बेलापूर( प्रतिनिधी )--कामाचे ठेके कोणीही घ्या निधी कुणीही आना पण गावचा विकास झाला पाहिजे विकास कामात कोण तक्रारी करते याचे नाव ग्रामसभेत जाहीर करा अशी जोरदार मागणी बेलापूरच्या ग्रामसभेत करण्यात आली बेलापूरचे उपसरपंच रवींद्र यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरुवात झाली ग्राम विकास अधिकारी संग्राम चांडे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखविले यावेळी अभिषेक खंडागळे यांनी प्रभाग निहाय निधी देऊन विकास कामे करावीत कामाची ई-निविदा करूनच कामे देण्यात यावीत ग्रामपंचायतीने खरेदी केलेले एलईडी बल्ब निकृष्ट दर्जाचे असून त्याची चौकशी व्हावी अशी मागणी खंडागळे यांनी केली यावेळी संबंधित ठेकेदाराचे बिल आदा करण्यात आले नसल्याचे ग्रामविकास अधिकारी चांडे यांनी सांगताच सदस्य विवेक वाबळे यांनी ग्रामसभेस खोटी माहिती देऊन दिशाभूल करू नका संबंधित ठेकेदाराचे बिल केव्हाच आदा केले असल्याचे सांगितले महेंद्र साळवे यांनी गायकवाड वस्ती वर निधी खर्च केला जात नाही तसेच ठराविक ठिकाणी बल्प बसविण्यात आले असून गरजेची कामे होत नसल्याची तक्रार केली यावेळी रमेश अमोलिक सुधीर तेलोरे विजय शेलार यांनी दलित वस्ती ची कामे का होत नाही त्यास कोण विरोध करतो ते जाहीर करा विकास कामाला खोडा कोण आणतो ते जाहीर करा अशी मागणी करत दलितांची कामे होत नसेल तर आम्ही या गावात राहायचे की नाही असा संतप्त सवाल केला यावेळी अभिषेक खंडागळे यांनी आपण सर्वजण मिळून गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगून गैरसमज करू नये तसेच सदस्यांनाच ग्रामसभेत विकास कामाबाबत आवाज ऊठवावा लागत असेल तर ते दुर्दैव आहे असे मत मांडले वसुलीबाबत ग्रामसेवक पांडे यांनी थकबाकीदारांना एखादी योजना राबवून बाकी भरण्याकरिता उत्साहित करण्याची सूचना मानतात पत्रकार देविदास देसाई यांनी मग नियमित नळपट्टी पाणीपट्टी भरणारा चे काय असा सवाल करून बोगस नळ कनेक्शन व थकबाकी त्याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली जि प सदस्य शरद नवले यांनीघन कचरा प्रकल्प राबविणे आवश्यक आहे तसेच पाझर तलाव अशोक बंधारे गावतळी या करीता पाण्याचे आरक्षण करण्याची मागणी केली बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी कामाबाबत वेळोवेळी तक्रारी होत असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असल्याचे सांगितले ग्रामसभेत माजी सरपंच भरत साळुंके चंद्रकांत नाईक पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक प्रसाद खरात दत्ता कुरे मनोज श्रीगोड यादव काळे आदींनी सूचना मांडले यावेळी व्यायाम शाळेकरिता मराठी शाळेच्या प्रांगणात असलेल्या समाज मंदिराचा वापर करण्यात यावा अशी सूचना विजय शेलार यांनी केली त्यास देवीदास देसले यांनी अनुमोदन दिले ग्रामसभेस सरपंच राधाताई बोंबले लैला शैख नंदा पवार दिलीप दायमा आदिसह नागरीक उपस्थित होते.
Post a Comment