*गावातील महिलांनी सावधानता बाळगावी*बेलापुर (प्रतिनिधी )-अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हँक करुन मोबाईल डाटावरुन गावातील महीलांना फोन करुन पैसे लुटण्याचा नविन फंडा सुरु झाला असुन कुणीही अशा अमिषाला बळी पडू नये असे अवाहन बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी केले आहे काही दिवसापूर्वी बेलापुर खूर्द येथील अंगणवाडी सेवीका जया पुजारी यांचा मोबाईल हँक करुन गावातील महीलांची माहीती घेवुन त्यांना फेक काँल करण्यात आले तुमचे अनुदान मंजुर झाले आहे पैसे पाठविण्यासाठी फोन पे ओपन करा माहीती भरा ओटीपी टाका अशा सुचना देण्यात येतात बेलापुर खूर्द येथील पाच सहा महीला या अमिषाला बळी पडल्या त्यांचे पैसे गेले आता गळनिंब येथील सौ शितल सुनील वाघ या महिलेची आठ दिवसापूर्वी प्रसूती होऊन मुलगा झालेला असून त्या महिलेला आज जाटे वस्ती अंगणवाडी येथील सर्व माहिती सांगून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे नाव सांगून तुमच्या बाळाचे सात हजार रुपये मंजूर झाले असून तुम्हाला ते फोन पे ला पाठवायचे आहे. असे सांगून फोन पे सुरू करण्यास सांगितले व नोटिफिकेशन पाठवून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला घेता येईल. असे सांगून पाच हजार रुपये फोन पे ने काढून घेतले. या प्रकारच्या अनेक घटना ग्रामिण भागात घडत आहेत या बाबत कुणीही तक्रार करत नाही हा सर्व प्रकार फेक आसुन शासन कुठल्याही प्रकारे फोन पे द्वारे अनुदान पाठवत नाही शासनाचे जे अनुदान येते ते सरळ आपल्या बँक खात्यावर येते त्यामुळे कुणीही या अमिषाला बळी पडू नये ग्रामीण भागातील महिलांनी असे फोन कॉल आल्यानंतर संबंधित व्यक्तीना किंवा आम्हाला फोन करावा. व कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे अवाहन सभापती सुधीर नवले यांनी केले आहे
Post a Comment