Latest Post

बेलापुर(प्रतिनिधी  ) - एका मेडिकल दुकानात स्टिरॉइड्स,झोपेचे उत्तेजक द्रव्ये असणारी औषधे,गर्भपात कीट, सेक्सुअल आदी औषधांची डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय खुलेआम विक्री केली जात असुन डाँक्टर सल्ल्याशिवाय दिल्या जाणाऱ्या औषधामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप बेलापूर डाँक्टर असोसीएशन व मेडिकल असोसएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत करण्यात आला आहे .    

            यावेळी  मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिपक अनभुले,उपाध्यक्ष डॉ.शैलेश पवार,सचिव डॉ.अनिल भगत,डॉ.रविंद्र गंगवाल,डॉ. भारत काळे,डॉ.मच्छिंद्र निर्मळ,डॉ.आशुतोष जोशी,डॉ.संदीप काळे,डॉ.सुधीर काळे,डॉ.मिलिंद बडधे आदींसह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. सदर मेडिकल मधून कोरोना काळातही डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय बिनधास्त औषध विक्री केली जात असल्याचा आरोपही डाँक्टरांनी केला आहे.त्यावेळीही अन्न औषध विभागाकडे तक्रार केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.२०२० पासून आजतागायत जिल्हाधिकारी,अन्न औषध प्रशासन विभाग आयुक्त मुंबई,आरोग्य मंत्रालय यांचेकडे अनेक तक्रारी केल्या. परंतू ठोस कारवाई होत नसल्याचे गौडबंगाल नेमके काय आहे? अशीही शंका मेडिकल असोसिएशन कडून व्यक्त करण्यात आली आहे.सदर मेडिकल मधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिठ्ठीशिवाय तसेच रुग्णांना कोणतेही बिल न देता दिली जाणारी औषधे आज जरी स्वस्त वाटत असली तरी भविष्यात रुग्णासाठी ते घातक ठरू शकतात. घातक स्टिरॉइड मुळे रुग्णांचे रक्त जळते,प्रतिकार शक्ती कमी होते,शरीर फुगते या औषधांची सवय झाल्याने काही दिवसानंतर इतर कोणतेही औषध लागू होत नाही.एवढेच नाही तर मासिक पाळी येऊ नये म्हणून गोळ्या देणे,सेक्स वाढवणारी घातक औषधे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय राजरोसपणे विकली जात आहेत.याबाबत सदर मेडिकल दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

            दरम्यान मेडिकल असोसिएशनने तक्रार केल्यावर अहमदनगर अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्तांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी सबंधित मेडीकलची तपासणी करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.त्यानंतर २३ मे २०२२ ते ६ जून २०२२ या १५ दिवसांसाठी परवाना रद्द करण्यात आला होता.मात्र त्या नंतरही असाच प्रकार सुरू राहिल्याने अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मेतकर यांनी ६ मे २०२४ पासून सदर मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे आदेश ३० जानेवारी २०२४ रोजी दिल्याचे सांगितले आहे.या बाबत मेडिकल असोसिएशनने तक्रार केली म्हणून संबधीतांनी काही डॉक्टरांना दमबाजी करणे, भिती दाखवण्याचे प्रकारही केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची तसेच जास्त पाँवरची औषधे दिल्यामुळे रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळतो परंतु काही दिवसानंतर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे अशी आरोग्यावर परिणाम करणारी औषधे डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्या मेडीकल दुकानावर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे .तसेच डाँक्टर व मेडीकल असोसिएशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत दादा पवार तसेच आरोग्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख, प्रांताधिकारी श्रीरामपुर, तहसीलदार श्रीरामपुर, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आदिंनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-अहमदनगर जिल्हा परिषदेचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तसेच शिक्षक बँकेचे मांजी चेअरमन, पत्रकार सलीमखान पठाण   तसेच अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण यांचे जेष्ठ बंधु रमजान खान चाँदखान पठाण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक  २१ एप्रिल रोजी सकाळी दहा होणार असुन अंत्ययात्रा गार्डन रेसिडेंसी फातीमा हौसींग सोसायटी येथुन निघणार आहे*

बेलापूर :(प्रतिनिधी  )- तालुक्यातील बेलापूर येथून लोणीकडे जाणारा भरगच्च भरलेल्या उसाचा ट्रॅक्टरचे जुगाड ऐन कोल्हार चौकात पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला मांसाहारी विक्री करणारा विक्रेता बालबाल बचावला                       शनिवारी दुपारी ( दि.२०) साडेचार वाजेच्या सुमाराला हि घटना घडली.उसाचा ट्रॅक्टर ऐन चढावर आल्याने पलटी झाला.लोणीच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर जुगाड ओव्हरलोड असल्याने कोल्हार रस्त्याच्या कडेला बसलेल्या 

मासांहारी विक्री करणाऱ्या दुकानावरच कोसळले.नशीब बलवत्तर

म्हणून तो विक्रेता थोड्क्यात बचावला आहे.ऊसाचा ट्रक्टर पलटी होताच दुकानदार दबला गेला असेल अशा शंकेने अनेकांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली.परतु त्याला काही दुखापत झाली नाही. सामानाचे व मांसाहारी विक्री करणाऱ्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्या वेळी नागरिकांनी  मोठी गर्दी

केली होती. एकाच ट्रँक्टरला दोन ऊसाच्या भरलेल्या ट्राँल्या जोडल्या जातात त्याही अवस्थेत चालक भरधाव वेगाने ट्रँक्टर चालवत असतात शिवाय ट्रँक्टरवर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते .त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे शिवाय शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे शिवाय चालकही १८ वर्षाच्या आतीलच असतो या सर्व बाबींची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घ्यावी आशी नागरीकांची मागणी आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीती बरखास्तीला मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगीती मिळाली असुन मा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या ४५ (१ )च्या नोटीशीच्या कारवाई विरोधात संरक्षण दिले आहे .         जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना ४५ ( १)ची नोटीस बजावली होती या नोटीस विरोधात बाजार समीतीचे सभापती सुधीर नवलेसह १२ संचालकांनी मा. उच्च न्यायालयात पिटीशन क्रमांक २९५० /२०२४ दाखल केले होते या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्यासमोर झाली,दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी ४५ ( १ )ची कारवाई झाल्यास १५ दिवसाचे संरक्षण दिले असुन ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे मान्या केले दुसरे अपील बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दाखल केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की समीतीला ४० अ  ब खाली बेकायदेशिर नोटीसा दिलेल्या आहेत .बाजार समितीचे आर्थिक वर्ष संपलेले नाही .समीतीचे नफा तोटा पत्रक तयार नाही बाजार समीतीची दोन वेळेस चौकशी झाली परंतु कुठलाच गंभीर दोष आढळून आलेला नाही त्यामुळे दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आसल्याचे अँड महेश देशमुख व अँड राहुल कर्पे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस जी मेहेरे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.वादीचे वकील आँड राहुल कर्पे यांनी सांगितले की न्यायमूर्ती  मेहेरे यांनी संचालक मंडळ हे लोकनियुक्त संचालक मंडळ असुन त्यांना संरक्षण मागण्याचा पुर्ण अधीकार असल्याचे म्हटले असल्याचे सांगितले न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रीरामपुर कृषी बाजार समीती जैसे थे राहणार आहे    (बाजार समीतीला एक वर्ष पुर्ण झाले नाही तरी सात महीन्यात दोनदा चौकशी केली कुठल्याही विकास कामांना परवानगी न देता विरोधकांनी अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु संचालक मंडळाच्या चोख कामामुळै बाजार समीतीला ५०लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले चार कोटी पन्नास लाखाच्या पावत्या झाल्या हे संस्थेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे न्यायालयाचा निकाल हा विरोधकांनी केलेल्या खोट्या तक्रारीला चपराक आहे .. सुधीर नवले सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती श्रीरामपुर

श्रीरामपूर प्रतिनिधी-चादर मिरवणूक ही हजरत सैलानी बाबा दरबार वॉर्ड नंबर 3 श्रीरामपूर या ठिकाणाहून ढोल ताशे नगारे तसेच सटाणा येथील म्युझिकल बँड वाद्यासह दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भगतसिंग चौक मेन रोड मार्गे जात असताना श्रीराम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी तसेच श्रीराम मंदिर उत्सव कमिटी यांनी देखील हजरत सैलानी बाबा यांच्या संदल चादर मिरवणूकीला भेट देऊन हिंदू मुस्लिम राम रहीम या सर्व गोष्टींचा शहरातील लोकांना श्रीरामपुराची जुनी परंपरा देखील दाखवून दिली


हजरत सैलानी बाबा दरबार  उर्स कमिटी यांच्या वतीने श्रीरामपुरातील श्री राम मंदिर चौक या ठिकाणी श्रीरामांचा रामनवमीनिमित्त हरिपाठ चालू असल्याने उर्स कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवावीया व ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद तसेच कायदेशीर सल्लागार अजित डोखे यांनी मंदिराचे पावित्र्य राखत सदर श्रीराम मंदिर परिसरामध्ये ढोल ताशे नगारे तसेच म्युझिकल बँड बंद करून मिरवणूक शांतपणे गांधी चौकापर्यंत घेऊन गेलेत गांधी पुतळा पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी रोड मार्गे गिरमे चौक व हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी चादर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला

संदल शरीफ हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी दहा वाजता सर्व विधिवत सलाम दुवा पूजा करून बाबांच्या दर्गा मजांवर चढविण्यात आला

मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून सुव्यवस्थितपणे तसेच शिस्तबद्ध होण्यासाठी हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य सभासद तसेच भाविक भक्तगण शहरातील सुजाण नागरिक शहराची शान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस प्रशासन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बरमे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे व श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनांं वह्या वाटप करुन साजरी केली जयंती.बेलापुर झेंडा चौकात दोन ठिकाणी, बेलापुर ग्रामपंचायत, नगररोड मित्र मंडळ ,बेलापुर विविध कार्यकारी संस्था, खटकाळी गावठाण आदि ठिकाणी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .  बेलापुरातील राजवाडा येथुन डाँक्टर बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याची  वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर तहसीलदार मिलींद वाघ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले या वेळी जि प शाळेतील विद्यार्थ्यांना २००० वह्याचे वाटप करण्यात आले या वेळी तहासीलदार वाघ यांनी रमेश अमोलीक मित्र मंडळाच्या वतीने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले .या वेळी बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले मा.सरपंच भरत साळूंके रविंद्र खटोड डाँक्टर चेतन लोखंडे देविदास देसाई  अल्ताफ शेख मयुर खरात सागर साळवे सनी खरात प्रतिक आमोलीक रोनल अमोलीक अलिशा अमोलीक विजु भिंगारदिवे विजय अमोलीक किरण गायकवाड हरिष दाणी अनिता खरात प्रभावती अमोलीक सिमा तेलोरे आदिसह महिला पुरुष सहभागी झाले होते ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले झेंडा चौकात तसेच बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयात जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलीक उपसरपंच  मुस्ताक शेख हाजी इस्माईल शेख,जालिंदर कुऱ्हे, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर खंडागळे एकनाथ नागले देविदास देसाई, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे,सुहास शेलार बंटी शेलार भरत साळूंके, सुभाष अमोलिक,भाऊसाहेब तेलोरे, सागर खरात,सचिन अमोलिक, रावसाहेब अमोलिक, विनायक जगताप, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर,प्रल्हाद अमोलिक, शशिकांत तेलोरे, बाळासाहेब शेलार,आजीज शेख जाकीर शेख  संजय भोंडगे,सोमनाथ जावरे, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र तेलोरे,मुस्ताक आतार,बाबुराव पवार, सुधीर तेलोरे,आदिंनी डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेत बाजार समितीचे सभापती सुधीर नवले पोलीस पाटील अशोक प्रधान व्हा चेअरमन विश्वनाथ गवते अनिल नाईक गोरक्षनाथ कुर्हे भाऊसाहेब वाबळे अरुण अमोलीक प्रकाश कुर्हे विजय खंडागळे अयाजअली सय्यद चंद्रकांत नाईक उपस्थित  होते नगर रोड मित्र मंडळाच्या वतीने शरद नवले अभिषेक खंडागळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हवालदार बाळासाहेब कोळपे काँन्स्टेबल संपत बडे नंदकिशोर लोखंडे  भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे सुनिल मुथा देविदास देसाई पुरुषोत्तम भराटे राहुल माळवदे सावकार अमोलीक  शुभम पारखे दिनेश सकट सनी बनसोडे शुभम दांडगे आदिच्या उपस्थितीत माहामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व राजनीती समाचार न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समाजसेवक देवळाली प्रवरा येथील श्री इब्राहिम फत्तुभाई शेख यांची राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली,एडवोकेट विलासराव पठारे प्रदेशाध्यक्ष, मधुकरराव थोरात राष्ट्रीय सचिव पत्रकार,उस्मान भाई शेख प्रदेश उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन बहुजन फोर्स या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष शेख बरकत अली यांच्या हस्ते इब्राहिम शेख यांना प्रदान करण्यात आले

इब्राहिम शेख यांच्या या निवडीबद्दल संघटनेच्या वतीने एडवोकेट विलासराव पठारे, मधुकरराव थोरात, अरुण त्रिभुवन, सलीम पठाण, रोहिदास थोरात, उस्मान भाई शेख, सुखदेव केदारे, अमीर भाई जहागीरदार, अकील हाजी सुन्ना भाई, राजू भाई आर शेख, राजू भाई के शेख, असलम बिनसाद, अकबर भाई शेख, रवींद्र जगताप, राहुल कोळगे,  अमीर बेग, कचरू लोहकरे, मन्सूर भाई शेख, विजय खरात, सज्जाद अन्सारी, प्रकाश मालोकर, माधव सोळशे, एजाज भाई सय्यद, मुसा भाई सय्यद, अस्लम भाई सय्यद, राजेंद्र सूर्यवंशी, हमद भाई शेख, रसूल सय्यद, सखाराम पगार, सूर्यकांत गोसावी, शब्बीर भाई कुरेशी, लालू भाई सय्यद, अशोक भिंगारे, सौ बानोबी शेख रेशमा शेख, सौ सविता भालेराव, सौ रुबीना रफिक शेख, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget