श्री साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन -चायल
बेलापूर( प्रतिनिधी) -श्री साईबाबा मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समिती बेलापूर तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी ग्रामीण महाविद्यालय पी एम टी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतचिकित्सा शिबिराचे तसेच सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना चायल यांनी सांगितले की श्रीरामपूर बेलापूर रोडवर असलेल्या श्री साईबाबा मंदिर स्थापनेस दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून मंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दंत तपासणी, एक्स-रे, दात साफ करणे, दाताची कवळी बसवणे, दात काढणे, रूट कॅनल करणे, दातामध्ये सिमेंट व चांदी भरणे आदी कामे विनामूल्य केली जाणार आहे . सकाळी दहा वाजता सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी आपली नावे नोंदवावी व साई सेवा कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असून दुपारी बारा ते तीन महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आलेले आहे तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष कैलास चायल, सचिव राजेंद्र लखोटिया, सहसचिव राम बिलास झंवर, उपाध्यक्ष दीपक सिकची, संजय लड्डा, प्रशांत बिहानी, एडवोकेट व्ही एम मालपाणी, प्रमोद कर्डिले, रमेश पवार, शशिकांत कापसे, गंगाधर पवार, सयाजी कान्हे आदींनी केले आहे


Post a Comment