श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल नगर पालिका उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये प्रजासत्ताकाचा 71 वा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, हाजी मुजफ्फरभाई शेख, ताराचंद रणदिवे, मुक्तार शाह, जायदाबी कुरेशी, माजी नगरसेवक निसार कुरेशी, नजीर मुलानी, याकुब बागवान, कलीम कुरेशी, साजिद मिर्झा, जलीलभाई काजी, अशपाक शेख, हमीद चौधरी, अब्दुललतीफ शेख, अकिल सुन्नाभाई, अकिल आत्तार, किशोर शिंदे, अॅडवोकेट शफीअहमद शेख, हारुन शाह, जाफर शाह, असलमभाई सय्यद,डॉ.मन्सूर सय्यद, गणीभाई टिनमेकर, फिरोज शेख, इस्माईल शाह, अमीर अलहामेद,शेख फिरोज बशीर , शेख मोहम्मद रफीक, काकर जाकिर , शेख अनीस, शेख यूसुफ इब्राहिम , शाह यूनुस , पिंजारी शमशूददीन, मन्सुरी बरकतअली आदिंसह शाळा क्र ४ व ९ चे विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी सामुदायिकपणे ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या उद्दिशकेचे वाचन केले. शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , ध्वज गीत व देशभक्तिपर गीतांचे गायन व भाषणे केली.
शाळेच्या क्रिडा महोत्सवातील विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलतांना नगरसेवक हाजी अंजूमभाई शेख यांनी शाळेला नगरपालिकेमार्फत स्वच्छतागृहांचे काम व पेवींग ब्लॉक बसवून देण्याचे जाहीर केले.प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली फारूक शाह,सय्यद वहीदा, नसरीन इनामदार, शाहीन शेख, जमील काकर, अस्मा पटेल, नीलोफर शेख, बशीरा पठाण, मिनाज शेख, आसिफ मुर्तुजा, एजाज चौधरी, युवराज पाटील, सदफ शेख, यास्मिन शेख, नाझिया शेख, रजिया मोमीन, सलमा शेख, सफिया शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसिफ मुर्तुझा यांनी केले तर आभार फारुकशाह यांनी मानले.
Post a Comment