श्रीरामपूर :-( प्रतिनिधी एजाज सय्यद) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी महाराष्ट्र राज्य या नामांकित संस्थेचा सन 2021चा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार कोल्हार भगवतीपूर येथीलजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजमोहंमद करीम शेख यांना जाहीर झाला आहे.
राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपुर येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष साप्ताहिक राज रिपोर्टर व राज रिपोर्टर वेब पोर्टल चे संपादक राजमोहंमद करीम शेख हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. शिव, फुले, शाहु, आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार तसेच अनाथ व निराधार बालकांसाठी ते तारणहार राहिले आहेत तर आजारी रुग्णांच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. आजवर त्यांनी हजारो आजारी, निराधार व गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय मदत मिळून देण्याचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे तर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांचा सदोदित प्रेरणादायी राहिला आहे.
शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पदरमोड करून आधार देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले असल्याने त्यांचे कडे नेहमीच गरजूंचा राबता वाढला आहे.
या त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवरील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ने घेतली असून त्यांच्या या कार्याबद्दल दिनांक 20/ 12 /20 21 रोजी नाशिक येथील औरंगाबाद कर सभागृहात संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात राज मोहम्मद शेख यांना राज्यस्तरीय गुणीजन गौरव

सोहळ्यात आदर्श कार्यगौरव समाजरत्न देवून सन्मानित करण्यात आले आहे.20डिसेंबर रोजी नाशिक येथे पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात हा पुरस्कार राजमोहंमद शेख यांना प्रदान करण्यात आला आहे शेख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद, युवा प्रदेश अध्यक्ष संदीप पवार, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बी के सौदागर, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, उत्तर जिल्हा सचिव कासम शेख, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज खान पठाण, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब वायरमन, श्रीरामपूर शहर सचिव इमरान एस शेख, श्रीरामपूर तालुका संघटक सलीम शेख, बेलापूर शाखाप्रमुख मुसा सय्यद, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, बेलापूर शाखा सचिव शफिक शेख, पत्रकार संघ सदस्य मोहम्मद गौरी, सार्थक साळुंखे, अनिस सय्यद, रसूल सय्यद, अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष सौ समीना रफिक शेख , श्रीरामपूर शहर महिला सचिव कुमारी अश्विनी अहिरे, महिला सदस्य सौ कल्पना काळे, सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!


Post a Comment