श्रीरामपूर (वार्ताहर)-श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मुठेवाडगाव रोडवरील पिंपळेवस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील व्यक्तींना वेठिस धरून मारहाण केली. यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना देवीदास पिंपळे यांच्या एक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पिंपळे वस्तीवर काल पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजुने आत प्रवेश केला. हा प्रकार लक्षात येताच देविदास पिंपळे यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी देविदास पिंपळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. घरातील एक महिलामध्ये पडली असता तिलाही मारहाण करण्यात आली. यावेळी श्री.पिंपळे यांच्या डोक्याला तसेच हाथा पायाला जबर मार लागला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. मारहाण करणार्या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला. दरोडेखोरांनी ऐवज चोरून नेला किंवा नाही हे मात्र समजू शकले नाही.यावेळी नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे याठिकाणी घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर श्री. घायवट, पोलीस हेडकॉन्स्टेबल परदेशी, पोलीस नाईक किरण पवार, श्री. दरेकर, गौतम लगड, हरीश पानसंबळ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल, महेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांच्या पथकाने तात्काळ पिंपळे वस्तीवर भेट दिली. त्यांनी जखमी देविदास पिंपळे व इतरांना औषधोपचारासाठी श्रीरामपूर येथील रुग्णालयात हलविले. मारहाण करणार्या दरोडेखोरांनी तात्काळ या ठिकाणावरून पोबारा केला.पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता तेथे दरोडेखोरांची मोटारसायकल आढळून आली आहे. सकाळी घटनास्थळी अहमदनगर येथील डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. जाता जाता वडाळा महादेव येथील वस्तीवरून मोटरसायकल घेऊन हल्लेखोर पसार झाले. पिंपळे वस्तीवर ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून घटनेसंदर्भात तर्कवितर्क काढत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Post a Comment