कॉलेजचे शिक्षण घेणार्या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात विराज राजेंद्र विखे वर गुन्हा दाखल आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
अहमदनगर (प्रतिनिधी)-कॉलेजचे शिक्षण घेणार्या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात लोणीचे विखे आरोपीच्या पिंजर्यात उभे ठाकले आहेत. विराज राजेंद्र विखे असे या गुन्ह्यातील आरोपीचे नाव असून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी तो लोणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.354 (ड) 506, 507 सह महिलांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11(4),12 सहा माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (सी) (डी) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित मुलगी ही नगरच्या आगरकर मळा भागात राहणारी असून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 2017 ते 2018 याकाळात प्रवरानगरच्या पद्मश्री विखे पाटील जुनिअर कॉलेज परिसरात ही घटना घडली.पिडित तरुणी ही 2017 ते 2018 मध्ये प्रवरानगर (लोणी) येथे पद्श्री विखे पाटील ज्युनियर व सीनियर कॉलेजला शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी तिचा सतत पाठलाग केला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू जर मला होय म्हणाली नाही तर मी माझे जीवाचे बरे-वाईट करीन’ असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.त्यानंतर पिडित तरुणी शिक्षण अर्धवट सोडून अहमदनगर येथे आली. येथे पुढील शिक्षण घेत असताना विराज विखे यांनी विराज विखे, श्रद्धा कानडे पाटील, स्मिता अशा नावाने फेसबुक अकौंट ओपन केले. त्यावर पिडित तरुणीच्या नावाचा वापर करून बदनामी करण्याच्या हेतूने नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट टाकली. आरोपी नगरात असल्याचे लोकेशन फेसबुकवर टाकून पिडितेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाठलाग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.कॉलेजचे शिक्षण घेणार्या मुलीचे लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणात विराज राजेंद्र विखे वर गुन्हा दाखल झाला आसून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील तपास रहाता पी. आय. सुभाष भोय करीत आहे.
Post a Comment