बेलापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाच्या संयुक्त मुख्य परीक्षेत बेलापूर येथील अक्षय सुरेश घाणे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत अक्षय घाणे याची कर सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलापूर बुद्रुक येथे झाले. पुढे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण जे. टी. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बेलापूर येथे पूर्ण केले.
यानंतर त्याने विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथून बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवत मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले.
त्याच्या या यशाबद्दल जिल्हा नियोजन समितीचे माजी सभापती शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, तसेच पत्रकार देविदास देसाई, गीरीश परांजपे, भास्करराव खंडागळे, मारुतराव राशिनकर, दिलीप दायमा, सुहास शेलार आदींनी अभिनंदन केले आहे.
अक्षय घाणेच्या या यशामुळे बेलापूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment