अहमदनगर (भिंगार) चे कृष्णा विधाते यांचा पोलिस दलातील प्रशंसनीय कामगिरीबद्दल गौरव व "पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२१" प्रदान.
अहमदनगर पोलिस दलातील भिंगार येथील रहिवाशी व सध्या राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे अहमदनगर आस्थापनेवर नेमणुकीस असलेले पोलिस उपनिरीक्षक तथा गुप्तवार्ता अधिकारी श्री.कृष्णा बबनराव विधाते यांचा त्यांचे पोलिस दलातील प्रशंसनीय कामगिरीबद्दल गौरव करून दि. १७.१२.२०२१ रोजी पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे "पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२१" या पदकाने सन्मान करण्यात आला. यावेळी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त तथा अति.पोलिस महासंचालक श्री. आशुतोष डुंबरे, भा.पो.से. श्री राजेश प्रधान (भा.पो.से.) ( विशेष पोलीस महानरीक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र राज्य) श्री. सुनील कोल्हे (भा.पो.से.) (सह. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई ), तसेच राजेंद्र मगर, (सहायक आयुक्त), अहमदनगर, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी श्री. प्रवीण देवकर, अहमदनगर व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. श्री. कृष्णा विधाते हे मूळ अहमदनगर पोलीस दलातील होतकरू अधिकारी असून त्यांचे उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नेमणूक करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व इतर महत्वाच्या घटनांबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत केले असून सन २०१४ व २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांना मिळालेल्या पोलिस सन्मान चिन्हाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Post a Comment