श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील जळगाव गावातील चार वर्षीय मुलीस घरातून उचलून नेऊन तिच्यावर तुरीच्या शेतात बलात्कार करणार्या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या (वय 32, रा. जळगाव, ता. राहता) याला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या पथकाने गंगापूर (जि. औरंगाबाद) येथे पकडून रविवारी मध्यरात्री अटक केली.गुन्हा घडल्यानंतर काल्या फरार झाला होता. परंतु श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कौशल्याने तपास करून अवघ्या 36 तासांत त्याला जेरबंद केले. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुरसे यांच्यासह पोलीस हवालदार सतीश गोरे, पोलीस नाईक श्री. रन्नवरे, पोलीस नाईक श्री. वैरागर व वाहन चालक पोलीस नाईक श्री. पठाण यांचा समावेश होता.
Post a Comment