शारदेत राज्यस्तरीय मराठी वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न!

👉 राज्यभरातून ७० स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग!

कोपरगाव(गौरव डेंगळे)२३/७:सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दिनांक २३ जुलै २०२४ रोजी राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपूण वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील ३५ शाळेतील ७० उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ उज्वला भोर प्राचार्या एस.एस.जी.एम.कॉलेज कोपरगाव होत्या.तर बक्षीस वितरण समारंभासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गोदावरी बायोरिफाइनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी शाळेचे प्राचार्य के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नथलीन फर्नांडिस यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक योगेश शिंदे,विमल राठी,वृषाली कुलकर्णी हे उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल शालेय व्यवस्थापन,माननीय प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

संत विवेकानंद इंग्लिश स्कूल, अहिल्यानगर ₹ ३,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूल, अकोले 

₹ २,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

प्रवरा कन्या विद्या मंदिर, लोणी  ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल अहमदनगर ₹ १०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 सेंट जॉन् इंग्लिश मिडियम स्कूल,राहता

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण(स्पेशल सेमी)

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

आत्मा मालिक मिलेट्री स्कूल गुरुकुल, कोकमठाण.

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल कोऱ्हाळे 

 ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget