Latest Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कॅम्पचे आयोजन

बेलापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने बे बेलापूर आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामा मस्जिद येथे विविध दाखल्यांचे घरांचे आयोजन करण्यात आले होते त्यात आधार कार्ड रेशन कार्ड विविध प्रकारचे दाखले नागरिकांना देण्यात आले. भाजप उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीनजी दिनकर व भाजप अल्पसंख्याक मोर्चा अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष रऊफभाई शेख यांच्या आवाहनानुसार, श्रीरामपूर भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजीज शेख  यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी जामा मस्जिद बेलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उर्दू हायस्कूलमध्ये विविध शासकीय कागदपत्रांसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला होता.

या कॅम्पचे उद्घाटन संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरदराव नवले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे पाटील, बेलापूर भाजपा शहराध्यक्ष प्रफुल्लजी डावरे, जिल्हा सचिव निलेशजी हरदास, श्रीरामपूर तालुका माजी उपाध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, जाफरभाई अत्तार, शफीकभाई बागवान, आसिफ शेख, जब्बार अत्तार, सूरज बडे, मुख्तार सय्यद, सुलतान शेख, मुनीर बागवान, मोहसीन हाजी बाहोद्दीन सय्यद, अनिस काजी, जमीर शेख, इम्तियाज अत्तार, जावेद बागवान एजाज सय्यद आदी उपस्थित होते.

कॅम्पमध्ये नागरिकांना पासपोर्ट, गॅझेट, आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच आधार-पॅनकार्ड दुरुस्ती, KYC, बस पास आणि महा-ईडी कार्ड आदी सेवांचा लाभ देण्यात आला. यामध्ये १९ पासपोर्ट, १७ गॅझेट, २० आधारकार्ड, ३५ पॅनकार्ड, ३२ आधार-पॅनकार्ड दुरुस्ती, १३ KYC, १० बस पास आणि ५ महा-ईडी कार्ड अशा विविध सेवांसाठी नागरिकांनी नोंदणी केली.

बेलापूर तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासकीय कागदपत्रांच्या सुविधेबाबत विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी शहरात जाण्याची होणारी गैरसोय कमी व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

कॅम्पच्या आयोजनासाठी प्रसाद लढ्ढा, इंगळे व साळवे यांचे विशेष सहकार्य लाभले. कॅम्प यशस्वी करण्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चा श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अजीज शेख, मोहसीन हाजी बाहोद्दीन सय्यद, शफीक बागवान, आसिफ शेख, जब्बार अत्तार, मुख्तार सय्यद, सुलतान शेख, हारून सय्यद, जुबेर अत्तार, कैफ काझी, मोईस शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

शेवटी मोहसीन हाजी  सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बेलापूर (प्रतिनिधी )-बेलापूर गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने 15 ते 17 नागरिकांना चावा घेतला असून जखमी नागरिकांना अहिल्यानगर, श्रीरामपूर  शिर्डी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान काळया रंगाच्या कुत्र्याने अनेक नागरीकांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले गावातील मैनुदा शेख वय 70 वर्ष या घरात झोपलेले असताना झोपलेल्या अवस्थेतच कुत्र्याने त्यांच्या ओठाचा व कपाळाचा लचका तोडला तसेच एका महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा झालेली आहे साई मगर वय वर्ष 14 ,साक्ष शरद गोरे वय 25वर्ष मतीन काझी वय 15वर्ष ,सागर जोशी वय 32वर्ष शारदा रेनिवाल वय 54 वर्षे सविता विशाल साबळे यांना तातडीने बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी लिपटे,डॉ. शैलेश पवार आरोग्य सेवक कडू रोहन ,गणेश टाकसाळ,ग्रेटा  कदम, आरोग्य सेविका पुजा वाघमारे वंदना खरात संतोष शेलार यांनी तातडीने उपचार केले. त्यानंतर त्या सर्वांना बाजार समितीचे माजी उपसभापती खंडागळे अभिषेक सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख मोहसीन सय्यद राहुल माळवदे असीफ शेख रोहीत शि़दे यांनी

जखमींना तातडीने  रुग्णवाहिकेतून  अहिल्यानगर येथे पाठविले त्याचबरोबर काही रुग्ण श्रीरामपूर येथील दवाखान्यात दाखल झाले तर काही रुग्ण शिर्डी येथे उपचार घेत आहेत या घटनेची माहिती मिळताच बेलापूर ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, दत्तात्रय वक्ते, योगेश अमोलिक, अविनाश शेलार, सागर भिंगारदिवे व नागरिकांनी त्या कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते कुत्रा कुठेही आढळला नाही या पिसळलेल्या कुत्र्याला बाहेरून कुणीतरी  गावात सोडले असावे अशी चर्चा आहे. बेलापूरच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली असून अनेकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा त्याचबरोबर गावात अनेक मोकाट कुत्री फिरत आहेत त्याचा देखील ग्रामपंचायत बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे

