Latest Post

बेलापुर (प्रतिनिधी  )-राहुरी कारागृहाचे गज कापुन फरार झालेला आरोपी नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपीं नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलीसांना  लागला परंतु पोलीस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला.राहुरी कारागृहाचे गज कापुन पाच आरोपी फरार झाले होते पैकी तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले मात्र दोघे आरोपी अजुनही पसारच आहेत पोलीस त्यांचा कसुन शोध घेत आहे यातील एक आरोपी नितीन उर्फ सोन्या माळी हा त्याच्या उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे असल्याची खबर पोलीसांना  गुप्त बातमीदाराने दिली होती आरोपी काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात आला होता त्याला काहींनी पाहीले व पोलीसांना कळवीले राहुरीच्या कारागृहातून गज तोडून पळालेला आरोपी उक्कलगाव शिवारात नातेवाईकाकडे आलेला आहे ही बातमी समजताच पोलीस तातडीने मोटारसायकलवर मिळालेल्या ठिकाणी पोहोचले मोटारसायकलचा आवाज येताच आरोपी पोलीसांच्या समोरच जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात घुसला ऊसाच्या शेतात शोध घेतला असता दुसऱ्यांदा तो पोलीसासमोरुन पळाला  मग जादा पोलीस कुमक मागवीण्यात आली  ऊसाच्या शेतात शोध घेतला परंतु  आरोपी फरार होण्यात सफल झाला अनेक पोलीसांच्या गाड्या उक्कलगावाच्या दिशेने धावु लागल्यामुळे गावकऱ्यांनाही नेमके काय झाले हे समजण्यास बराच उशिर झाला हा आरोपी असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस होता तसेच वेळ रात्रीची असल्यामुळे शोध कार्यात अडचणी आल्या त्यातच त्या परिसरात कायमच बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलीसांना ऊसात आरोपीचा शोध घेणे अवघड झाले तरीही पोलीसांनी जिव धोक्यात घालुन ऊसात आरोपीचा शोध घेण्याचा रात्री बराच वेळ पर्यत शोध घेतला परतु मोठ्या प्रमाणात फौज फाटा असतानाही तो आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला अन पोलीसांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.



बेलापूरः (प्रतिनिधी  )-बेकायदेशीर  उपोषण करुन बेलापुर ग्रामपंचायत प्रशासन व संपुर्ण गावाला वेठीस धरल्या प्रकरणी शोभा फुलारे व किशोर फुलारे यांचेवर कायदेशीर बाबीनुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके तसेच गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी लेखी  दिल्यामुळे बेलापुरचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी  सुरु केलेले उपोषण मागे घेतले.                     किशोर फुलारे यांनी अतिक्रमण करुन बेकायदेशीर टाकलेली टपरी ग्रामपंचायतीने उचलून नेली त्यामुळे त्यांच्या पत्नी शोभा फुलारे या पंचायत समीती कार्यालयासमोर सर्व अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीकरीता उपोषणास बसलेल्या आहेत. याबाबत संबधीतास काही झाले तर ती जबाबदारी आपली राहील असे पत्र बेलापुर ग्रामपंचायतीस पाठविण्यात आले. तसेच  सदर उपोषण बेकायदेशीर असल्याचे गट विकास अधिकारी यांनी पोलिस प्रशासनास लेखी कळविले होते.तरी देखील सदर उपोषणकर्त्या महिलेने उपोषण सुरुच ठेवले.तसेच काही भलेबुरे झाल्यास त्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहिल असे धमकविण्याचा प्रकार केला.अखेरीस सदर प्रकरणी उपोषण बेकायदेशीर असल्याने पंचायत समिती व पोलिस प्रशासनाने कार्यवाही करावी यासाठी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण  केले.    दरम्यान जि.प.सदस्य शरद नवले,ज्येष्ठ नेते सुनिल मुथा,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,देविदास देसाई,दिलीप दायमा आदिंनी गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केली.ग्रामपंचायतीने सदरचे उपोषण बेकायदेशीर  आहे.फेब्रुवारी २०२१ मध्ये नविन पदाधिकारी यांनी कारभार स्विकारलेनंतर पक्षपात न अतिक्रमणे हटविली   आहेत.त्यात उपोषणकर्त्याचीही अतिक्रमीत टपरी हटविली आहे.त्यामुळे सदर प्रकरणी हस्तक्षेप करुन बेकायदेशीर उपोषणाबाबत योग्य निर्णय घ्यावा असे पञ ग्रामपंचायतीने गट विकास अधिकारी यांना दिले.गट विकास अधिकारी धस यांनी उपोषणकर्त्या महिलेस दोन तीन वेळा चर्चेसाठी बोलाविले माञ त्यांनी चर्चेस नकार दिला.             त्यानंतर सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पुन्हा उपोषणस्थळी  आले.त्यानंतर पोलिस उपआधिक्षक संदीप मिटके,पोलिस निरीक्षक संजय सानप,गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस आदि उपोषणस्थळी आले.अखेरीस गटविकास अधिकारी यांनी बेकायदेशीर  उपोषण करणेबाबत काययदेशीर बाबीनुसार कार्यवाही करुन उपोषणापासून परावृत्त केले जाईल असे लेखी पञ दिले.सदरचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्याने व पोलिस प्रशासनानेही दखल घेतल्याने ग्रामस्थांचे उपोषण स्थगित  करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,भारती लांबोळे,शशिकला म्हस्के,निकिता झिने,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,पुरुषोत्तम भराटे,अरविंद साळवी,प्रभात कु-हे,मोहसिन सय्यद,जाकिर हसन शेख,किरण साळवी,मारुती गायकवाड,पप्पू मांजरे,शफीक बागवान,विशाल आंबेकर,महेश कु-हे,जिना शेख,नितीन नवले,सुभाष लांबोळे,सचिन अमोलिक,जब्बार आतार,राज गुडे,गोपी दाणी,कैलास त्रिभुवन, संजय पाडळे, शफीक आतार,विनायक जगताप,सुभाष शेलार,शशिकांत तेलोरे,नवाब सय्यद,बाबूराव पवार बाळासाहेब शेलार आदींसह महिला,बेलापूर-ऐनतपूर येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.



अहमदनगर पोलिस दलातील भिंगार येथील रहिवाशी व सध्या राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे अहमदनगर आस्थापनेवर  नेमणुकीस असलेले पोलिस उपनिरीक्षक तथा गुप्तवार्ता अधिकारी श्री.कृष्णा बबनराव विधाते यांचा त्यांचे पोलिस दलातील प्रशंसनीय कामगिरीबद्दल गौरव करून दि. १७.१२.२०२१ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे "पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२१" या पदकाने सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त तथा  अति.पोलिस महासंचालक श्री. आशुतोष डुंबरे, भा.पो.से. श्री राजेश प्रधान (भा.पो.से.) ( विशेष पोलीस महानरीक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य)  श्री. सुनील कोल्हे (भा.पो.से.) (सह. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ),  तसेच राजेंद्र मगर, (सहायक आयुक्त), अहमदनगर, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी श्री. प्रवीण देवकर, अहमदनगर व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. श्री. कृष्णा विधाते हे मूळ अहमदनगर पोलीस दलातील होतकरू अधिकारी असून त्यांचे उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नेमणूक करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व इतर महत्वाच्या घटनांबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत केले असून सन २०१४ व २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांना मिळालेल्या पोलिस सन्मान चिन्हाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


श्रीरामपूर :-( प्रतिनिधी एजाज सय्यद) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य या नामांकित संस्थेचा सन 2021चा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार कोल्हार भगवतीपूर येथीलजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमोहंमद करीम शेख यांना जाहीर झाला आहे.

   राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष साप्ताहिक राज रिपोर्टर व राज रिपोर्टर वेब पोर्टल चे संपादक राजमोहंमद करीम शेख हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. शिव, फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार तसेच अनाथ व निराधार बालकांसाठी ते तारणहार राहिले आहेत तर आजारी रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. आजवर त्यांनी हजारो आजारी, निराधार व गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळून देण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे तर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा सदोदित प्रेरणादायी राहिला आहे.

शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदरमोड करून आधार देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले असल्याने त्यांचे कडे नेहमीच गरजूंचा राबता वाढला आहे.

   या त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवरील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ने घेतली असून त्यांच्या या कार्याबद्दल दिनांक 20/ 12 /20 21 रोजी नाशिक येथील औरंगाबाद कर सभागृहात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज मोहम्मद शेख यांना  राज्यस्तरीय गुणीजन गौरव

सोहळ्यात  आदर्श कार्यगौरव समाजरत्न देवून सन्मानित करण्यात आले आहे.20डिसेंबर रोजी नाशिक येथे पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार राजमोहंमद शेख यांना प्रदान करण्यात आला आहे  शेख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेल्या  पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर  महंमद, युवा प्रदेश अध्यक्ष संदीप पवार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, उत्तर जिल्हा सचिव कासम शेख, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब वायरमन, श्रीरामपूर शहर सचिव इमरान एस शेख, श्रीरामपूर तालुका संघटक सलीम शेख, बेलापूर शाखाप्रमुख मुसा सय्यद,  बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, बेलापूर शाखा सचिव शफिक शेख, पत्रकार संघ सदस्य मोहम्मद गौरी, सार्थक साळुंखे, अनिस सय्यद, रसूल सय्यद, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ समीना रफिक शेख , श्रीरामपूर शहर महिला सचिव कुमारी अश्विनी अहिरे, महिला सदस्य सौ कल्पना काळे, सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!


श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील जळगाव गावातील चार वर्षीय मुलीस घरातून उचलून नेऊन तिच्यावर तुरीच्या शेतात बलात्कार करणार्‍या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या (वय 32, रा. जळगाव, ता. राहता) याला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या पथकाने गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे पकडून रविवारी मध्यरात्री अटक केली.गुन्हा घडल्यानंतर काल्या फरार झाला होता. परंतु श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कौशल्याने तपास करून अवघ्या 36 तासांत त्याला जेरबंद केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुरसे यांच्यासह पोलीस हवालदार सतीश गोरे, पोलीस नाईक श्री. रन्नवरे, पोलीस नाईक श्री. वैरागर व वाहन चालक पोलीस नाईक श्री. पठाण यांचा समावेश होता.


श्रीरामपूर (वार्ताहर)-श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना देवीदास पिंपळे यांच्या एक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजुने आत प्रवेश केला. हा प्रकार लक्षात येताच देविदास पिंपळे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी देविदास पिंपळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील एक महिलामध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. यावेळी श्री.पिंपळे यांच्या डोक्याला तसेच हाथा पायाला जबर मार लागला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. मारहाण करणार्‍या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला. दरोडेखोरांनी ऐवज चोरून नेला किंवा नाही हे मात्र समजू शकले नाही.यावेळी नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. घायवट, पोलीस हेडकॉन्स्टेबल परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, श्री. दरेकर, गौतम लगड, हरीश पानसंबळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल, महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांच्या पथकाने तात्काळ पिंपळे वस्तीवर भेट दिली. त्यांनी जखमी देविदास पिंपळे व इतरांना औषधोपचारासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविले. मारहाण करणार्‍या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला.पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता तेथे दरोडेखोरांची मोटारसायकल आढळून आली आहे. सकाळी घटनास्थळी अहमदनगर येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. जाता जाता वडाळा महादेव येथील वस्तीवरून मोटरसायकल घेऊन हल्लेखोर पसार झाले. पिंपळे वस्तीवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून घटनेसंदर्भात तर्कवितर्क काढत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई  करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे                         मनसेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे दैवत नाही तर ते भारत वासीयांचे श्रध्दास्थान आहे  या घटनेमुळे सर्व देश वासीयांच्या भावना दुखावल्या आहेत देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच  राहता तालुक्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव येथील चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस  फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपुर च्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी  मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे डॉक्टर संजय नवथर, जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, गणेश दिवसे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे  शहराध्यक्ष, विशाल शिरसाठ , सचिन सरोदे, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी शहराध्यक्ष  संतोष डहाळे तालुका सरचिटणीस, ईश्वर जगताप, शहर सचिव अमोल साबणे उपाध्यक्ष अरुण बुऱ्हाडे  आदि पदाधिकारी उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget