बुलडाणा - 23 जनवरी
अन्न व औषध प्रशासन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या स्वजिल्ह्यात काही वेळा पूर्वी खामगांव येथील गुटखा माफिया "राठी" च्या "सुरुची ट्रेडर्स" वर अमरावती येथील सहायक आयुक्त वाकडे अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेत छापा मारला परंतु जेंव्हा हे पथक सदर ठिकाणी पोहोचली असता त्यांच्या हाती काहीच आले नाही.शहरात अशी चर्चा आहे की,राठी ला अगोदरच या रेड ची माहिती मिळाली होती म्हणून त्याने सर्व माल गायब करून टाकला, आता अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची ही नामुशकि चर्चेचा विषय बनला आहे,,आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की राठीला अगोदरच या कार्यवाहीची माहिती देणारा तो "घर का भेदी" कोण??अन्न व औषध प्रशासनातला की पोलिस विभागातील??? तर दूसरी कडे अशीच धाड चिखलीत गुटखा किंग "हाजी" च्या ठिकाणावर ही टाकण्यात आल्याचे समझते.चिखली मध्ये 2 ठिकाणी फक्त एक ते दीड लाखाचा गुटखा पकडण्यात आला आहे तर बातमी लिहिस्तव चिखलीत कार्यवाही सुरु होती.
Post a Comment