बुलडाणा एलसीबीच्या पथकावर पारध्यांचा हल्ला,उकळता चहा फेकला अंगावर,4 पोलिस जख्मी, लोणी लव्हाळा येथील घटना.

बुलडाणा - 24 जानेवारी
घरफोडी व चोरीच्या प्रकरणात असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी आज 24 जानेवारी रोजी सकाळी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणी लव्हाळा गावात गेले असता आरोपीची पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पारध्यांनी पोलिस पथकावर प्राणघातक हल्ला केला. यात चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले तर या झटापटीत आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला. 
        अमडापूर, साखरखेर्डा या पोलिस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल असलेला आरोपी जखमेश्वर शेनफळ शिंदे हा साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम लोणी लव्हाळा येथे आलेला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाला. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक आढाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे, पोहेकॉ सुधाकर काळे, सैय्यद हारुण, संजय नागवे, मपोका अनुराधा उबरहंडे व चालक रविंद्र भिसे हे लोणी लव्हाळा येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोहचले. आरोपी जखमेश्वर शिंदे हा पोलिसांना पाहून पळाला. त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले असता अचानक आरोपीचे नातेवाईकांनी पोलिस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली. इतकेच नव्हेतर उकळता चहा देखील पोहेकॉ सुधाकर काळे यांच्या अंगावर फेकला.या झटापटीत आरोपी जखमेश्वर हा हातातून पळून जाण्यास यशस्वी झाला.या प्राणघातक हल्ल्यात विजय मोरे, सुधाकर काळे, आढाव, संजय नागवे जखमी झाले आहे. या प्रकरणी स्था.गु.शा.चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे यांच्या फिर्यादीवरुन साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आरोपी जखमेश्वर शिंदे, शेनफळ शिंदे, रवि उर्फ बबल्या, शिवगंगा शिंदे,आरती, वैशाली, सुनिता भोसले व इतर अनोळखी तिन पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात भादविची कलम 143,147,148,148, 332,353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठानेदार संग्राम पाटील करीत आहे.या अगोदर ही या गावात पारध्यांनी पोलिस पथकावर हल्ले केलेले आहे,हे विशेष.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget