डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णांना शक्तीवर्धक औषधे देणाऱ्या दुकानावर कारवाई व्हावी -डाँक्टर व मेडीकल असोसिएशनची पत्रकार परिषदेत तक्रार

बेलापुर(प्रतिनिधी  ) - एका मेडिकल दुकानात स्टिरॉइड्स,झोपेचे उत्तेजक द्रव्ये असणारी औषधे,गर्भपात कीट, सेक्सुअल आदी औषधांची डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय खुलेआम विक्री केली जात असुन डाँक्टर सल्ल्याशिवाय दिल्या जाणाऱ्या औषधामुळे रुग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप बेलापूर डाँक्टर असोसीएशन व मेडिकल असोसएशनच्या वतीने आयोजित पत्रकार परीषदेत करण्यात आला आहे .    

            यावेळी  मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिपक अनभुले,उपाध्यक्ष डॉ.शैलेश पवार,सचिव डॉ.अनिल भगत,डॉ.रविंद्र गंगवाल,डॉ. भारत काळे,डॉ.मच्छिंद्र निर्मळ,डॉ.आशुतोष जोशी,डॉ.संदीप काळे,डॉ.सुधीर काळे,डॉ.मिलिंद बडधे आदींसह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारीही उपस्थित होते. सदर मेडिकल मधून कोरोना काळातही डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय बिनधास्त औषध विक्री केली जात असल्याचा आरोपही डाँक्टरांनी केला आहे.त्यावेळीही अन्न औषध विभागाकडे तक्रार केली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.२०२० पासून आजतागायत जिल्हाधिकारी,अन्न औषध प्रशासन विभाग आयुक्त मुंबई,आरोग्य मंत्रालय यांचेकडे अनेक तक्रारी केल्या. परंतू ठोस कारवाई होत नसल्याचे गौडबंगाल नेमके काय आहे? अशीही शंका मेडिकल असोसिएशन कडून व्यक्त करण्यात आली आहे.सदर मेडिकल मधून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व चिठ्ठीशिवाय तसेच रुग्णांना कोणतेही बिल न देता दिली जाणारी औषधे आज जरी स्वस्त वाटत असली तरी भविष्यात रुग्णासाठी ते घातक ठरू शकतात. घातक स्टिरॉइड मुळे रुग्णांचे रक्त जळते,प्रतिकार शक्ती कमी होते,शरीर फुगते या औषधांची सवय झाल्याने काही दिवसानंतर इतर कोणतेही औषध लागू होत नाही.एवढेच नाही तर मासिक पाळी येऊ नये म्हणून गोळ्या देणे,सेक्स वाढवणारी घातक औषधे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय राजरोसपणे विकली जात आहेत.याबाबत सदर मेडिकल दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

            दरम्यान मेडिकल असोसिएशनने तक्रार केल्यावर अहमदनगर अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्तांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी सबंधित मेडीकलची तपासणी करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.त्यानंतर २३ मे २०२२ ते ६ जून २०२२ या १५ दिवसांसाठी परवाना रद्द करण्यात आला होता.मात्र त्या नंतरही असाच प्रकार सुरू राहिल्याने अन्न औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मेतकर यांनी ६ मे २०२४ पासून सदर मेडिकलचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे आदेश ३० जानेवारी २०२४ रोजी दिल्याचे सांगितले आहे.या बाबत मेडिकल असोसिएशनने तक्रार केली म्हणून संबधीतांनी काही डॉक्टरांना दमबाजी करणे, भिती दाखवण्याचे प्रकारही केल्याचा आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकीची तसेच जास्त पाँवरची औषधे दिल्यामुळे रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळतो परंतु काही दिवसानंतर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.त्यामुळे अशी आरोग्यावर परिणाम करणारी औषधे डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्या मेडीकल दुकानावर कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे .तसेच डाँक्टर व मेडीकल असोसिएशनच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत दादा पवार तसेच आरोग्यमंत्री, महसुल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख, प्रांताधिकारी श्रीरामपुर, तहसीलदार श्रीरामपुर, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन आदिंनाही निवेदन पाठविण्यात आल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget