July 2024

कोपरगांव (गौरव डेंगळे):वयाच्या ५५ व्या वर्षी सोमैय्या विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम डियम स्कूलचे मराठी विभाग प्रमुख बी के तुरकणे कळसुबाई शिखर सर केले.

कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत राज्यातील सर्वात उंच शिखर असून, समुद्रसपाटीपासून त्याची उंची १६४६ मी. इतकी आहे. शिखरावर चढाई करण्यास कठीण वाट आहे.अशा खडतर मार्गाने तुरकणे या ५५ वर्षाच्या ज्येष्ठ शिक्षकाने २ तास ४२ मिनिटांत कळसुबाई शिखर सर केले.याआधीही त्यांनी ब्रह्मगिरी, शिवनेरी, देवगिरी किल्ले सर केले असून, लहान वयात ट्रेकिंगची त्यांना आवड असून, जिद्दीने शिखर चढाई करतात. त्यांना योगाची ही आवड आहे.रोज सकाळी ते नियमित २१ सूर्यनमस्कार देखील करतात. त्यांच्या या यशस्वी कळसुबाई शिखर चढाई बद्दल त्यांचे शाळेचे प्राचार्य श्री के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे,सौ नथलीन फर्नांडिस तसेच शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

गौरव डेंगळे (२९/७) :भारतीय नेमबाज मनू भाकरनं इतिहास रचला आहे. मनूनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं.भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज आहे. मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे. तिनं शेवटच्या टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदार्पण केलं होतं, परंतु १० मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल खराब झालं. यामुळे तिला मागच्या वेळी पदक जिंकता आलं नव्हतं.मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २२१.७ गुणांसह कांस्यपदक जिंकलं. अंतिम फेरीत मनूनं सुरुवातीपासून तिसरं स्थान कायम राखलं. या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदकं दक्षिण कोरियाच्या दोन खेळाडूंनी जिंकली. ओ ये जिननं २४३.२ गुणांसह सुवर्णपदक जिंकलं तर किम येजीनं २४१.३ गुणांसह रौप्य पदक जिंकलं.मनू भाकरनं पात्रता फेरीतही तिसरं स्थान पटकावले होतं. नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. यासह तिनं नेमबाजीत भारताचा १२ वर्षांचा पदकांचा दुष्काळही संपवला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदकं जिंकली होती.

२२ वर्षीय मनू भाकरनं पॅरिस २०२४ ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल, १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतला आहे.२१ सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी इतक्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे.२०२३ आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात पाचव्या स्थानावर राहून मनूनं भारतासाठी पॅरिस २०२४ ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे. गोल्ड कोस्ट २०१८ मध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे.

हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. याशिवाय तिनं ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्येही भाग घेतला, ज्यातं तीनं राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली आहेत. बॉक्सिंगदरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला. पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली.रिओ ऑलिम्पिक २०१६ नुकतंच संपलं असताना मनूनं वयाच्या १४ व्या वर्षी नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आठवडाभरात तिनं वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं. यानंतर वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेऊन दिली. याच निर्णयानं मनू भाकरला ऑलिम्पियन बनवलं.

सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा अन्यथा काम बंद अंदोलन छेडणार - देसाई

मागण्या वरीष्ठांना कळविल्या, सर्व्हअर तातडीने सुरळीत होईल - मिलींदकुमार वाघ भोकर(वार्ताहर) - सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानच्या ई पॉझ मशीनचे सर्व्हअर तातडीने दुरूस्ती करा, धान्य वितरणास मुदत वाढ द्या, गेल्या चार महिण्यांपासूनचे थकीत कमीशन द्या अन्यथा कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या महिण्यापासून मोफत धान्य लाभार्थी रेशनकार्ड धारकांच्या प्रत्येक सदस्याचे याच ई पॉझ मशीनवर ई के वाय सी करण्याचे आदेश आले त्याप्रमाणे कामकाजास सुरूवात झाली अन् ई पॉझ मशीन बाबतच्या तक्रारी सुरू झाल्या. ई के वाय सी करताना अनेकदा मशीन रिस्टार्ट होत आहे. अनेकदा सवर्हअर डावून होत आहे. लाभार्थीचा थम्स आला नाही तर प्रत्येक थम्सच्या वेळी आधार क्रमांक टाकावा लागत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपुर्वी आलेल्या नवीन व्हर्जन मध्ये प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागत आहे, प्रत्यक्षात जेथे दुकानदारांचा व लाभार्थींचा थम्स असतो तेथे पासवर्ड ची गरज नसताना केवळ मानसिक त्रास देण्यासाठी हा पासवर्ड टाकल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

गेल्या महिण्यातील सर्व्हअरच्या तक्रारीरींच्या तुलनेत या महिण्यात सर्व्हअरच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने धान्य वितरणास हि मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून सर्व्हअर डावून मुळे हि यंत्रणाच कोलमडली आहे. दररोज दुकानदार दुकान उघडून बसत आहेत पण या सर्व्हअरच्या अडचणीमुळे लाभार्थी धान्यासाठी व ई के वाय सी करीता दुकानात चकरा मारत आहेत. पर्यायाने दुकानदार अन् लाभार्थीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसत आहेत. या ई के वाय सी व धान्यासाठी अनेक लाभार्थींना आपल्या रोजंदारीला मुकावे लागत आहेत. पर्यायाने दुकानदार व लाभार्थीमध्ये हा वादाचा मुद्दा ठरत आहे.

या सर्व अडचणी सोडविण्यासाठी श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दि. 3 जुलै रोजी यात दुरूस्ती करण्याची मागणीचे निवेदन दिलेले असताना या सर्व्हअरच्या अडचणी वाढल्याने संतप्त दुकानदारांनी आता या सर्व्हअरमध्ये तातडीने दुरूस्ती न झाल्यास कुठलीही पुर्व सुचना न देता काम बंद अंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे. त्याच बरोबर सर्व्हअर अडचणीमुळे अनेक दुकानदारांचे धान्य वितरण शिल्लक असल्याने हे धान्य वितरणास ऑगष्ट पर्यंत मुदतवाढ द्यावी व गेल्या चार महिण्यापासून स्वस्त धान्य दुकानदारांना कमीशन मिळालेले नाही ते त्वरीत दुकानदारांना अदा करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, शहराधयक्ष प्रकाश गदीया, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड, चंद्रकांत गायकवाड, धनु झिरंगे, राजेंद्र वाघ आदिंसह तालुक्यातील दुकानदारांच्या सह्या आहेत.

ई पॉझ चे सर्व्हअर लवकरच सुरळीत होईल - तहसिलदार वाघ

सर्व्हअरच्या अडचणींसह दुकानदारांच्या सर्व अडचणी वरीष्ठांना कळविण्यात आल्या असून तातडीने सर्व्हअर दुरूस्तीच्या सुचना संबधीतांना देण्यात आल्या असून उर्वरीत अडचणी ही तातडीने सोडविण्यात येईल असे आश्वासन यावेळी तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी दिले.

सर्व्हअर तातडीने दुरूस्ती न झाल्यास ई पॉझ मशीन शासनाकडे जमा करणार - देसाई, पठाण

प्रत्यक्षात अनेकदा रेशनकार्डधारक कुटूंबातील सर्व सदस्यांसह रेशन दुकानात ई के वाय सी करण्यासाठी व धान्य घेण्यासाठी येतात त्यावेळी सर्व्हअर डावून असल्याने दुकानदार व कार्डधारकांत चांगलेच वाद होतात अशा वेळी कार्डधारक दुकानदारांना विनाकारण शिव्याशाप देत असल्याने दुकानदार ही या प्रकारे त्रस्त झालेला असल्याने आमच्या अडचणी तातडीने न सुटल्यास व तातडीने सर्व्हअर दुरूस्ती होवून वितरण सुरळीत न झाल्यास लवकरच जिल्ह्यातील सर्व दुकानदार हे ई पॉझ मशीन शसनाकडे जमा करणार असल्याचे इशारा जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई व जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी दिला आहे.

सर्व्हअर अडचणी सोबत इतर अडचणींचे निवेदन तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांना देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई समवेत चंद्रकांत झुरंगे, मंगेश छतवाणी, आजीज शेख, जाकीर शेख, प्रेम छतवाणी, बाळासाहेब राठोड आदिंसह दुकानदार दिसत आहेत.

👉 राज्यभरातून ७० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग!

कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २३ जुलै २०२४ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपूण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ३५ शाळेतील ७० उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ उज्वला भोर प्राचार्या एस.एस.जी.एम.कॉलेज कोपरगाव होत्या.तर बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी शाळेचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नथलीन फर्नांडिस यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक योगेश शिंदे,विमल राठी,वृषाली कुलकर्णी हे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन,माननीय प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

संत विवेकानंद इंग्लिश स्कूल, अहिल्यानगर ₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, अकोले 

₹ २,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी  ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 सेंट जॉन् इंग्लिश मिडियम स्कूल,राहता

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण(स्पेशल सेमी)

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

आत्मा मालिक मिलेट्री स्कूल गुरुकुल, कोकमठाण.

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल कोऱ्हाळे 

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यभरात सुरू असून त्यासाठीचे फॉर्म भरून घेण्याचे काम सर्वत्र सुरू आहे.

श्रीरामपूर शहरात देखील नगरपालिकेने यासाठी जोरदार तयारी केली असून मेन रोडवरील लोकमान्य टिळक वाचनालयातील आगाशे सभागृह येथे तसेच शहरातील सर्व नगरपालिका शाळा, संजय नगर भागातील मुळे शाळा व मिनी स्टेडियम मधील नगरपालिकेच्या उपकेंद्रात देखील या योजनेचे फॉर्म विनामूल्य भरून घेतले जात आहेत.

आगाशे सभागृहामध्ये नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी, वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती स्वाती पुरे यांच्या देखरेखीखाली त्यांची संपूर्ण टीम सदर योजनेचे फॉर्म भरणे कामी अग्रेसर आहे.यामध्ये स्वतः स्वाती पुरे,सिद्धार्थ गवारे,स्वप्निल माळवे,विजय झिंगारे, राजेश जेधे,दिशा बोरकर,साक्षी अहिरे,पूजा क्षत्रिय, राजेंद्र बोरकर हे सर्व काम करीत आहेत. महिला वर्गाचे फॉर्म भरून घेऊन जागेवरच अपलोड केले जात आहेत. त्यासाठी आगाशे सभागृहामध्ये वायफाय व राऊटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आत्तापर्यंत या केंद्रावर 750 पेक्षा जास्त फॉर्म भरून झाले आहेत.शहरातील इतर केंद्रातील सर्व फॉर्म येथे जमा केले जात आहेत तसेच नगरपालिकेचे बालवाडी विभागातील कर्मचारी देखील घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत.खाजगी किंवा इतर ठिकाणी संगणकावर भरले जाणारे फॉर्म ची हार्ड कॉपी येथे जमा केली जात आहे. येणाऱ्या महिला भगिनींना अत्यंत चांगली सेवा येथे मिळत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.

शहरामध्ये काही ठिकाणी पैसे घेऊन फॉर्म भरले जात आहेत त्यातही ओटीपी येत नसल्याने अनेकांना दोन दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. त्यापेक्षा नगरपालिकेच्या आगाशे सभागृहातील केंद्रावर मोठी टीम कार्यरत असून येथे मोफत फॉर्म भरले जात आहेत तसेच वायफाय सुविधा उपलब्ध असल्याने ओटीपी वगैरे सुद्धा पटकन येत आहेत.तरी शहरातील मुख्यमंत्र्यांच्या लाडके बहिणींनी या ठिकाणी येऊन आपले फॉर्म भरावेत तसेच समवेत अर्जात नमूद केल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे आणावीत. जागेवर ती अपलोड केली जातात.या केंद्रावरील कर्मचारी स्वतः फॉर्म भरून घेत आहेत.तरी अद्याप भगिनींनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ते त्वरित भरावेत. फॉर्म भरण्यासाठी येताना स्वतःचा मोबाईल सोबत आणावा असे आवाहन ग्रंथपाल स्वाती पुरे यांनी केले आहे.

बेलापूर :(प्रतिनिधी  )-श्रीरामपुर तालुक्यातील उक्कलगाव येथील ग्रामस्थांनी गावठी दारु विक्रीस बंदी घातल्यानंतर दारुचे व्यसन लागलेले दारु पिण्यासाठी शेजारच्या गावात जात असुन दारु पिऊन येत असताना दोन दुचाकीची धडक होवुन एक जण गंभीर जखमी झाला आहे.       ही घटना काल रात्री घडली दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले कोल्हार-बेलापूर 

ररत्यावरील शिंदे वस्तीजवळ ही घटना घडली. 

    या अपघातातील पाच जणांना पुढील उपचारासाठी 108 मधून लोणी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी एकास शिर्डी येथे अतिदक्षता विभागात तसेच एकाला नगर येथे हलविण्यात आले.एकाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असल्याने संगमनेर येथे हलविण्यात आले.त्यांनतर पुढील उपचार घेतल्यांनतर त्यास घरी सोडून देण्यात आले.विशेष म्हणजे शुक्रवारी रात्री नऊ 

वाजेच्या सुमारास गावातील तीन जण एकाच 

दुचाकीवर गळनिब येथून दारु पिऊन घरी चालले 

होते.त्याबरोबर गावातीलच दोन जण गळनिबकडे दारु पिण्यासाठी चालले असता यांच्या दोन दुचाकीच्या समोरासमोर धडक झाली या अपघातात पाच गंभीर जखमी झाले.या अपघातातील दोन जण लोणी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते.दोन दुचाकीची धडक झाल्यानंतर  मोठा आवाज झाला त्या आवाजाने वस्तीवरील नागरीकांनी रस्त्याकडे धाव घेतली.रात्रीची वेळ असल्यामुळे 108 रुग्णवाहिकेला भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली.काही वेळातच रुग्णवाहिका आल्यानंतर जखमीना त्वरित लोणी येथे पाठविण्यात आले.अपघातग्रस्त दुचाकी शिंदेवस्ती येथे लावण्यात आल्या असून पाच जणांची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे.मात्र काही तरुण दुसऱ्या गावात दारू पिण्यासाठी जातात अन असे अपघात घडतात.यामुळे उक्कलगावाप्रमाणेच आसपासच्या गावातही दारुबंदी  व्हावी,अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले (उपाध्यक्षपदी लांडगे व बनकर; सचिव लोखंडे, सहसचिव देसाई)श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी प्रा. ज्ञानेश गवले , उपाध्यक्षपदी चंद्रकांत लांडगे व साईनाथ बनकर,सचिवपदी दिलीप लोखंडे, सहसचिवपदी देविदास देसाई आणि खजिनदारपदी अमोल कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, अशी माहिती परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.


परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेच्या श्रीरामपूर तालुका कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.


नूतन कार्यकारिणीत सदस्य म्हणुन सर्वश्री भाऊसाहेब काळे, बी. आर. चेडे, बापु नवले, भरत थोरात, दिपक क्षत्रिय, मयुर गव्हाणे आणि सचिन उघडे यांचा समावेश आहे. सल्लागारपदी सर्वश्री अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड, प्रकाश कुलथे,रविंद्र भागवत, महेश माळवे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, बाळासाहेब आगे,

करण नवले, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 या निवडीप्रसंगी तालुक्यातील सर्वश्री अशोक अभंग,लालमहंमद जहागीरदार, महेश रक्ताटे,अमोल बोर्डे, दिलीप तांबे, विकास बोर्डे, प्रविण दरंदले,व्ही.डी.देवळालकर, दिलीप दायमा, अतिश देसर्डा, र्विश्वनाथ जाधव,आदी उपस्थित होते.


नूतन पदाधिकारी कार्यकारीणीचे मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार  हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे, सह निमंत्रक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-व्हाँट्सअप गृपच्या माध्यमातून रुग्णाच्या उपचाराकरीता जमा केलेला निधी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते वाघ कुटुंबीयांना देण्यात आला      नेवासा तालुक्यातील दगडू मुरलीधर वाघ हे आजारी पडले आगोदरच मोलमजुरी करुन गुजराण करणाऱ्या वाघ कुटुंबीयावर जणू आभाळच कोसळले त्यांचा मुलगा प्रशांत याने वडीलास प्रवरानगर येथील दवाखान्यात दाखल केले त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले परंतु सततच्या आजारपणामुळे वाघ कुटुंबीय पुर्णतः हवालदिल झाले होते घरातील कर्त्या माणसाचा दवाखान्याचा खर्च कसा भागवावा हीच चिंता वाघ कुटुंबीयांना पडली होती ही बाब बेलापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार  देविदास देसाई  यांना समजली त्यांनी तातडीने प्रशांत मुरलीधर वाघ याचा फोन पे नंबर देवुन एक हात मदतीचा म्हणून आपण यथा योग्य गरीब कुटुंबाला मदत करावी असे अवाहन केले त्यांच्या अवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी सढळ हाताने मदत केली दुर्दैवाने दगडू वाघ यांचे उपचार सुरु असतानाच निधन झाले त्यांचे निधन झाल्याचे समजल्यावरही अनेकांनी त्या कुटुंबाला एक हात मदतीचा देण्याच्या उद्देशाने मदतनिधी पाठविला हा निधी कै .दगडू वाघ यांच्या दशक्रिया विधीच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते देविदास देसाई यांनी जमा झालेला निधी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते कै दगडू वाघ यांच्या पत्नी मिनाताई वाघ यांच्याकडे सूपुर्त केला राबविलेला स्तूत्य उपक्रम पाहुन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील आपली वैयक्तिक मदत दिली तसेच असे सामाजिक उपक्रम सर्वत्र राबविण्याची गरज आहे आपल्या छोट्याशा मदतीमुळे एखाद्याचा जिवा वाचु शकतो एखाद्या कुटुंबाला आधार मिळु शकतो असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले

श्रीरामपुर  (प्रतिनिधी  )-आपल्या विविध मागण्या संदर्भात महसुल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले असुन या आंदोलनामुळे महसुलचे कामकाज ठप्प झाले आहे त्याचा त्रास सर्व सामान्याना होत आहे .                                   महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसुल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समीतीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात लागु न करता करावा .अव्वल कारकुन ,मंडलअधिकारी संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देवुन आदेश निर्गमीत करावेत महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजुर करुन पुरवठा  विभागाच्या पद भरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल सेवेत सामावुन घ्यावे वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा ,महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक ३/२/२०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकुन यांचे वेतन निश्चित करण्यात यावे ,महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरुन२४०० करण्यात यावा महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यवी आदिसह अनेक मागण्या करीता हे आंदोलन सुरु करण्यात आले होते पहील्या दिवशी काळ्या फिती लावुन कामकाज करण्यात आले त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत निदर्शने नंतर लेखणी बंद आंदोलन व आता काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जिवन आहेर सरचिटणीस किशोर हटकर कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवारे संघटक चंदु प्रधान समन्वयक राजु धाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर कर्मचारी संघटनेने आंदोलन सुरु केलेले आहे.या आंदोलनात ऐ एस ऐडके एन ई मंडलीक ऐ आर पुंड एस एस गायकवाड एस आर खाडे एस डी आल्हाट राजु निकाळे आर डी शेले ऐ डी रणनवरे एस एस देसाई डी एस आमले ऐ एस राजवाळ एम जी नाईक मिलींद नवगीरे एस वाय चंदन एम एस खरपुडे आदिसह महसुल कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कोपरगाव (गौरव डेंगळे):श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज भक्त मंडळाच्या वतीने प्रभात फेरी आयोजन आषाढी एकादशी निमित्त गुरुवार दिनांक १७ जुलै रोजी प्रभात फेरी उत्साहात संपन्न झाली.सकाळी ६:०० वा धारणगाव रोड शुभमनगर येथून ते आनंदनगरच्या महादेव मंदिरापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. महादेव मंदिरामध्ये महाआरतीचा आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीमध्ये एकच गजर होता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा.प्रभात फेरीमध्ये २५ ते ३० माता बहिणींसह 

बालगोपाळही सहभागी झाले होते.मागील दोन वर्षापासून एकादशीच्या दिवशी प्रभात फेरीच्या आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान प्रभात फेरीच्या सांगतेवेळी प्रभात फेरीच्या आयोजिका भागवताचार्य ह भ प रेखाताई गायकवाड यांनी सांगितले आज दुग्ध शर्करा योग आहे.श्रीक्षेत्र मुळेगाव थडी पासून श्री संत जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थळापर्यंत पायी दिंडी सोहळा परमपूज्य स्वामी कैलास आनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने होत असतो ही दिंडी गोंदवले कर्मा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रांगणात भेट देऊन महाप्रसाद घेऊन दिंडी समाधी स्थळाकडे स्थानपन्न झाली याला दुग्ध शर्करा योग म्हणतात असे त्यांनी सांगितले.

मानवता संदेश फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - आजच्या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यातील वातावरणाचा विचार करता वृक्षारोपणाची चळवळ ही लोक चळवळ होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे .वृक्षारोपणासाठी सर्व प्रकारची मदत आपण करू. आज जे वृक्षारोपण होत आहे त्यासाठी जाळ्या सुद्धा उपलब्ध करून देऊ .मानवता संदेश फाउंडेशनने हाती घेतलेले कार्य खरोखर मानवतेसाठी उपयुक्त आहे .सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक काम उत्कृष्टपणे सुरू आहे. त्यांच्या या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहुजी कानडे यांनी केले.


मिल्लत नगर भागात मानवता संदेश फाउंडेशन व जॉगिंग ट्रॅक कमिटी तर्फे कॅनल साईडला मानवता संदेश फाउंडेशनचे समन्वयक पत्रकार सलीमखान पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आमदार कानडे,माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये,

अहमदभाई जहागीरदार, साजिद मिर्झा, जोएफ जमादार यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कानडे बोलत होते.

मिल्लत नगर परिसरातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व लवकरच आपण सोडवू त्यासाठी नगरपालिकेत सर्व विभागांची बैठक बोलावून सर्व समस्या मार्गी लावू.शहरांमध्ये आपण जे काही काम केले आहे ते आपल्यासमोर आहे. जनतेने मला लोकप्रतिनिधी केल्यामुळे जनतेची कामे करण्याचा मी प्रयत्न केला असे ही ते म्हणाले.

युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करून संयोजकांचे अभिनंदन केले.श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांनी आपल्या भाषणामध्ये सलीमखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांमध्ये आम्ही सर्वजण काम करीत असून सामाजिक वातावरण निकोप ठेवण्यासाठी त्यांचे मोलाची योगदान आहे. वृक्षारोपण करणे हे एक पुण्याचे काम आहे. हे काम सर्वांनीच पुढे नेण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. शेवटी ॲडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.

यावेळी विविध प्रकारच्या साठ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

आमदार कानडे, अनुराधाताई आदिक, सचिन गुजर,सिद्धार्थ मुरकुटे,अशोक उपाध्ये, अहमद जागीरदार, आयाज तांबोळी, साजिद मिर्झा,तौफिक शेख,सुनील साळवे, , सतीश म्हसे,नगरसेवक मुक्तार शाह, कलीम कुरेशी,पत्रकार लाल मोहम्मद जागीरदार, रज्जाक पठाण,डॉ. सलीम शेख,तौफिक शेख, मुख्तार मणियार, मेहबूब प्यारे,अश्फाक शेख, महबूबअली शाह, जोएब जमादार, मुश्ताक शेख, शन्नू दारूवाला,

शौकत शेख,आदित्य आदिक,नियाज शेख,अवि पोहेकर,सैफ शेख,हबीब तांबोळी,

फिरोज पठाण,असलम सय्यद,कलीम रॉयल शेख,वसीम जहागीरदार,

साजिद शेख, अनवर टेलर, डॉ.अदनान मुसाणी,अझहर शेख, अश्फाक शेख,नंदकुमार आरोटे, गोसावी, सलाउद्दीन शेख,शंकर गायकवाड, सरवरअली मास्टर,जाकीर पटेल,असलम बिनसाद, एस के खान,शाहिद शेख,हाजी इमाम सय्यद, एडवोकेट मोहसीन शेख, एडवोकेट समीन बागवान,दीपक कदम, भैय्या शाह,समीरखान पठाण,समीर शेख,

फारुख पटेल,कामरान पठाण,शोएब पठाण, अमन पठाण,नजीरभाई शेख,किशोर त्रिभुवन, प्रदीप दळवी,सचिन शिंदे, शरद नागरगोजे,

शाहीन शेख,खालिद मोमीन,शादाब शेख, तनवीर शेख,हबीब तांबोळी,बिया शेख, सज्जाद नवाब आदींच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

प्रस्ताविक सलीमखान पठाण यांनी केले.

शेवटी एडवोकेट समीन बागवान यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नजीरभाई शेख,तनवीर शेख, डॉक्टर सलीम शेख, खालीद मोमीन,एस के खान आदींनी विशेष परिश्रम घेतले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे):आषाढी एकादशी म्हटलं म्हणजे आपल्याला आठवतो ते पंढरपूर,पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी अनेक दिंड्या मधील अनेक वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात.वारी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संस्कृती आणि त्याबरोबरच संतपरंपरा,अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, महाराष्ट्र भूमीमध्ये वारकऱ्यांची दिंडी परंपरा ही अविरत चालू आहे.या परंपरेचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर मधील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये देखील दिंडीचे आयोजन दरवर्षी प्रमाणे  करण्यात आले होते.या दिंडीमध्ये शाळेतील सर्व मुलांनी अगदी आनंदाने भाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पा आणि विठुरायाच्या आरतीने झाली. त्यानंतर वारकरी परंपरेवर अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर सुंदर अशा अभंगाच्या जल्लोषामध्ये इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. त्यानंतर दिंडीची सुरुवात सुरुवात झाली दिंडी कर्मवीर भाऊराव पाटील चौक या ठिकाणाहून रामराव अधिक पुतळ्याजवळ असणाऱ्या पटांगणामध्ये गेली. त्या ठिकाणी मुलांनी फुगडी खेळून दिंडीचा आनंद घेतला त्या ठिकाणाहून दिंडी परत शाळेत आली.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव जन्मजय टेकावडे,प्राचार्य घोगरे,शाळेची शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्येष्ठ शिक्षिका चव्हाण,नरोटे तसेच इतर शिक्षक वृंदांनी अथक परिश्रम घेतले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-भंगारवाल्याकडून खरेदी केलेल्या संशयास्पद तांब्याच्या तारा पुणे येथे घेऊन जाणारी दोन वाहने श्रीरामपूर पोलिसांनी अर्थपूर्ण तडजोड करून सोडून दिल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना सुनील मुथा यांनी सांगितले की रविवारी रात्री श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजस्थान व श्रीरामपूर पासिंगच्या दोन वाहनातून  संशयास्पद तांब्याचा तारा पुणे येथे घेऊन  जात असल्याची खबर श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला मिळाली. त्याने काही कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन सदरची वाहने बेलापूर येथील नगर बायपासला पाठलाग करून पकडली. चालकांची कसून चौकशी केली असता ते दिल्लीचे रहिवासी असून सध्या श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मध्ये राहत असल्याचे समजले तसेच त्यांच्याकडे सदर मालाची कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. ही चौकशी चालू असतानाच श्रीरामपूर येथील वॉर्ड नंबर दोन मधून काहीजण बेलापूर पोलीस स्टेशनला दाखल झाले. त्यातील तीन जणांनी पोलिसांशी घासाघीस करून काही लाखांची यशस्वी तडजोड केली. त्यानंतर रात्री दीड वाजता कोणतीही नोंद न घेता दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. सदर वाहने पकडून पोलीस स्टेशनला आणल्याचे सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त झाले आहे. अशा तऱ्हेने रक्षकच चोरभामट्यांचे हितचिंतक बनत असतील तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून आर्थिक तडजोड करणारा अधिकारी, त्याचा रायटर, सदर प्रकरणातील  इतर कर्मचारी कोण होतेयाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी मुथा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी संविधान बचाव समिती श्रीरामपुर, तसेच समस्त मुस्लीम समाज श्रीरामपुर यांच्यावतीने  दि. १४/०७/२०२४ रोजी दुपारी विशालगड जि.कोल्हापुर याठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली समाज कंटकाच्या जमावाने तेथील नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या, कोयते असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ केली. धार्मिक स्थळांची विटंबना केली. तसेच महिला व लहान मुले, वृध्द महिला, व पुरुषही या हल्ल्यातुन सुटलेले नाही. त्यांना सुध्दा जबरदस्त मारहाण करण्यात आल्याचे आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले आहे

अशी तीव्र भावना समाजातील नागरिकांनी  व्यक्त केली

सदरचा कायदा हातात घेऊन नागरी वस्तीवर हल्ले करुन नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्या-या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा जाहिर निषेध करत  या सर्व लोकांवर कोणीत्याही व कुठलाही पदाधिका-याच्या पदाचा मुलाहिजा न ठेवता कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चे निवेदन तहसीलदार मिलिंद वाघ यांना देण्यात आले याप्रसंगी श्रीरामपूर मुस्लिम समाजातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोपरगांव (गौरव डेंगळे): आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडूरंगाची वारकरी दिंडी मोठया उत्साहात काढण्यात आली. मंगळवार (१७) विठ्ठल नामाची शाळा भरली होती.शहरातील सोमैय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम शाळेत आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या दिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभूषातून टाळमृदंगाच्या गजरात,अभंग, लेझीम नृत्य व भजने गात शहरातून फेरी काढण्यात आली.शाळेच्या प्रांगणात विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेस प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर, सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले.दिडींचा समारोप अंभग गात रिंगण करून करण्यात आला.

बेलापुर  (प्रतिनिधी )-श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणीनुसार लवकरच कांदा निर्यातीसाठी स्वतंत्र रेल्वे मालधक्का सुरु करण्याचा प्रयत्न करणार आसल्याचे वक्तव्य

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले  खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवुन बाजार सामीतीच्या कामकाजाविषयी आढावा घेतला. बाजार समीतीत माल आणताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, माल खरेदी करताना व्यापारी वर्गांना येणाऱ्या अडचणी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या  यावर खासदार वाकचौरे यांनी सविस्तर चर्चा करून येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी मी श्रीरामपूर बाजार समिती सोबत असेल अशी ग्वाही या वेळी दिली. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अंतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी खासदार निधी मिळणे बाबत त्यांना निवेदन देण्यांत आले. त्याच बरोबर खुप दिवसांपासून प्रलंबित असलेला व बाजार समितीने मागणी केलेला प्रश्न श्रीरामपूर येथे माल वाहतुकीसाठी स्वंतंत्र रेल्वे माल धक्का व्हावा हया मागणीसाठी लवकरच आपण रेल्वे मंत्र्यांना भेटुन सदर प्रश्न मार्गी लावु तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यांत प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी  दिली. यावेळेस श्रीरामपूर बाजार समितीच्या वतीने सभापती श्री. सुधीर पा. नवले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यांत आला. या वेळी संचालक, मयुर पटारे पा., राजेंद्र पाऊलबुध्दे पा., राजु चक्रनारायण, विलास दाभाडे, किशोर कालंगडे,खंडेराव सदाफळ पा., मनोज हिवराळे, प्रभारी सचिव श्री. साहेबराव वाबळे तसेच व्यापारी विजुशेठ छाजेड, दिनेश पवार, अजय गदिया, संजय कोठारी, रोहीत कोठारी, वर्धमान पाटणी, मच्छिंद्र मोरे, संतोष खाडे, संजय शिंदे, सचिन टाकसाळ, शरद कोठारी, मुकेश

कोटारी,दिपक गायकवाड, सुनिल भांड आणि कर्मचारी, हमाल, मापाडी उपस्थित होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर व परिसरातील अवैध व्यवसाय पुर्णपणे बंद असुन ते व्यवसाय सुरु होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे अश्वासन श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिल्यानंतर भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आपले उपोषण स्थगीत केले .          बेलापुर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत या मागणीसाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता .अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत होते गावठी दारु मटका बिंगो जुगार गुटखा अवैध वाळु उपसा या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली होती त्यामुळे हे सर्व व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी अल्ताफ शेख यांनी उपोषण सुरु केले होते सर्वांच्या विनंतीवरुन व पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या अश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले या वेळी बोलताना अल्ताफ शेख यांनी सांगितले की व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे त्यामुळे हे व्यवसाय कायमचे बंद व्हावेत या मागणीसाठी मी उपोषणास बसलो होतो परंतु सर्व ग्रामस्था समक्ष पोलीस निरीक्षक देशमुखयांनी अश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मी स्थगीत करत आहे जर हे व्यवसाय पुन्हा सुरु झाले तर मी पुन्हा उपोषणास बसेल असेही शेख यांनी सांगितले या वेळी गावातील महीलांनी शेख यांनी समाजपयोगी कार्य हाती घेतले असुन दारु बंद झाली तर अनेकांचे संसार सुरळीत चालतील असे सांगितले या वेळी  जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख उपसरपंच मुस्ताक शेख भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर देविदास देसाई भाऊसाहेब तेलोरे मोहसीन सय्यद विजय शेलार विशाल आबेकर बाळासाहेब दाणी महेश कुर्हे ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक सुरेश अमोलीक राजु शेख जब्बार आतार शफीक आतार शफीक बागवान समीर जहागीरदार अब्रार सय्यद गोपी दाणी रफीक शहा समीर पठाण सचिन जाधव मोहसीन पठाण वसीम आतार आसिफ शेख अब्दुल शेख बिलाल बागवान आदि उपस्थित होत

 

*गावातील महिलांनी सावधानता बाळगावी*बेलापुर (प्रतिनिधी )-अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हँक करुन मोबाईल डाटावरुन गावातील महीलांना फोन करुन पैसे लुटण्याचा नविन फंडा सुरु झाला असुन कुणीही अशा अमिषाला बळी पडू नये असे अवाहन बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केले आहे                                     काही दिवसापूर्वी बेलापुर खूर्द येथील अंगणवाडी सेवीका जया पुजारी यांचा मोबाईल हँक करुन गावातील महीलांची माहीती घेवुन त्यांना फेक काँल करण्यात आले तुमचे अनुदान मंजुर झाले आहे पैसे पाठविण्यासाठी फोन पे ओपन करा माहीती भरा ओटीपी टाका अशा सुचना देण्यात येतात बेलापुर खूर्द येथील पाच सहा महीला या अमिषाला बळी पडल्या त्यांचे पैसे गेले आता गळनिंब येथील सौ शितल सुनील वाघ या महिलेची आठ दिवसापूर्वी प्रसूती होऊन मुलगा झालेला असून त्या महिलेला आज जाटे वस्ती अंगणवाडी येथील सर्व माहिती सांगून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे नाव सांगून तुमच्या बाळाचे सात हजार रुपये मंजूर झाले असून तुम्हाला ते फोन पे ला पाठवायचे आहे. असे सांगून फोन पे सुरू करण्यास सांगितले व नोटिफिकेशन पाठवून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला घेता येईल. असे सांगून पाच हजार रुपये फोन पे ने काढून घेतले. या प्रकारच्या अनेक घटना ग्रामिण भागात घडत आहेत या बाबत कुणीही तक्रार करत नाही हा सर्व प्रकार फेक आसुन शासन कुठल्याही प्रकारे फोन पे द्वारे अनुदान पाठवत नाही शासनाचे जे अनुदान येते ते सरळ आपल्या बँक खात्यावर येते त्यामुळे कुणीही या अमिषाला बळी पडू नये  ग्रामीण भागातील महिलांनी असे फोन कॉल आल्यानंतर संबंधित व्यक्तीना किंवा आम्हाला फोन करावा. व कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे अवाहन सभापती सुधीर नवले यांनी केले आहे 

गौरव डेंगळे (श्रीरामपूर):पॅरिस १०,००० हून अधिक खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे कारण शहर ऑलिम्पिकच्या ३३ व्या आवृत्तीचे यजमानपदासाठी सज्ज आहे.या वर्षीचे उन्हाळी खेळ २६ जुलैपासून सुरू होणार असून क्रीडा चाहत्यांना ३२ खेळांमधील ३२९ पदक स्पर्धा पाहता येणार आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक ही कॅलेंडरमधील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणार आहे.फ्रान्सची राजधानी ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याने,या वर्षीच्या उन्हाळी ऑलिंपिकबद्दल तुम्हाला या सहा गोष्टी माहित असणे आवश्यक आहे जे उन्हाळी खेळांच्या मागील आवृत्त्यांपेक्षा वेगळे बनवतील.

पॅरिस ऑलिंपिक २०२४

 

#प्रतीक 

पॅरिस ऑलिम्पिकसाठी २०१९ मध्ये पुन्हा चिन्हाचे अनावरण करण्यात आले.हे चिन्ह तीन प्रतिकात्मक चिन्हे एकत्र आणते, प्रत्येकी एक प्रतिनिधित्व करणारी,खेळ,खेळ आणि फ्रान्स. सुवर्णपदक म्हणजे क्रीडा,ज्योत ऑलिम्पिक खेळांचे प्रतिनिधित्व करते आणि मारियान फ्रान्सचे प्रतिनिधित्व करते.मारियान फ्रेंच कला आणि लोकप्रिय संस्कृतीतील एक प्रमुख व्यक्ती आहे. हे चिन्ह स्पष्टपणे स्त्रीलिंगी आहे आणि ते १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिक गेम्सचे स्मरण करते जेव्हा महिलांना पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच प्रथमच पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरालिम्पिकचे प्रतीक एकच असेल! 


#उद्घाटन सोहळा 


पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा इतर कोणत्याही मागील ऑलिम्पिकमध्ये पाहिल्या गेलेल्या उद्घाटन सोहळ्यापेक्षा वेगळा असेल.पॅरिस ऑलिम्पिक ही परंपरा झुगारेल कारण त्याचा उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नसून नदीवर होणार आहे. २६ जुलै रोजी,पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी, हजारो ऍथलीट सीन नदीवर नौका घेऊन आयफेल टॉवरकडे जातील. 


#पदके 

 प्रत्येक ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पदक आयफेल टॉवरच्या मूळ लोखंडाच्या तुकड्याने सेट केले जाते. पदकांची वैशिष्ट्ये: तीन पदकांचा व्यास आणि जाडी निश्चित केली आहे. व्यास ८५ मिमी आणि जाडी ९.२ मिमी आहे. सुवर्णपदकाचे वजन ५२९ ग्रॅम, रौप्य पदकाचे वजन ५२५ ग्रॅम आणि कांस्यपदकाचे वजन ४५५ ग्रॅम आहे.पदकांची रचना फ्रान्सची भावना दर्शवते.


#मशाल 

 पॅरिस गेम्ससाठी ऑलिम्पिक मशालच्या डिझाईनचे २०२३ मध्ये अनावरण करण्यात आले. मशाल,प्रत्येक ऑलिम्पिक खेळांसाठी मध्यवर्ती वस्तू,फ्रेंच डिझायनर मॅथ्यू लेहॅन्युर यांनी तयार केली आहे.पॅरिस ऑलिम्पिकची मशाल तीन मुख्य संकल्पनांनी प्रेरित होती: समानता, पाणी आणि शांतता. टॉर्च डिझाइनच्या परिपूर्ण सममितीमध्ये समानता दर्शविले जाते, क्षैतिज आणि अनुलंब दोन्ही.तरंग पाण्यासाठी उभे आहेत आणि मशालीवरील सौम्य वक्र आणि गोलाकार रेषा शांततेचे प्रतिनिधित्व करतात. 


#शुभंकर  

"द फ्रायजेस" हे पॅरिस ऑलिम्पिकचे अधिकृत शुभंकर आहे. फ्रायजेस हे फ्रेंच हॅट्सचे प्रकार आहेत. या टोप्या फ्रेंच क्रांतिकारकांनी लोकप्रिय केल्या होत्या आणि त्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहेत."द फ्रायजेस" खेळाच्या माध्यमातून क्रांतीसाठी उभा आहे.



#चित्रे 

१९६४ मध्ये टोकियोने गेम्सचे आयोजन केले तेव्हा चित्रचित्रांचा प्रथम वापर ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला.१९६० पासून ते १९९२ पर्यंत जेव्हा बार्सिलोनाने उन्हाळी ऑलिंपिकचे आयोजन केले तेव्हा चित्रचित्रांचा प्रारंभिक संच सारखाच होता.त्या गेम्सपासून प्रत्येक ऑलिम्पिकचे चित्रचित्र वेगळे आहेत.पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरालिम्पिक खेळांसाठीचे ६२ चित्रचित्रे केवळ विविध खेळांचेच नव्हे,तर प्रत्येक खेळाचा अभिमान आणि मूल्ये दर्शवणारे मानके म्हणून डिझाइन केलेले आहेत.प्रत्येक चित्रलेखाचा उद्देश "सन्मानाचा बिल्ला" म्हणून परिधान करणाऱ्यांच्या त्यांच्या निवडलेल्या क्रीडा कुटुंबाशी संबंधित असल्याचे प्रतीक आहे, चाहते आणि खेळाडू सारखेच त्यांचा अंगरखा अभिमानाने परिधान करतात.

बेलापुर (प्रतिनिधी  )- सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या अधिपथ्याखाली स्वामी योगीराज श्री गंगागीरीजी महाराजपायी दिंडी सोहळ्याचे बेलापुरात मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले या वेळी श्री साई पावन प्रतिष्ठाण व बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने साईबाबा मंदिर बेलापुर येथे वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला .या वेळी श्री साई पावन प्रतिष्ठाणच्या वतीने कैलास चायल ग्रामस्थांच्या वतीने शरद नवले सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख यांनी महंत रामगीरीजी महाराजांचा सत्कार केला या वेळी प्रकाश कुर्हे राजेंद्र सातभाई रेवणनाथ नवले राजेंद्र टेकाडे जनार्धन ओहोळ सुभाष राशिनकर आदिंनी वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवली या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक पोलीस पाटील अशोक प्रधान माजी सरपंच भरत साळूंके गणेश बंगाळ भास्कर बंगाळ चंद्रकांत नाईक सचिन नगरकर बाळासाहेब नाईक सुभाष नाईक विशाल आंबेकर अशोक गवते पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा रामविलास झंवर दिपक सिकची रांजेद्र लखोटीया संजय लढ्ढा रमेश पवार अशोक अंबीलवादे उंडे पाटील आदिसह ग्रामस्थ उपस्थित होता

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget