बेलापूर (प्रतिनिधी )- अवैध व्यवसायासाठी अनाधिकृतपणे व अतिक्रमण करुन टाकलेली टपरी ग्रामपंचायत प्रशासनाने उचलल्याप्रकरणी सौ.शोभा फुलारे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण हे बेकायदेशीर असुन या बाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व सदस्यांनी केली आहे.अन्यथा आम्ही देखील ग्रामस्थासह उपोषणास बसु असा इशारा देण्यात आला आहे चुकीच्या जागेवर अतिक्रमण करुन टाकलेली बेकायदेशीर टपरी बेलापुर ग्रामपंचायतीने उचलली तसेच नागरीकांच्या तक्रारीवरुन रस्त्यावर असणारे अतिक्रमण हटविले या बाबत सौ शोभा फुलारे यांनी पंचायत समीतीसमोर उपोषण सुरु केले आहे हे उपोषण चुकीच्या मगणीकरीता असुन अशा प्रकारे चुकीच्या मागणीकरीता उपोषणास बसुन शासनास वेठीस धरणाऱ्या व्याक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मंगळवार (ता.२१)पासून आपण स्वतः सह,उपसरपंच तसेच सदस्य व ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा सरपंच महेन्द्र साळवी यांनी दिला आहे. यासंदर्भात गट विकास अधिकारी यांना दिलेल्या पञात सरपंच महेंद्र साळवी यांनी म्हटले आहे की,श्री.किशोर धोंडीराम फुलारे यांनी अतिक्रमण करुन टपरी टाकली होती ग्रामपंचायत प्रशासनाने सदरची अतिक्रमित केलेली टपरी हटविली तसेत इतरही अतिक्रमण केलेल्या टप-या उचलून घेतल्या.यासंबंधी श्री.किशोर फुलारे यांनी त्यांच्या पत्नी सौ.शोभा फुलारी यांना पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसविले आहे.फुलारी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.त्यांचेवर अवैध धंदे व बेकायदा दारु विक्री संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत.आंदोलन उपोषणाची धमकी देवुन शासनास वेठीस धरण्याचा त्याचा धंदा आहे अन काही लोक यातही राजकारण आणून त्यास पाठींबा देत आहेत टपरी काढणेबरोबरच श्रीमती सुमन बाबुराव गायकवाड यांचे अनधिकृत व सार्वजनिक शौचालयाच्या रस्त्यावरचे अतिक्रमण केलेले घर पाडले या बाबतही सौ.फुलारे उपोषण करीत आहे.सदर प्रकरणी सुमन गायकवाड यांनी दिवाणी न्यायालयात दावा क्र.२७२/२०२१दाखल केलेला आहे.सबब सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.अशा त-हेने दोन्ही प्रकरणी सौ.फुलारे यांचे उपोषण पूर्णपणे बेकायदेशीर आहे.याबाबत संबधितास उपोषण मागे घेणेबाबत तसेच अतिक्रमण संदर्भात येत्या ग्रामसभेत निर्णय घेवू असे लेखी कळवून उपोषणापासून परावृत्त होणेबाबत कळविले आहे.सदरचे उपोषण पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने पंचायत समिती कार्यालयाने संबांधिता बाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक होते.तसे न करता उपोषण करणारास काही झाल्यास त्यास ग्रामपंचायत सरपंच व प्रशासन जबाबदार राहिल असा दबाव टाकला जात आहे.हे पुर्णतः चुकीचे असुन असे झाल्यास या पुढील काळात कुणीही चुकीच्या कामाकरीता उपोषण करेल त्यामुळे संबधीत महीलेची मागणीच बेकायदेशीर व चुकीची आहे त्यामुळे आपण देत असलेल्या निवेदनाची दखल घेवून सदरचे बेकायदेशीर उपोषण प्रकरणी आपणच योग्य तो कायदेशीर निर्णय घ्यावा अन्यथा सरपंच,उपसरपंच सदस्य व ग्रामस्थासह मंगळवार पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरु करतील असा इशारा सरपंच महेंद्र साळवी यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर तहसीलदार श्रीरामपुर तसेच पोलिस प्रशासनास पाठविण्यात आलेल्या आहेत .
Post a Comment