शिरसगाव येथील कनोसा हॉस्टेल येथे नुकतेच सी.ए. ए, एन.आर. सी.व एन.पी.आर या केंद्र सरकारच्या जाचक नागरिकत्व सुधार कायद्याच्या अनुषंगाने महिलांमध्ये जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऍड.समीन बागवान यांनी उपस्थित महिलांना देशात नागरिकत्व सुधार कायदा अस्तित्वात आल्यानंतर आता पुढे राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर, राष्ट्रीय नागरिकता रजिस्टर देशातील सर्व अल्पसंख्याक समुदायकरिता अन्याय कारक असल्याने त्याचा सर्वांनी तीव्र विरोध करावा असे आवाहन केले,यावेळी बोलताना ऍड बागवान यांनी देशाच्या शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने ख्रिस्ती समाज धर्मियांच्या असणाऱ्या अमुल्य योगदानाबद्दल विस्तृत विवेचन केले.तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.सर्वत्र अराजकता माजली आहे,या देशाचे मूलतः असणारे नागरिक भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहे कारण या कायद्याचे स्वरूप अत्यन्त गुंतागुंतीचे व जाचक अटींचे असणार आहे,याकरीता या कायद्याला कडाडून विरोध करून हा कायदा रद्द करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल संविधानाचे रक्षण करावे लागेल, कारण भारताला फक्त संविधान च वाचवू शकते.
यावेळी उपस्थित असंख्य महिलांनी सदर अन्याय कारक कायद्या विरुद्ध लढा उभा करण्याची ग्वाही यावेळी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोयोला धर्मग्रामचे प्रमुख धर्मगुरू फा. ज्यो गायकवाड, कनोसा हॉस्टेल च्या सुपिरिअर सिस्टर पाकुळी,रवी त्रिभुवन सर,धर्मभगिनी सि. मार्टिना,सि. ग्रेसी,सि. प्रेसिला, सि. रोड्रीग्स,श्री.खंडागळे गुरुजी व आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन व परिचय रवी त्रिभुवन सर यांनी करून आपल्या सुमधुर वाणीत कवी वामन दादा कर्डक यांचे "माणसा इथे मी तुझे गीत गावे" हे गीत गायले.
Post a Comment