बुलडाणा - 31 जानेवारी
वन्य प्राण्यांची शिकार करून त्याचा मांस विक्री केला जात आहे.एका ठिकाणी रानडुक्करचे मांस असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वन विभागाच्या पथकाने धाड टाकून 2 लोकांना ताब्यात घेतले त्यांच्या कडून रानडुक्करचे मांस जप्त करण्यात आले आहे तर हे पथक कार्यवाही करत असतांना इतर 2 लोकांनी वन पथकाला लोटपाट करीत शिविगाळ केल्याची घटना आज 31 जानेवारीला ग्राम मोहेगांव येथे घडली आहे.
मोताळा तालुक्यातील मोहेगांव येथील काही लोक रानडुक्करची शिकार करुण त्याचा मांस विकतात अशी गुप्त माहिती मिळाल्याने संजय एन.माळी उपवनसंरक्षक बुलडाणा, रंजित गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक, (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांच्या मार्गदर्शनात आर.बी.कोंडावार वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मोताळा, यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह 31 जानेवारीला मोहेगाव येथील अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंद पवार यांच्या राहत्याघरुन धाड टाकली असता घरातून वन्यप्राणी रानडुक्करचे मास आढळुन आले. सदर मास जप्त केलेले असुन आरोपी नामे अनिल मलचंद चव्हाण व दरबार भोंदु पवार दोन्ही रा.मोहेगाव यांच्या विरोधात वन्यजिव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,43,44,48,49,50,51
अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.दोन्ही आरोपींना मा.न्यायालय, मोताळा समक्ष हजर केले असता दि. 3 फेब्रूवारी पर्यंत वनकोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास व्ही.डी. सानप, राजुर वर्तुळ अधिकारी करत आहेत. सदर कार्यवाहीत धनंजय पोटे, व्ही. डी. सानप, पी. पी. मुंढे,ए. एन. सपकाळ,एस. पी. कुशोड,एस. के. घुगे, अहीरे, संतोष जाधव व वाहन चालक यांचा समावेश होता.
*शासकीय कामात अडथळा*
मोहेगांवात वन विभाग सदर कार्यवाही करीत असतांना संजय शंकर जाधव व सागर संतोष राठोड यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आरेरावी व शिवीगाळ करीत लोटपोट केली व शासकीय कामात अडथळा आनला म्हणुन या दोघांच्या विरुद्ध पोलिस स्टेशन बोराखेडी येथे शासकिय कामी अडथळा निर्माण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
Post a Comment