बेलापुर (प्रतिनिधी )-राहुरी कारागृहाचे गज कापुन फरार झालेला आरोपी नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी हा फरार आरोपीं नातेवाईकाकडे असल्याचा सुगावा पोलीसांना लागला परंतु पोलीस आल्याची चाहुल लागताच तो आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देवुन पसार झाला.राहुरी कारागृहाचे गज कापुन पाच आरोपी फरार झाले होते पैकी तिघांना पकडण्यात पोलीसांना यश आले मात्र दोघे आरोपी अजुनही पसारच आहेत पोलीस त्यांचा कसुन शोध घेत आहे यातील एक आरोपी नितीन उर्फ सोन्या माळी हा त्याच्या उक्कलगाव तालुका श्रीरामपुर येथील नातेवाईकाकडे असल्याची खबर पोलीसांना गुप्त बातमीदाराने दिली होती आरोपी काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात आला होता त्याला काहींनी पाहीले व पोलीसांना कळवीले राहुरीच्या कारागृहातून गज तोडून पळालेला आरोपी उक्कलगाव शिवारात नातेवाईकाकडे आलेला आहे ही बातमी समजताच पोलीस तातडीने मोटारसायकलवर मिळालेल्या ठिकाणी पोहोचले मोटारसायकलचा आवाज येताच आरोपी पोलीसांच्या समोरच जवळच असलेल्या ऊसाच्या शेतात घुसला ऊसाच्या शेतात शोध घेतला असता दुसऱ्यांदा तो पोलीसासमोरुन पळाला मग जादा पोलीस कुमक मागवीण्यात आली ऊसाच्या शेतात शोध घेतला परंतु आरोपी फरार होण्यात सफल झाला अनेक पोलीसांच्या गाड्या उक्कलगावाच्या दिशेने धावु लागल्यामुळे गावकऱ्यांनाही नेमके काय झाले हे समजण्यास बराच उशिर झाला हा आरोपी असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस होता तसेच वेळ रात्रीची असल्यामुळे शोध कार्यात अडचणी आल्या त्यातच त्या परिसरात कायमच बिबट्याचा वावर असल्यामुळे पोलीसांना ऊसात आरोपीचा शोध घेणे अवघड झाले तरीही पोलीसांनी जिव धोक्यात घालुन ऊसात आरोपीचा शोध घेण्याचा रात्री बराच वेळ पर्यत शोध घेतला परतु मोठ्या प्रमाणात फौज फाटा असतानाही तो आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला अन पोलीसांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले.
Post a Comment