बेलापूर:-(प्रतिनिधी )-येथील बेलापूर नाभिक संघटनेच्या बैठकीत अध्यक्ष पदी सुनिल सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी सचिन कणसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.समाजातील अडचणी सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू.अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.बेलापुर  नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनिल सोनवणे यांच्या नावाची सुचेना मावळते अध्यक्ष गोरख कणसे यांनी  मांडली त्यास समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब कुटे यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्ष पदासाठी सचिन कणसे या़च्या नावाची सुचेना प्रतापराव मुंडे यांनी मांडली त्यास कैलास घायल यांनी अनुमोदन दिले नवीन निवडीबद्दल त्यांचे मावळते अध्यक्ष गोरक्षनाथ कणसे, भाऊसाहेब कुटे, प्रतापराव हुडे , कनजीशेठ टाक , कैलास चायल,भिमराज हुडे,रमेश कुटे ,रविंद्र हुडे, नंदु भागवत, बबनराव रावताळे,बाबू वैद्य , सतीश सोनवणे,हरि वैद्य, विजय हुडे, विजय शेजूळ, अनिल शेजुळ, राजेंद्र बोरसे, महेश जायभार, गणेश शेजूळ, नवीन भागवत, कृष्णा भागवत, शेखर कुटे, गणेश कणसे, सागर हुडे, निलेश हुडे, अशोक आहेर, प्रशांत बिडवे, दत्तात्रय जाधव,रमेश टाक, सुधीर सोनवणे,राजन सोनवणे, आदींनी अभिनंदन केले आहे

बेलापूर ( प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथील ज्येष्ठ पत्रकार ,भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते, समाजसेवक, दानशुर व्यक्तीमत्त्व कै. विष्णुपंत गोविंदराव डावरे यांच्या दुःखद निधनाने बेलापूर परिसरासह पत्रकारिता तसेच सामाजिक , राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असुन त्यांच्या जाण्याने बेलापूर भाजपामध्ये एक पोकळी निर्माण झाली असल्याचे मत जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.


कै. डावरे यांची गावातुन  वाबळे गल्ली ,झेंडा चौक ते स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या निधनाची वार्ता राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना समजताच त्यांनी डावरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन विष्णुपंत डावरे यांची पत्नी रत्नमाला डावरे पुतणे प्रफुल्ल डावरे बंधू हरिहर डावरे व डावरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.कै. डावरे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे मत नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष शरद नवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, हाजी इस्माईल शेख, रणजित श्रीगोड, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, देविदास देसाई, पुरुषोत्तम भराटे, कणजीशेठ टाक, रवींद्र खटोड,राजेश खटोड,भरत साळुंके सुभाष बोरा,रावसाहेब अमोलिक, राकेश कुंभकर्ण, निलेश हरदास, मुस्ताक शेख,रखमाजी गाढे,रमेश काळे, विशाल आंबेकर, अजिज शेख, सचिन वाघ, शफिक बागवान, सचिन अमोलिक, किशोर बोरुडे, करण गोसावी, अनिल थोरात,सुमित बोरुडे, आदित्य कर्डिले, सुरज  बडे,मोहसीन सय्यद, प्रभात कुऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी देविदास देसाई)-बेलापुरात एकच दिवशी दोन वेगवेगळ्या गंठण चोरीच्या घटना घडल्या असून एक सकाळी सात वाजता तर दुसरी  रात्री साडेअकराच्या दरम्यान घटना घडली आहे .साखळी चोरांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे      बेलापुरात सकाळी भगवान श्री हरिहर केशव गोविंद बन येथून दर्शन करून परतत असताना प्रवरा नदीच्या पुलावर  सकाळी सात वाजेच्या सुमारास एका महिलेचे दोन तोळ्याचे गंठण तोडून चोरटे पसार झाले या घटनेचा तपास पोलीस करत असतानाच काल रात्री बेलापूर खुर्द येथील एका महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे गंठण रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान तोडून नेण्यात आले श्रावण महिना असल्यामुळे श्री हरी केशव गोविंदाच्या पादुकांची सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती रात्री साडेअकराच्या सुमारास ही मिरवणूक बेलापूर खुर्द इथून जात असताना अनेक महिला भगिनी पादुकांच्या दर्शनाकरता थांबल्या होत्या त्यात एक वयोवृद्ध महिला आपल्या घरासमोर ओट्यावर बसलेली होती त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी काही समजण्याच्या आतच त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची पोत तोडून पोबारा केला या घटनेनंतर सदर कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीसही घटनास्थळी आले सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.सकाळची घटना घडल्यानंतर पोलीस तपास सुरू असतानाच रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा एका वयोवृद्ध महीलेच्या गळ्यातील अर्धा तोळ्याची पोत तोडून नेण्यात आली .सध्या रस्त्यावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असतानाही शिवाय बेलापूर पोलीस स्टेशनला जादा कर्मचारी देण्यात आलेले असतानाही साखळी चोर इतके धाडस करतातच कसे? असा सवाल नागरिकाकडून विचारला जात आहे.बऱ्याच दिवसानंतर बेलापूर मध्ये  झाडीने चोरीच्या सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत या घटनेचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

बेलापूर (प्रतिनिधी) -देव दर्शन करुन पायी परत येत असताना प्रवरा नदीवरील पुलावर एका महीलेचे दोन गोळ्यांचे गंठण चोरीला गेले असुन या बाबत बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.श्रावणी सोमवार निमित्त बेलापूर गावातील अनेक भक्तगण श्री हरिहर केशव गोविंद बन व उक्कलगाव येथे दर्शनासाठी जात असतात .आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्यामुळे गावातील अनेक भक्तगण श्री हरिहर केशव गोविंद बन येथे सकाळीच दर्शनासाठी गेले होते.गावातीलच दोन महीला दशर्न करुन घरी परतत असताना प्रवरा नदीवरील पुलावर पल्सर मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी महीलेलच्या गळ्यातील दोन तोळयाचे गंठण तोडून श्रीरामपूरच्या दिशेने धूम ठोकली.बेलापूरचे माजी सरपंच भरत साळूंके हे ही सपत्नीक देव दर्शन करुन परत येत असताना त्यांना ही घटना समजली त्यांनी लगेच चोरांचा पाठलाग केला परंतु चोरटे पसार झाले.त्यांनी तातडीने बेलापूर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली बेलापूरचे पोलीस हवालदार गणेश भिंगारदे संपत बडे यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यांमध्ये पल्सर मोटारसायकलवर दोन इसम चेहरा झाकलेल्या अवस्थेत जाताना दिसत आहे बेलापूर पोलीस स्टेशनचे हवलदार गणेश भिंगारदे यांनी तातडीने पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे यांना सूचना दिली संपत बडे हे तात्काळ श्रीरामपूरच्या दिशेने मोटारसायकल वर येणाऱ्याचा शोध घेत होते त्यांना एक तोंड बांधलेले दोन इसम मोटरसायकलवर जोरात जाताना दिसले त्यांनी त्यांना सरळ मोटरसायकल आडवी घातली मोटारसायकल आडवी घातल्यामुळे संपत बडे मोटरसायकलसह खाली पडले त्यांना किरकोळ दुखापत झाली.चौकशी केल्यानंतर ते प्रवासी असल्याचे लक्षात आले.या घटनेबाबत बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तपास करत आहेत. सध्या श्रावण महिना चालू असून अनेक महिला सोन्याचे मौल्यवान दागिने घालून देवदर्शनाकरता जात असतात त्यामुळे महिलांनी आपल्या दागिन्याची व्यवस्थित काळजी घ्यावी असेही आवाहन बेलापूर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे

श्रीरामपूर (विशेष प्रतिनिधी):नेवासा रोड, वॉर्ड नं. ०६ या शाळा आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक परिसरात सुरू असलेल्या 'क्रिस्टल कॅफे', 'एम.एच. १७ कॅफे' आणि 'स्पार्कल कॅफे' या तीन कॅफेंवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधित कॅफेंमधून काही तरुण मुला-मुलींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या वयाचे पुरावे तपासल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे.

मुले सज्ञान असली तरी कॅफे चालकांचा गुन्हा माफ होतो का?

इथे सर्वात मोठा आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होतो—ताब्यात घेतलेली मुले जर वयाने सज्ञान (१८ वर्षांवरील) असली, तरी त्यामुळे या कॅफे चालकांवर व मालकांवर होणारी कायदेशीर कारवाई शिथिल होते का?

कायद्याची पायमल्ली: व्यावसायिक परवान्याच्या (Trade License) शर्तींचा भंग करून, कॅफेच्या नावाखाली पडदे, केबिन किंवा गुप्त खोल्या तयार करून अश्लील प्रकारांना प्रोत्साहन देणे हा स्वतंत्र गुन्हा आहे.

पब्लिक न्यूसन्स व अनधिकृत वापर: महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महापालिका/नगरपरिषद नियमांनुसार, सार्वजनिक ठिकाणी किंवा व्यावसायिक जागेत सामाजिक नैतिकतेला बाधा आणणारे 'पब्लिक न्यूसन्स' निर्माण करणे हा थेट कायद्याचा भंग ठरतो. त्यामुळे तरुण सज्ञान असले तरी अवैध सोयी-सुविधा पुरवणाऱ्या चालकांचे गुन्हे ठरलेलेच आहेत.

लॉजिंगवर सील आणि गुन्हे, मग कॅफेंना वेगळा न्याय का?

काही दिवसांपूर्वी शिर्डीमध्ये अशाच प्रकारे अश्लील व बेकायदेशीर प्रकार चालणाऱ्या लॉजिंगवर प्रशासनाने थेट 'सील' ठोकून मालक व चालकांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते. मग श्रीरामपुरातील या कॅफे मालक आणि चालकांबाबत पोलीस प्रशासन मवाळ भूमिका का घेत आहे? त्यांना केवळ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०, ११७ अन्वये क्षुल्लक नोटीस देऊन सोडून देणे म्हणजेच कारवाईचा केवळ 'दिखावा' तर नाही ना?

तरुणाई आणि संस्कृती धोक्यात!

शालेय व महाविद्यालयीन वयातील तरुण पिढी या कॅफेंच्या जाळ्यात सहज बळी पडत आहे. अशा प्रकारांमुळे भारतीय संस्कृती, कौटुंबिक मूल्ये आणि शैक्षणिक वातावरण पार विस्कळीत होत चालले आहे.

पोलीस प्रशासनाला कडक इशारा:

केवळ नोटीसांचा कागदी सोपस्कार न उरकता, या कॅफेंचे परवाने रद्द करून त्यांना थेट 'सील' ठोकण्याची कठोर कारवाई पोलीस प्रशासन कधी करणार? अश्लीलतेला खतपाणी घालणाऱ्या मालक व चालकांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. प्रशासन यावर खरोखरच ठोस पाऊल उचलणार की पुन्हा थातूरमातूर कारवाईवर बोळवण करणार, याकडे संपूर्ण श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.


बेलापूर (प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत इयत्ता चौथी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे राज्यस्तरीय शिष्यवृसाईशत्ती परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविले आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव साईश याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत ३००पैकी २५६ गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत २७ वा क्रमांक मिळविला आहे. त्याचबरोबर राज्य राज्यस्तरीय ऑलिम्पियाड स्पर्धेत 200 पैकी 188 गुण मिळवून राज्यात सहावा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळवला. तसेच लक्षवेध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये 300 पैकी 278 गुण मिळवून राज्यात सातवा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. तसेच नॅशनल स्कॉलरशिप एक्झाम या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 200 पैकी 188 गुण मिळवून राज्यात नववा व जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला भारत टॅलेंट सर्च बी टी एस या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये 150 पैकी 130 गुण मिळवून राज्यात बारावा व जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळविला तसेच राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये 300 पैकी 264 गुण मिळवून राज्यात एकोणीस व जिल्ह्यात चौदावा क्रमांक मिळविला त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलिंग सदस्या मीनाताई जगधने, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सोनाली पैठणी, वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. साईश रामेश्वर ढोकणे यांच्या यशाबद्दल अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनवडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, देविदास देसाई,दिलीप दायमा,ज्ञानेश्वर गवले , नवनाथ कुताळ सुहास शेलार आदि अभिनंदन केले आहे.
हेडलाईन करा पेपर साठी

श्रीरामपूर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील (IPS) २०१६ तुकडीचे कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज अधिकारी मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. परभणी, नागपूर आणि चंद्रपूर येथे त्यांनी केलेल्या कडक कारवाईमुळे अवैध धंद्यांवर लगाम बसल्याची उदाहरणे आहेत. मात्र, श्रीरामपूर शहरातील सध्याची परिस्थिती पाहता, येथील अवैध साम्राज्याला वेसण घालणे हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आणि कसोटी ठरणार असल्याचे चित्र आहे.

​श्रीरामपूर शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर भंगार व्यवसायाच्या आडून वाहनांची बेकायदेशीर कत्तल (स्क्रॅपिंग) केली जात आहे. परिवहन विभागाची (RTO) कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हा काळा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. केंद्र शासनाने जुनी आणि भंगार वाहने मोडीत काढण्यासाठी अधिकृत स्क्रॅप केंद्रे सुरू केली असताना, श्रीरामपुरातील हे अवैध व्यावसायिक सुट्या भागांच्या (Spare Parts) विक्रीसाठी आरटीओ कार्यालयाबद्दल चुकीची माहिती देऊन नागरिकांची उघड फसवणूक करत आहेत.

​त्याहून गंभीर बाब म्हणजे, या गाड्यांच्या पार्टसचा वापर करून दुसरीच बेकायदेशीर गाडी तयार केली जाते आणि ती विकली जाते. यामुळे गुन्हेगारांना पोलिसांपासून वाचणे सोपे जाते आणि गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांसमोर प्रचंड अडचणी निर्माण होतात.

​या अवैध स्क्रॅपिंग मार्केटमध्ये रात्रीच्या अंधारात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. चांगल्या दर्जाची वाहने रात्रीतून भंगार करून, त्यांचे तुकडे करून गाड्या भरून रवाना केल्या जातात. यामध्ये अनेक गाड्या चोरीच्या, बँकांचे कर्ज बुडवून आणलेल्या किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या असण्याची दाट शक्यता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रक्रियेतून थेट गुन्ह्यांचे पुरावेच नष्ट केले जात असल्याचा संशय नाकारता येत नाही.

​सर्वसामान्य नागरिकांना आणि डोळस जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसणारा हा ‘गुन्हेगारीचा कारखाना’ प्रशिक्षण घेऊन आलेल्या आणि कायदा शिकलेल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना का दिसत नाही? हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

"स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक शहरात नेमके काय करायला येते?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​हा व्यवसाय काही प्रभावशाली घटकांच्या छत्रछायेखाली आणि प्रशासनाच्या आर्थिक फायद्यापोटी वतत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे सुरू असल्याची चर्चा सध्या शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. पोलीसच गुन्हेगारांना 'माल पसार' करण्यास मदत करतात की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.

नव्या सिंघम’कडून कारवाईची अपेक्षा!

​नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा भूतकाळातील धडाका पाहता, ते श्रीरामपूरमधील या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारीचे नेटवर्क मोडून काढणार का? स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर-तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या धाकाने तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येणार की नेहमीप्रमाणे अर्थपूर्ण तडजोडी करून हे अवैध व्यवसाय असेच सर्रास सुरू राहणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​धडाकेबाज एसपी मुम्मका सुदर्शन या 'भंगार माफियांच्या' मुसक्या आवळून श्रीरामपूरला गुन्हेगारीमुक्त करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



 

बेलापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाच्या संयुक्त मुख्य परीक्षेत बेलापूर येथील अक्षय सुरेश घाणे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत अक्षय घाणे याची कर सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलापूर बुद्रुक येथे झाले. पुढे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जे. टी. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बेलापूर येथे पूर्ण केले.

यानंतर त्याने विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथून बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवत मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले.

त्याच्या या यशाबद्दल जिल्हा नियोजन समितीचे माजी सभापती शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, तसेच पत्रकार देविदास देसाई, गीरीश परांजपे, भास्करराव खंडागळे, मारुतराव राशिनकर, दिलीप दायमा, सुहास शेलार आदींनी अभिनंदन केले आहे.

अक्षय घाणेच्या या यशामुळे बेलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी) -श्री साईबाबा  मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समिती बेलापूर तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी ग्रामीण महाविद्यालय पी एम टी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतचिकित्सा शिबिराचे तसेच सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना चायल यांनी सांगितले की श्रीरामपूर बेलापूर रोडवर असलेल्या श्री साईबाबा मंदिर  स्थापनेस दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दंत तपासणी, एक्स-रे, दात साफ करणे, दाताची कवळी बसवणे, दात काढणे, रूट कॅनल करणे, दातामध्ये सिमेंट व चांदी भरणे आदी कामे विनामूल्य केली जाणार आहे . सकाळी दहा वाजता सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी आपली नावे नोंदवावी व साई सेवा कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून दुपारी बारा ते तीन महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आलेले आहे तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष कैलास चायल, सचिव राजेंद्र लखोटिया, सहसचिव राम बिलास झंवर, उपाध्यक्ष दीपक सिकची, संजय लड्डा, प्रशांत बिहानी, एडवोकेट व्ही एम  मालपाणी, प्रमोद कर्डिले, रमेश पवार, शशिकांत कापसे, गंगाधर पवार, सयाजी कान्हे आदींनी केले आहे

बेलापूरः(प्रतिनिधी)-बेलापूर बुll ग्रामपंचायत,संत सावता महाराज मंदिर,एम.पी. सोसायटी, झेंडा चौक आदिं ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.                                                     बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने  म.फुले यांच्या प्रतिमेस माजी पंचायत समिती सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक ,शिवाजी पाटील वाबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत सावता महाराज मंदिर येथे नियोजन समितीचे माजी सभापती शरद नवले व बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.बेलापुर विविध कार्यकारी संस्थेतही महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.म.फुले जयंतीचा मुख्य सोहळा छ.शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला.येथे म.फुले यांचेसह डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ,छञपती शाहू महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले.
       याप्रसंगी क्रांतीसूर्य म.ज्योतिबा फुले जयंती निमित्त समता परिषद बेलापूर व क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समीती व तरुण मंडळाच्या वतीने धार्मिक कार्यातील योगदानाबद्दल कै. गणपत (मामा) टेकाडे मंडळ , सामाजिक कार्याबद्दल माऊली वृद्धाश्रमाच्या सौ. कल्पना सुभाष वाघुंडे, 
, व्यसनमुक्ती व जनजागृती अभियानाबद्दल  नवनाथ कुताळ , सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री. अशोक राशिनकर , पत्रकारिता व अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल देविदास देसाई , शेतीविषयक उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल .किशोर राऊत  , गोरक्षक समितीच्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री.ऋषिकेश भागवत
सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दलश्री.बागवान रफिक अध्यात्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.एकनाथ रोकडे 
,व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल श्री.कचरू तुकाराम शिंदे
    आदींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या जयंती सोहळ्यास माजी जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, जेष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर,समता परिषदेचे सरचिटणीस प्रकाश कुर्हे, सावता महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष जालिंदर कुऱ्हे, माजी सरपंच भरत साळुंके, राजेंद्र सातभाई, बेलापूर सोसायटीचे चेअरमन अशोक कुऱ्हे, चंद्रकांत नाईक , पुरुषोत्तम भराटे, राजेंद्र टेकाडे , सोमनाथ शिरसाठ, संदीप कुऱ्हे, चेतन कुऱ्हे, सचिन मेहेत्रे, दत्ता कुऱ्हे, अमोल अनाप, बाळासाहेब लगे, एकनाथ नागले, विशाल मेहत्रे, विशाल लोंढे, सुरेश जाधव, सचिन नगरकर, वैभव कुऱ्हे, तुषार कुऱ्हे, कुणाल कुऱ्हे ,शरद पुजारी, शरद कुऱ्हे, शरद गायकवाड, अच्युत कुऱ्हे, बाळासाहेब लगे,सोमनाथ लगे, अरुण कुऱ्हे, देविदास घाणे, भाऊसाहेब तेलोरे, मधुकर अनाप ,मारुती राशिनकर, सुहास शेलार ,दिलीप दायमा आदीसह
विविध  संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य  सोसायटीचे पदाधिकारी, सावता मंडळाचे  व क्रांतीज्योती म.फुले जयंती उत्सव समितीचे सदस्य समता परिषदेचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कु्र्हे यांनी केले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील एका मोबाईल दुकानात फोड करून चोरी करणाऱ्या दोन आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातून सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ७ परिसरातील रहिवासी व मोबाईल दुकान व्यावसायिक राकेश काटारिया (वय ३२) यांच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून विविध मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरी केल्या होत्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १८९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ व ३३१ (३)(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना तपास पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १) बलदेव सिंग मंचर सिंग टाक (वय २०) व २) विशाल भरत बोरुडे (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मोबाईल अ‍ॅक्सेसरीज जप्त केल्या.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपनीचे मोबाईल चार्जर, इअरबड्स, हेडफोन, डेटा केबल, कार चार्जर, स्पीकर व इतर साहित्याचा समावेश असून एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे साहेब तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेका / जयवंत तोडमल, पोहेकों/भागवत शिंदे, पोकों/संपत बडे, पोकॉ/अमोल पडोळे, पोकॉ/संभाजी खरात, पोकों/सागर बनसोडे, पोकों/मच्छिंद्र कातखडे, पोकों/अजित पटारे, पोकों/सचिन दुकळे, पोकॉ रामेश्वर तारडे, पोकों/अमोल गायकवाड, पोकों/पांडुरंग चौधरी, पोकों/गणेश तुपे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकों/जयवंत तोडमल हे करीत आहेत.

बेलापूर ( प्रतिनिधी)-देवा धर्माच्या नावाखाली सर्व सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून दैवी शक्तीच्या आधारे विविध आजार बरे करण्याचे खोटे आश्वासन देऊन कुणी बाबा बुवा आर्थिक, शारीरिक, मानसिक फसवणूक करत असेल तर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समीतीशी संपर्क साधवा असे आवाहन अंनिसचे देविदास देसाई यांनी केले आहे.                                     महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला असला तरी श्रीरामपूर तालुक्यासह अहिल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भोंदूगीरी केली जात आहे भूत ,जादूटोणा,करणी काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे या भोंदू बाबाकडे जाणार्ऱ्यामध्ये महीलांचे प्रमाण मोठे आहे.त्याचा गैरफायदा घेऊन सर्वच धर्मात पसरलेले हे भोंदु बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याच्या तक्रारी समितीकडे आलेल्या आहेत.जिल्ह्यात पसरलेल्या या भोंदू बाबाचा अंनिसच्या वतीने भांडाफोड करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.त्यामुळे अंधश्रद्धेतून फसवणूक झालेल्यांनी ,देविदास देसाई बेलापूर तालुका श्रीरामपूर या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.आपले नाव गुप्त ठेवले जाईल . श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात भोंदूगिरी करणाऱ्या भोंदू बुवा बाबाचे मोठे जाळे पसरले आहे  अंनिसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत जिल्ह्यात भोंदूगिरी करणाऱ्या बाबा बुवावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.लवकरच श्रीरामपूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात येणार असुन अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य करण्याची ज्यांना आवड असेल त्यांनी अंनिसशी संपर्क साधावा असेही आवाहनही देसाई यांनी केले आहे.

बेलापूर(प्रतिनिधी)-बेलापूर- श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  वाळत चालली असून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे अखेर बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुप बेलापूर यांनी झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली.या उपक्रमाचे  वृक्षप्रेमीकडून  कौतुक केले जात आहे.                                            माजी आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून  बेलापूर -श्रीरामपूर रस्त्याचे चौपदरीकरण होवून  दुभाजकामध्ये  वृक्षारोपण करण्यात आले होते.काही काळ त्याचे संगोपन ही व्यवस्थित झाले. परंतु आता कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी न मिळाल्यामुळे अपार मेहनत घेऊन जगवलेली ही झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. याप्रमाणेच बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचीही दुरवस्था झाली आहे.याकडे बेलापूर ग्रामपंचायत सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपने  प्रशासनाचे लक्ष वेधले होते परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.अखेर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष  शरद नवले यांच्या पुढाकाराने बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली.बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या                                              टँकरव्दारे पाणी दिले जात असून यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, अविनाश शेलार,दत्तात्रय वक्ते,सुमित शेलार आदी परिश्रम घेत आहेत.                 बेलापूर-श्रीरामपूर  रस्त्याचे दुतर्फा पावसाळ्यामध्ये झाडे लावण्याचा ठेका एका ठेकेदारांनी घेतला. त्याने पावसाळ्यात ती झाडे लावली देखील परंतु त्यानंतर लावलेल्या झाडांची देखभाल न केल्याने झाडांची दूरवास्था होत आहे. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा ठेका घेतलेला असेल त्या ठेकेदाराकडून   जळून गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लागवड करावी.तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करावे याबाबत संबंधित ठेकेदाराला सुचना देण्याची मागणी बेलापूर बु ग्रामपंचायतीसह सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य संजय भोंडगे, विष्णुपंत डावरे,देविदास देसाई,अभिषेक खंडागळे, राधेश्याम अंबिलवादे,बाबासाहेब काळे,राजेंद्र कर्पे,भगीरथ मुंडलिक, दिलीप अमोलिक,बाबुलाल पठाण,विशाल आंबेकर, सचिन कणसे,हाजी इस्माईल शेख, इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,विलास नागले,प्रा निजाम शेख, सचिन देवरे,पुंजाहरी सुपेकर, महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे,जाकीर शेख,महेश ओहोळ,किशोर दायमा,गोपी दाणी, दिलीप दुधाळ,अर्जुन डुकरे,राहुल माळवदे,सलीम शेख आदींनी केली आहे.

लोणी खुर्द (प्रतिनिधी):राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथे गट नंबर 60 मधील शेतकऱ्यांना शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाविरोधात उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला आहे. रस्ता बंद झाल्याने शेतीकाम तसेच दैनंदिन हालचालींमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गट नंबर 60 परिसरातील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू असताना अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईदरम्यान शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा जुना रस्ता काढून टाकण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. हा रस्ता लहानपणापासून तसेच त्यांच्या आजोबांच्या काळापासून वापरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2026 रोजी जलसंधारण अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. त्यावेळी लवकरच रस्ता उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान गट नंबर 61, 62, 65, 66, 67, 68, 69, 70 व 71 या शेतकऱ्यांसाठी ओढ्यातील रस्त्याचा काही भाग कायम ठेवण्यात आला असून गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता मात्र अर्धवट काढून टाकण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

सध्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना शेजारील शेतातील मका पिकातून जावे लागत आहे. दूध काढण्यासाठी पहाटे व रात्रीही त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे जीवितास धोका असल्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर गणेश रमेश काळवाघे, शुभम दत्तात्रेय आहेर आणि निखिल अनिल आहेर यांनी 7 मार्च 2026 पासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गट नंबर 60 कडे जाणारा रस्ता उपलब्ध करून दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


बेलापूर ( प्रतिनिधी)-देव अंगात संचारला असे भासवून काही भोंदू बाबा आलेल्या भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करत असल्याच्या बेलापूर व परिसरात चर्चा सुरू असुन अशा प्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबा संदर्भात काही तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिसच्या  राज्य सचिव एडवोकेट रंजनाताई गवांदे, बाबा आरगडे ,देविदास देसाई यांनी केले आहे.       या बाबत अंनिसच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात गवांदे, आरगडे ,देसाई यांनी पुढे म्हटले आहे की बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महीलांचे लैंगिक शोषण केल्याची परिसरात चर्चा असुन बाबांच्या भितीपोटी व इज्जतीमुळे महीला तक्रार देण्यास पुढे येत नाही.ज्या महीलांची आर्थिक शारीरिक फसवणूक झाली असेल अशा महीलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी अथवा पोलीस 

स्टेशनमध्ये संपर्क साधावा त्या भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन त्याचेवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल . संबंधित भोंदू बाबा विरुद्ध कारवाई करण्याच्या दृष्टीने अंनिसने पावले उचलली असुन त्या भोंदू बाबाने आलेल्या भक्तांकडून मोठ्या रकमा वसुल केल्या असल्याची ही परिसरात चर्चा असुन या बाबाकडे येणाऱ्या मध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचा भरणा आहे.  राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली हा बाबा महीलांचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती अंनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाली असुन त्या भोंदू बाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावे देखील उघड केली जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर अंनिसच्या राज्य सचिव अँड रंजना ताई गवांदे ,बाबा आरगडे, देविदास देसाई ,छायाताई बंगाळ आदिच्या सह्या आहेत.


शिर्डी : शिर्डीतील एका हॉटेलच्या भाडेकरार वादप्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हॉटेल मालक सुनील तोलानी यांच्या मुलास नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही दिवसापूर्वी नागपूर पोलिसांची टीम शिर्डीत दाखल होऊन संबंधित कारवाई केल्याचे समजते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आर्थिक व्यवहार आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाडेकरारातील अटी, आर्थिक देवाणघेवाण तसेच तृतीय पक्षाशी झालेले व्यवहार याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर येथील बजाज नगर परिसरातील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधितास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झाले नसले तरी या घडामोडीमुळे संबंधित प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयीन निर्णयानंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.


बेलापूरच्या 'सत्यमेव जयते' ग्रुपची पाणी देण्याची आग्रही मागणी!

बेलापूर (प्रतिनिधी):

बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकामध्ये लावलेली तसेच दुतर्फा लावलेली झाडे वेळेवर पाणी न दिल्यामुळे  जळून चालली आहेत.त्याचबरोबर  झाडांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळया देखील गायब झालेल्या आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने झाडांचे संगोपन होईल अशी व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी बेलापूर येथील 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या वतीने पत्रकार देविदास देसाई यांनी केली आहे.

सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की पर्यावरणाचे संतुलन रहावे त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस समोरुन येणाऱ्या वाहनांच्या प्रखर लाईटच्या प्रभाव पडू नये या करीता कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता दुभाथकामध्ये ही झाडे लावण्यात आली होती. सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असून झाडांना वेळेवर पाणी न दिल्यामुळे झाडे वाळत चालली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावुन त्यां झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराला देण्यात आली होती.पावसाळ्यात संबंधीत ठेकेदाराने झाडे लावली पण नंतर त्या झाडाकडे ढुंकूनही पाहीले नाही. लावलेल्या झाडापैकी केवळ पाच दहा टक्केच झाडे कशीबशी तग धरुन आहे. अनेक झाडे पूर्णपणे वाळली असून, काही शेवटच्या घटका मोजत आहेत. शासनाचा पैसा खर्च करून लावलेली ही झाडे जगविणे  संबधीत ठेकेदाराची जबाबदारी आहे.

या संदर्भात 'सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुप' च्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या झाडांना टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि त्यांची योग्य निगा ठेवावी, असे आवाहन केले आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर सर्व झाडे नष्ट होतील, व केलेला खर्च वाया जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या या ग्रुपने प्रशासनाला तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला झाडाला पाणी देण्याबाबत आदेश करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.या निवेदनावर देविदास देसाई सह अभिषेक खंडागळे ,राधेश्याम अंबिलवादे, संजय भोंडगे, हाजी इस्माईल शेख ,इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,सचिन वाघ,विष्णुपंत डावरे ,किरण शेलार,दिलीप अमोलिक, भगीरथ मुंडलीक ,विलास नागले,प्रा निजाम शेख,सचिन देवरे,सचिन कणसे, पुंजाहरी सुपेकर,महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे, बाबुलाल पठाण, जाकीर शेख, रवींद्र करपे, विशाल आंबेकर, महेश ओहोळ, गोपी दाणी, दिलीप दुधाळ,बाबासाहेब काळे,अर्जुन डूकरे आदिंसह सदस्यांनी केले आहे

बेलापूर(प्रतिनिधी ): येथील छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळाचे १९वे वर्ष असून शिवजयंती निमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.                                                       शुक्रवार (६मार्च) रोजी स.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन तसेच संध्याकाळी ६वा.महाआरती  व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (७मार्च) रोजी संध्याकाळी ६वा. प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संग्रामबापू भंडारे यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे.सदरचे  कार्यक्रम वीर सावरकर चौक,नगररोड, बेलापूर बु|| याठिकाणी होणार आहेत.तरी याप्रसंगी शिवप्रेमी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन छञपती तरुण मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget