाता) असे सहाजण गंभीर जखमी झाले जखमींना लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी स्वतः लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
 या अपघातात ईरटीका कार च्या पुढील भागाचा चेंदामेंदा झाला व शिवशाही बसचे नुकसान झाले अपघातानंतर वाहतूकीची कोंडी झाल्याने नगर-मनमाड राज्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील गोंडेगाव येथील चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह काल गोडेंगाव शिवारातील विहीरीत आढळून आला. तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी गावात याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे

बेलापूर( प्रतिनिधी )--कामाचे ठेके कोणीही घ्या निधी कुणीही आना पण गावचा विकास झाला पाहिजे विकास कामात कोण तक्रारी करते याचे नाव ग्रामसभेत जाहीर करा अशी जोरदार मागणी बेलापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली बेलापूरचे उपसरपंच रवींद्र यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात झाली ग्राम विकास अधिकारी संग्राम चांडे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखविले यावेळी अभिषेक खंडागळे यांनी प्रभाग निहाय निधी देऊन विकास कामे करावीत कामाची ई-निविदा करूनच कामे देण्यात यावीत ग्रामपंचायतीने खरेदी केलेले एलईडी बल्ब निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी खंडागळे यांनी केली यावेळी संबंधित ठेकेदाराचे बिल आदा करण्यात आले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चांडे यांनी सांगताच सदस्य विवेक वाबळे यांनी ग्रामसभेस खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका संबंधित ठेकेदाराचे बिल केव्हाच  आदा केले असल्याचे सांगितले महेंद्र साळवे यांनी गायकवाड वस्ती वर निधी खर्च केला जात नाही तसेच ठराविक ठिकाणी बल्प बसविण्यात आले असून गरजेची कामे होत नसल्याची तक्रार केली यावेळी रमेश अमोलिक सुधीर तेलोरे विजय शेलार यांनी दलित वस्ती ची कामे का होत नाही त्यास कोण विरोध करतो ते जाहीर करा विकास कामाला खोडा कोण आणतो ते जाहीर करा अशी मागणी करत दलितांची कामे होत नसेल तर आम्ही या गावात राहायचे की नाही असा संतप्त सवाल केला यावेळी अभिषेक खंडागळे यांनी आपण सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगून गैरसमज करू नये  तसेच सदस्यांनाच ग्रामसभेत विकास कामाबाबत आवाज ऊठवावा लागत असेल तर ते दुर्दैव आहे असे मत मांडले वसुलीबाबत ग्रामसेवक पांडे यांनी थकबाकीदारांना एखादी योजना राबवून बाकी भरण्याकरिता उत्साहित करण्याची सूचना मानतात पत्रकार देविदास देसाई यांनी मग नियमित नळपट्टी पाणीपट्टी भरणारा चे काय असा सवाल करून बोगस नळ कनेक्शन व थकबाकी त्याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली जि प सदस्य  शरद नवले यांनीघन कचरा प्रकल्प राबविणे आवश्यक आहे तसेच पाझर तलाव अशोक बंधारे गावतळी या करीता पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी केली बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी कामाबाबत वेळोवेळी तक्रारी होत असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असल्याचे सांगितले  ग्रामसभेत माजी सरपंच भरत साळुंके चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक प्रसाद खरात दत्ता कुरे मनोज श्रीगोड यादव काळे आदींनी सूचना मांडले यावेळी व्यायाम शाळेकरिता मराठी शाळेच्या प्रांगणात असलेल्या समाज मंदिराचा वापर करण्यात यावा अशी सूचना विजय शेलार यांनी केली त्यास देवीदास देसले यांनी अनुमोदन दिले  ग्रामसभेस सरपंच राधाताई बोंबले लैला शैख नंदा पवार दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित  होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल नगर पालिका उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये प्रजासत्ताकाचा 71 वा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, जायदाबी कुरेशी, माजी नगरसेवक निसार कुरेशी, नजीर मुलानी, याकुब बागवान, कलीम कुरेशी, साजिद मिर्झा, जलीलभाई काजी, अशपाक शेख, हमीद चौधरी, अब्दुललतीफ शेख, अकिल सुन्नाभाई, अकिल आत्तार, किशोर शिंदे, अॅडवोकेट शफीअहमद शेख, हारुन शाह, जाफर शाह, असलमभाई सय्यद,डॉ.मन्सूर  सय्यद, गणीभाई टिनमेकर, फिरोज शेख, इस्माईल शाह, अमीर अलहामेद,शेख फिरोज बशीर , शेख मोहम्मद रफीक, काकर जाकिर , शेख अनीस, शेख यूसुफ इब्राहिम , शाह यूनुस , पिंजारी शमशूददीन, मन्सुरी बरकतअली आदिंसह शाळा क्र ४ व ९ चे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी सामुदायिकपणे ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या उद्दिशकेचे वाचन केले. शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , ध्वज गीत व देशभक्तिपर गीतांचे गायन व भाषणे केली.
शाळेच्या क्रिडा महोत्सवातील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी शाळेला नगरपालिकेमार्फत स्वच्छतागृहांचे काम व पेवींग ब्लॉक बसवून देण्याचे जाहीर केले.
प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली फारूक शाह,सय्यद वहीदा, नसरीन इनामदार, शाहीन शेख, जमील काकर, अस्मा पटेल, नीलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, आसिफ मुर्तुजा, एजाज चौधरी, युवराज पाटील, सदफ शेख, यास्मिन शेख, नाझिया शेख, रजिया मोमीन, सलमा शेख, सफिया शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुझा यांनी केले तर आभार फारुकशाह यांनी मानले.

श्रीरामपूर :- जगात भारतातील लोकशाहीचे वेगळे नाव आहे.नावाजलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक मतदार महत्वाची भूमिका पार पडत असतो ही लोकशाही आणखी बळकटीसाठी सर्व नागरिकांसह प्राधान्याने नवमतदार तरुणांनी जागरूक मतदार म्हणून पुढे येण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयोगाच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून सर्वत्र २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.यावेळच्या १० व्या मतदार दिनानिमित्त जनजागृतीसाठी शहरातून काढलेल्या रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी कल्याण मंडळ,चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालय,खा.गोविंदराव आदिक अॅग्लो उर्दू कनिष्ठ महाविद्यालय,हजरत मौलाना मकदूम उर्दू
हायस्कूल,भि.रा.खरोड कन्या विद्यालय,डी.डी.काचोळे विद्यालय,क.जे.सोमैय्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीचा समारोप समारंभ पोलीस परेड ग्राउंडवर पार पडला.त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून प्रांताधिकारी अनिल पवार बोलत होते.
व्यासपीठावर नायब तहसीलदार अशोक उगले,प्रा.सादिक सय्यद,रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश कुंदे ,प्रा.जलाल पटेल,दादा साठे,डॉ.बी जी घोडके,प्रा.व्ही एम मोरे,प्रा. व्ही बी नागपुरे,प्रा.एस डी पवार,शाहीन अहेमद रियाज अहेमद आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना लोकशाहीची रचना सांगून उद्याचे मतदार होणाऱ्या विद्यार्थ्यांना सजग राहण्याचे तसेच भविष्यात नि:पक्ष मतदान करण्याचे आवाहन केले.      प्रारंभी प्रास्ताविक करताना शकील बागवान यांनी निवडणूक आयोगाची रचना,निवडप्रक्रिया व आयोगाच्या कार्याचा इतिहास,मतदार नोंदणी प्रक्रियेतील क्रमबद्धता सांगितली तसेच विद्यार्थ्यांना नवमतदाराची शपथ दिली.
याप्रसंगी विधानसभेमध्ये उत्कृष्ठ कार्य केलेबद्दल श्रीधर बेलसरे,शकील बागवान,संजीवन दिवे,जितेंद्र भगत,पुरुषोत्तम चौधरी,संदीप पाळंदे,आसमा शेख यांचा महसूल मित्र म्हणून गौरव करण्यात आला.तर मतदार नोंदणी चे कार्य सर्वोत्कृष्ठपणे पार पाडणारे केंद्रस्तरीय मतदार अधिकारी एकनाथ रहाटे,मुख्याध्यापक जलील शेख,ग्रामसेविका अलका साळवे,संभाजी फरगडे,रामदास जाधव,प्रशांत दर्शने यांचा बहुमान करण्यात आला.राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध  स्पर्धेतील विजेत्यांना गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्रकाने सन्मानित करण्यात आले.       
सूत्रसंचालन शकील बागवान यांनी केले तर प्रा.जलाल पटेल  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बुलडाणा - 24 जानेवारी
घरफोडी व चोरीच्या प्रकरणात असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी आज 24 जानेवारी रोजी सकाळी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी लव्हाळा गावात गेले असता आरोपीची पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पारध्यांनी पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला केला. यात चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर या झटापटीत आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला. 
        अमडापूर, साखरखेर्डा या पोलिस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल असलेला आरोपी जखमेश्वर शेनफळ शिंदे हा साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम लोणी लव्हाळा येथे आलेला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक आढाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे, पोहेकॉ सुधाकर काळे, सैय्यद हारुण, संजय नागवे, मपोका अनुराधा उबरहंडे व चालक रविंद्र भिसे हे लोणी लव्हाळा येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोहचले. आरोपी जखमेश्वर शिंदे हा पोलिसांना पाहून पळाला. त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले असता अचानक आरोपीचे नातेवाईकांनी पोलिस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली. इतकेच नव्हेतर उकळता चहा देखील पोहेकॉ सुधाकर काळे यांच्या अंगावर फेकला.या झटापटीत आरोपी जखमेश्वर हा हातातून पळून जाण्यास यशस्वी झाला.या प्राणघातक हल्ल्यात विजय मोरे, सुधाकर काळे, आढाव, संजय नागवे जखमी झाले आहे. या प्रकरणी स्था.गु.शा.चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे यांच्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आरोपी जखमेश्वर शिंदे, शेनफळ शिंदे, रवि उर्फ बबल्या, शिवगंगा शिंदे,आरती, वैशाली, सुनिता भोसले व इतर अनोळखी तिन पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात भादविची कलम 143,147,148,148, 332,353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठानेदार संग्राम पाटील करीत आहे.या अगोदर ही या गावात पारध्यांनी पोलिस पथकावर हल्ले केलेले आहे,हे विशेष.

बुलडाणा - 23 जनवरी
अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या स्वजिल्ह्यात काही वेळा पूर्वी खामगांव येथील गुटखा माफिया "राठी" च्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील सहायक आयुक्त वाकडे अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेत छापा मारला परंतु जेंव्हा हे पथक सदर ठिकाणी पोहोचली असता त्यांच्या हाती काहीच आले नाही.शहरात अशी चर्चा आहे की,राठी ला अगोदरच या रेड ची माहिती मिळाली होती म्हणून त्याने सर्व माल गायब करून टाकला, आता अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची ही नामुशकि चर्चेचा विषय बनला आहे,,आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की राठीला अगोदरच या कार्यवाहीची माहिती देणारा तो "घर का भेदी"  कोण??अन्न व औषध प्रशासनातला की पोलिस विभागातील??? तर दूसरी कडे अशीच धाड चिखलीत गुटखा किंग "हाजी" च्या ठिकाणावर ही टाकण्यात आल्याचे समझते.चिखली मध्ये 2 ठिकाणी फक्त एक ते दीड लाखाचा गुटखा पकडण्यात आला आहे तर बातमी लिहिस्तव चिखलीत कार्यवाही सुरु होती.

अहमदनगर (प्रतिनिधी)-कॉलेजचे शिक्षण घेणार्‍या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात लोणीचे विखे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे ठाकले आहेत. विराज राजेंद्र विखे असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी तो लोणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.354 (ड) 506, 507 सह महिलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11(4),12 सहा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलगी ही नगरच्या आगरकर मळा भागात राहणारी असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 2017 ते 2018 याकाळात प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील जुनिअर कॉलेज परिसरात ही घटना घडली.पिडित तरुणी ही 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर (लोणी) येथे पद्श्री विखे पाटील ज्युनियर व सीनियर कॉलेजला शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी तिचा सतत पाठलाग केला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू जर मला होय म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन’ असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.त्यानंतर पिडित तरुणी शिक्षण अर्धवट सोडून अहमदनगर येथे आली. येथे पुढील शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी विराज विखे, श्रद्धा कानडे पाटील, स्मिता अशा नावाने फेसबुक अकौंट ओपन केले. त्यावर पिडित तरुणीच्या नावाचा वापर करून बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. आरोपी  नगरात असल्याचे लोकेशन फेसबुकवर टाकून पिडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कॉलेजचे शिक्षण घेणार्‍या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात विराज राजेंद्र विखे वर गुन्हा दाखल झाला आसून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास रहाता पी. आय. सुभाष भोय करीत आहे. 

नवी दिल्लीः तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावत फासावर लटवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात येत आहे. तुरुंगाच्या बाहेर 32 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, फाशी देण्यासह इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रत्येक दोन तासांनी शिफ्ट बदलली जात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आराम मिळावा आणि चोख सुरक्षा व्यवस्था राबवावी, यासाठी जेल प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.चारही दोषींना तिहार तुरुंगातील जेल नंबर 3मध्ये वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक दोषीच्या बाहेर दोन सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक दोन तासांनी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना थोडी विश्रांती दिली जाते. शिफ्ट बदलल्यानंतर दुसरे सुरक्षा कर्मचारी त्यांच्याजागी पाठवले जातात. प्रत्येक कैद्यासाठी 24 तास आठ-आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे. चार कैद्यांसाठी जवळपास 32 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. ते 24 तासांत 48 तास शिफ्टमध्ये काम करत आहेत. या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधी त्यांना इतर कैद्यांबरोबर ठेवण्यात येत होते. परंतु न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ते कैदी आत्महत्या करू नये, तुरुंगातून पळून जाऊ नये,  यासाठी कैद्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.  1 फेब्रुवारीला होणार फाशीया दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार असून, 30 जानेवारीला जल्लादला बोलावण्यात आलं आहे. जेणेकरून जल्लाद फाशी देण्याचं प्रात्यक्षिक करू शकेल. बुधवारी पवन आणि विनय या दोघांच्या कुटुंबीयांनीही तुरुंग प्रशासनाची भेट घेतली आहे.

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा-राहुरी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सराफ दुकान असलेल्या सराफ व्यावसायिकाचा त्याच्या नेवासा तालुक्यातील खेडलेपरमानंद या गावी मंगळवारी सायंकाळी घरी परतत असताना चोरट्यांनी डोळ्यात मिरचीपूड टाकून लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लुटल्या प्रकरणी काल सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत निखील बाळासाहेब आंबिलवादे (वय 21) धंदा-सराफ दुकान रा. खेडलेपरमानंद ता. नेवासा यांनी काल दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मांजरी येथील त्यांचे ‘गुरुकृपा ज्वेलर्स’ हे दुकान सायंकाळी बंद करून 200 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 760 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे 7 लाख 90 हजार 778 रुपये किंमतीचे दागिने चेनीच्या बॅगमध्ये भरुन त्यांच्याकडील स्कूटरवरून खेडलेपरमानंद येथे घरी परतत असताना पानेगाव ते खेडलेपरमानंद रस्त्यावर पानेगाव शिवारात सायंकाळी साडेसहा वाजता काळ्या रंगाच्या युनिकॉर्न गाडीवरील चालक व त्याच्याबरोबरील अन्य तीन अनोळखी चोरटे यांनी त्यांना रस्त्यात थांबण्यास सांगितले व पत्ता विचारण्याचा बहाणा केला.त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून फिर्यादीच्या पाठिवरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची बॅग ओढून जबरीने चोरुन घेवून गेले. त्यानंतर बाळासाहेब आंबिलवादे यांनी जखमी अवस्थेत मांजरी येथील ओम मल्टीस्पेशालिटी दवाखान्यात उपचार घेतले व बुधवार दि. 22 रोजी रात्री पावणेआठ वाजता सोनई पोलीस ठाण्यात येवून फिर्याद दाखल केली.सोनई पोलिसांनी फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर फर्स्ट 23/2020 भारतीय दंड विधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे करत आहेत.चोरट्यांनी लुटलेले दागिने,ने (200 ग्रॅम- 7 लाख 60 हजार रुपये)- पावत्याप्रमाणे एकूण 200 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांमध्ये सोन्याचे 3 नेकलेस, कानातील (इअरींग) जोड, कुडके पुडी, टॉपजोड, रिपेरिंगचे गंठण, लहान गंठण, डिस्को बाळ्यांची पुडी, फॅन्सी गोल रिंगांची पुडी, सटुबाई व बाळ्यांची पुडी, लहान बाळांच्या अंगठ्या, ठुशी, गोल व खरबुजे आकाराचे मिक्स मणी, डोरले, रेग्युलर जेन्टस्, लेडीज अंगठ्या, लेडीस पेन्डल्स इत्यादी. या सर्व दागिन्यांवर इंग्रजीत डीबीए असे शिक्के आहेत. सन 2019 मधील खरेदी पावत्याप्रमाणे प्रति ग्रॅम प्रमाणे सोन्याची किंमत असलेले.चांदी ( 760 ग्रॅम- 30 हजार 778 रुपये) पायातील जोडवी, कडे, वाळे, चांदीच्या सरी, बाहुटी, तोरडी (पैंजण), चांदीचे गणपती, लक्ष्मी, सरस्वतीच्या लहान मुर्त्या, चांदीच्या जोडव्याचे मध्यभागी आतील बाजूस इंग्रजीतून डीबीए असा छाप व पैंजणावर इंग्रजीतून डीजी-1 असा छाप असलेले दागिने.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget