देवळा : मेशी बसही रीक्षापाठोपाठ विहिरीचा कठडा तोडून विहिरीत पडली अपघातातील मृतांची संख्या २४ वर; बेपत्ता मुलाचा शोध सुरु.

नाशिक | प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात असलेल्या मेशी गावानजीक काल (दि.२८) सायंकाळी चारच्या सुमारास बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातातील मृतांचा आकडा २४ वर पोहोचला असून अजूनही एका बेपत्ता मुलाचा शोध एनडीआरएफच्या टीमकडून केला जात आहे.देवळा तालुक्यातील मेशी फाट्याजवळ ही भीषण दुर्घटना घडली होती.  अपघातानंतर दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने अधिक जीवितहानी झाली. बसने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचा चक्काचूर होऊन रिक्षा विहिरीत कोसळली.या अपघातात २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती.विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. अंधार पडल्यामुळे आणि विहिरीत १५ ते २० फुट पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मध्यरात्री शोधकार्य थांबविण्यात आले होते.
आज सकाळपासून पुन्हा एनडीआरएफकडून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. रात्री २३ मृतदेह हाती आल्यानंतर आज सकाळी पुन्हा एक मृतदेह मिळून आला. तसेच अजून एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तर जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. तर गंभीर जखमी प्रवाशांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.तर बसही रीक्षापाठोपाठ विहिरीचा कठडा तोडून विहिरीत पडली. त्यामुळे बसमधील प्रवाशी अधिक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, मृतांची ओळख पटवून शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget