शिर्डीतील हॉटेल भाडेकरार वादाला गंभीर वळण; मालकाच्या मुलास नागपूर पोलिसांचा ताबा*?


शिर्डी : शिर्डीतील एका हॉटेलच्या भाडेकरार वादप्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. हॉटेल मालक सुनील तोलानी यांच्या मुलास नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही दिवसापूर्वी नागपूर पोलिसांची टीम शिर्डीत दाखल होऊन संबंधित कारवाई केल्याचे समजते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आर्थिक व्यवहार आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाडेकरारातील अटी, आर्थिक देवाणघेवाण तसेच तृतीय पक्षाशी झालेले व्यवहार याबाबत सध्या सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, नागपूर येथील बजाज नगर परिसरातील पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संबंधितास ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे.

अधिकृत निवेदन अद्याप जाहीर झाले नसले तरी या घडामोडीमुळे संबंधित प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायालयीन निर्णयानंतरच संपूर्ण प्रकरणाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget