स्वामी योगीराज गंगागीरी महाराज पायी दिंडीचे बेलापुरात जोरदार स्वागत
बेलापुर (प्रतिनिधी )- सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरीजी महाराज यांच्या अधिपथ्याखाली स्वामी योगीराज श्री गंगागीरीजी महाराजपायी दिंडी सोहळ्याचे बेलापुरात मोठ्या उत्सहात स्वागत करण्यात आले या वेळी श्री साई पावन प्रतिष्ठाण व बेलापुर ग्रामस्थ यांच्या वतीने साईबाबा मंदिर बेलापुर येथे वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला .या वेळी श्री साई पावन प्रतिष्ठाणच्या वतीने कैलास चायल ग्रामस्थांच्या वतीने शरद नवले सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच मुस्ताक शेख यांनी महंत रामगीरीजी महाराजांचा सत्कार केला या वेळी प्रकाश कुर्हे राजेंद्र सातभाई रेवणनाथ नवले राजेंद्र टेकाडे जनार्धन ओहोळ सुभाष राशिनकर आदिंनी वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवली या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक पोलीस पाटील अशोक प्रधान माजी सरपंच भरत साळूंके गणेश बंगाळ भास्कर बंगाळ चंद्रकांत नाईक सचिन नगरकर बाळासाहेब नाईक सुभाष नाईक विशाल आंबेकर अशोक गवते पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा रामविलास झंवर दिपक सिकची रांजेद्र लखोटीया संजय लढ्ढा रमेश पवार अशोक अंबीलवादे उंडे पाटील आदिसह ग्रामस्थ उपस्थित होता
Post a Comment