बेलापूर बुll ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपच्यावतीने रस्त्याच्या दुभाजकातील झाडांसाठी पाण्याची व्यवस्था

बेलापूर(प्रतिनिधी)-बेलापूर- श्रीरामपूर रस्त्याच्या दुभाजकात लावलेली झाडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  वाळत चालली असून वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यामुळे अखेर बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुप बेलापूर यांनी झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली.या उपक्रमाचे  वृक्षप्रेमीकडून  कौतुक केले जात आहे.                                            माजी आमदार लहू कानडे यांच्या विशेष प्रयत्नातून  बेलापूर -श्रीरामपूर रस्त्याचे चौपदरीकरण होवून  दुभाजकामध्ये  वृक्षारोपण करण्यात आले होते.काही काळ त्याचे संगोपन ही व्यवस्थित झाले. परंतु आता कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी न मिळाल्यामुळे अपार मेहनत घेऊन जगवलेली ही झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. याप्रमाणेच बेलापूर-श्रीरामपूर रस्त्याचे दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांचीही दुरवस्था झाली आहे.याकडे बेलापूर ग्रामपंचायत सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपने  प्रशासनाचे लक्ष वेधले होते परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.अखेर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष  शरद नवले यांच्या पुढाकाराने बेलापूर बु ग्रामपंचायत व सत्यमेव जयते ग्रुपने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली.बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या                                              टँकरव्दारे पाणी दिले जात असून यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब प्रधान, अविनाश शेलार,दत्तात्रय वक्ते,सुमित शेलार आदी परिश्रम घेत आहेत.                 बेलापूर-श्रीरामपूर  रस्त्याचे दुतर्फा पावसाळ्यामध्ये झाडे लावण्याचा ठेका एका ठेकेदारांनी घेतला. त्याने पावसाळ्यात ती झाडे लावली देखील परंतु त्यानंतर लावलेल्या झाडांची देखभाल न केल्याने झाडांची दूरवास्था होत आहे. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा ठेका घेतलेला असेल त्या ठेकेदाराकडून   जळून गेलेल्या ठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लागवड करावी.तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करावे याबाबत संबंधित ठेकेदाराला सुचना देण्याची मागणी बेलापूर बु ग्रामपंचायतीसह सत्यमेव जयते ग्रुपचे सदस्य संजय भोंडगे, विष्णुपंत डावरे,देविदास देसाई,अभिषेक खंडागळे, राधेश्याम अंबिलवादे,बाबासाहेब काळे,राजेंद्र कर्पे,भगीरथ मुंडलिक, दिलीप अमोलिक,बाबुलाल पठाण,विशाल आंबेकर, सचिन कणसे,हाजी इस्माईल शेख, इरफान शेख, किरण गागरे, दिपक क्षत्रिय,विलास नागले,प्रा निजाम शेख, सचिन देवरे,पुंजाहरी सुपेकर, महेश कुऱ्हे, सोमनाथ जावरे,जाकीर शेख,महेश ओहोळ,किशोर दायमा,गोपी दाणी, दिलीप दुधाळ,अर्जुन डुकरे,राहुल माळवदे,सलीम शेख आदींनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget