शिर्डी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवुन बाजार सामीतीच्या कामकाजाविषयी आढावा घेतला. बाजार समीतीत माल आणताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, माल खरेदी करताना व्यापारी वर्गांना येणाऱ्या अडचणी तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या यावर खासदार वाकचौरे यांनी सविस्तर चर्चा करून येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी मी श्रीरामपूर बाजार समिती सोबत असेल अशी ग्वाही या वेळी दिली. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अंतर्गत रस्ते व विविध विकास कामांसाठी खासदार निधी मिळणे बाबत त्यांना निवेदन देण्यांत आले. त्याच बरोबर खुप दिवसांपासून प्रलंबित असलेला व बाजार समितीने मागणी केलेला प्रश्न श्रीरामपूर येथे माल वाहतुकीसाठी स्वंतंत्र रेल्वे माल धक्का व्हावा हया मागणीसाठी लवकरच आपण रेल्वे मंत्र्यांना भेटुन सदर प्रश्न मार्गी लावु तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यांत प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळेस श्रीरामपूर बाजार समितीच्या वतीने सभापती श्री. सुधीर पा. नवले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यांत आला. या वेळी संचालक, मयुर पटारे पा., राजेंद्र पाऊलबुध्दे पा., राजु चक्रनारायण, विलास दाभाडे, किशोर कालंगडे,खंडेराव सदाफळ पा., मनोज हिवराळे, प्रभारी सचिव श्री. साहेबराव वाबळे तसेच व्यापारी विजुशेठ छाजेड, दिनेश पवार, अजय गदिया, संजय कोठारी, रोहीत कोठारी, वर्धमान पाटणी, मच्छिंद्र मोरे, संतोष खाडे, संजय शिंदे, सचिन टाकसाळ, शरद कोठारी, मुकेश
कोटारी,दिपक गायकवाड, सुनिल भांड आणि कर्मचारी, हमाल, मापाडी उपस्थित होते.
Post a Comment