बेलापुर (प्रतिनिधी )- कर्नाटक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे मनसेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे दैवत नाही तर ते भारत वासीयांचे श्रध्दास्थान आहे या घटनेमुळे सर्व देश वासीयांच्या भावना दुखावल्या आहेत देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे तसेच राहता तालुक्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जळगाव येथील चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा करण्यात यावी यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीरामपुर च्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे डॉक्टर संजय नवथर, जिल्हा सचिव, सुरेश जगताप जिल्हा उपाध्यक्ष, गणेश दिवसे तालुकाध्यक्ष, निलेश लांबोळे शहराध्यक्ष, विशाल शिरसाठ , सचिन सरोदे, तालुकाध्यक्ष अक्षय सूर्यवंशी शहराध्यक्ष संतोष डहाळे तालुका सरचिटणीस, ईश्वर जगताप, शहर सचिव अमोल साबणे उपाध्यक्ष अरुण बुऱ्हाडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment