शिरसगाव[वार्ताहर]हरिगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक विकासाचे काम शासनाच्या आदेशानंतर,माजी सामाजिक न्यायमंत्री यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर अद्याप सुरु झाले नाही शासनाकडून ९५ लाख रु त्यासाठी मंजूर झाले निविदा निघून वर्क ऑर्डर झाली परंतु काम सुरु झाले नसल्याने रवींद्र वाहूळ,बाळू बोर्डे,माधव झाल्टे हे तिघे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहेत.तेथे विविध पदाधिकारी,आमदार लहू कानडे,सार्वजनिक बांधकाम विभाग उजागरे,राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष माणिक विधाते,श्रीरामपूर उपनगराध्यक्ष करण ससाणे,सभापती सचिन गुजर,मुन्ना पठाण सरपंच अस्मिता नवगिरे,अनिता भालेराव,सीताबाई गायकवाड,कोमल जाधव,सुर्यकांत चाबुकस्वार,रसूल पठाण,प्रा.किरण खाजेकर,डॉ,नंदकुमार वाघमारे,दिलीप त्रिभुवन चेतन त्रिभुवन,सुनील शिणगारे, भीमराज बागुल,जिल्हाधिकारी कार्यालय अधिकारी आदींनी उपोषणार्थी यांची भेट घेतली.पण हरिगाव ग्रामविकास अधिकारी मात्र ४ दिवसात फिरकले नाहीत.पालकमंत्री ना.मुश्रीफ यांना २५ जाने.ला शिष्टमंडळ भेटले उपोषण संदर्भात २७ जाने.रोजी तातडीने अहमदनगर येथे संबंधित अधिकारी यांची बैठक झाली..त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.प्रा.किरण खाजेकर यांच्या नेतृत्वाखाली हरिगाव शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय,नगर रचना विभागीय कार्यालय येथे भेटले.त्यांचे समवेत दिलीप त्रिभुवन,सुनील शिणगारे,डॉ नंदकुमार वाघमारे,चेडे,चंद्रकांत खरात दीपक नवगिरे,रमेश भालेराव,रसूल पठाण,,अशोक खरात,अमोल वाहूळ,विनायक वाघमारे,सुनील रूपटक्के,सचिन बोधककळू बावस्कर,हरीश मढीकर,अनिल लिहिणार,सुनील पवार,महेबूब शेख,,संदीप लोखंडे आदी होते.तेंव्हा सकारात्मक चर्चा झाली व हा प्रश्न सकारात्मक सोडविला जाईल असे निवासी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.तसेच दि २४ जाने.पासून अहमदनगर येथे बसलेल्या डॉ आंबेडकर स्मारक विकास काम सुरु करणे बाबत उपोषणार्थीना पाठींबा देणेसाठी सरपंच ग्रामस्थ हरिगाव,यांनी दि २७ जाने रोजी हरिगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.बंद शांततेत पाळला.संध्यकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार महसूल निखारे,यांनी लेखी पत्र तातडीने नगररचना कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना सूचना दिल्याचे प्रत दिल्याने तीन उपोषणार्थी यांचे आमरण उपोषण संध्यकाळी तहसीलदार नगर गिरीश वाखारे,यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले.त्यावेळी नेमाणे गृह विभाग,ठोंबरे,प्रा.किरण खाजेकर उपस्थित होते.
Post a Comment