उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके व गटविकास अधिकारी धस यांच्या अश्वासनानंतर बेलापुर ग्रामस्थांचे उपोषण स्थगित.

बेलापूरः (प्रतिनिधी  )-बेकायदेशीर  उपोषण करुन बेलापुर ग्रामपंचायत प्रशासन व संपुर्ण गावाला वेठीस धरल्या प्रकरणी शोभा फुलारे व किशोर फुलारे यांचेवर कायदेशीर बाबीनुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके तसेच गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांनी लेखी  दिल्यामुळे बेलापुरचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी  सुरु केलेले उपोषण मागे घेतले.                     किशोर फुलारे यांनी अतिक्रमण करुन बेकायदेशीर टाकलेली टपरी ग्रामपंचायतीने उचलून नेली त्यामुळे त्यांच्या पत्नी शोभा फुलारे या पंचायत समीती कार्यालयासमोर सर्व अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीकरीता उपोषणास बसलेल्या आहेत. याबाबत संबधीतास काही झाले तर ती जबाबदारी आपली राहील असे पत्र बेलापुर ग्रामपंचायतीस पाठविण्यात आले. तसेच  सदर उपोषण बेकायदेशीर असल्याचे गट विकास अधिकारी यांनी पोलिस प्रशासनास लेखी कळविले होते.तरी देखील सदर उपोषणकर्त्या महिलेने उपोषण सुरुच ठेवले.तसेच काही भलेबुरे झाल्यास त्यास ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहिल असे धमकविण्याचा प्रकार केला.अखेरीस सदर प्रकरणी उपोषण बेकायदेशीर असल्याने पंचायत समिती व पोलिस प्रशासनाने कार्यवाही करावी यासाठी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण  केले.    दरम्यान जि.प.सदस्य शरद नवले,ज्येष्ठ नेते सुनिल मुथा,सरपंच महेन्द्र साळवी,उपसरपंच अभिषेक खंडागळे,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,देविदास देसाई,दिलीप दायमा आदिंनी गटविकास अधिकारी यांचेशी चर्चा केली.ग्रामपंचायतीने सदरचे उपोषण बेकायदेशीर  आहे.फेब्रुवारी २०२१ मध्ये नविन पदाधिकारी यांनी कारभार स्विकारलेनंतर पक्षपात न अतिक्रमणे हटविली   आहेत.त्यात उपोषणकर्त्याचीही अतिक्रमीत टपरी हटविली आहे.त्यामुळे सदर प्रकरणी हस्तक्षेप करुन बेकायदेशीर उपोषणाबाबत योग्य निर्णय घ्यावा असे पञ ग्रामपंचायतीने गट विकास अधिकारी यांना दिले.गट विकास अधिकारी धस यांनी उपोषणकर्त्या महिलेस दोन तीन वेळा चर्चेसाठी बोलाविले माञ त्यांनी चर्चेस नकार दिला.             त्यानंतर सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पुन्हा उपोषणस्थळी  आले.त्यानंतर पोलिस उपआधिक्षक संदीप मिटके,पोलिस निरीक्षक संजय सानप,गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस आदि उपोषणस्थळी आले.अखेरीस गटविकास अधिकारी यांनी बेकायदेशीर  उपोषण करणेबाबत काययदेशीर बाबीनुसार कार्यवाही करुन उपोषणापासून परावृत्त केले जाईल असे लेखी पञ दिले.सदरचे लेखी आश्वासन प्राप्त झाल्याने व पोलिस प्रशासनानेही दखल घेतल्याने ग्रामस्थांचे उपोषण स्थगित  करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,स्वाती अमोलिक,मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,भारती लांबोळे,शशिकला म्हस्के,निकिता झिने,भाऊसाहेब कुताळ, भास्कर बंगाळ, प्रकाश नवले,प्रभाकर कु-हे,पुरुषोत्तम भराटे,अरविंद साळवी,प्रभात कु-हे,मोहसिन सय्यद,जाकिर हसन शेख,किरण साळवी,मारुती गायकवाड,पप्पू मांजरे,शफीक बागवान,विशाल आंबेकर,महेश कु-हे,जिना शेख,नितीन नवले,सुभाष लांबोळे,सचिन अमोलिक,जब्बार आतार,राज गुडे,गोपी दाणी,कैलास त्रिभुवन, संजय पाडळे, शफीक आतार,विनायक जगताप,सुभाष शेलार,शशिकांत तेलोरे,नवाब सय्यद,बाबूराव पवार बाळासाहेब शेलार आदींसह महिला,बेलापूर-ऐनतपूर येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.



Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget