बेलापुरात विविध उपक्रमांनी साजरी झाली भगवान महावीर जयंती
बेलापुर (प्रतिनिधी )- संपुर्ण विश्वाला त्याग संयम शिल सदाचार सत्य अहींसा प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर वर्धमान महावीर यांची जयंती बेलापुरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली . या वेळी भगवान वर्धमान महावीर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक झेंडा चौकात आल्यानंतर जि प सदस्य शरद नवले बाजार समीतीचे उपसभापती पत्रकार देविदास देसाई उपसरपंच मुस्ताक शेख एकनाथ उर्फ लहानु नागले आदिंनी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला बेलापुर ग्रामपंचायत कार्यलयातही भगवान महावीर यांची जयंती साजरी करण्यात आली मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर तेथे भगवान महावीरांच्या जिवनावर नाटीका सादर करण्यात आली या वेळी धार्मिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या रश्मी लुंक्कड ,द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंता बाठीया ,व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या सौ कविता सुनिल मुथा यांना सन्मानित करण्यात आले सायंकाळी प्रश्न मंजुषा व भक्ती संध्या कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी किराणा मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, सुवालाल लुंक्कड, संजय बाठीया ,विजय कटारीया,सचिन कोठारी, संदीप देसर्डा, सचिन कोठारी ,अमीत लुंक्कड ,आनंद लुंक्कड ,पारस लुंक्कड ,अजय डाकले, शितल गंगवाल विकी मुथा, रत्नेष बोरा ,योगेश कोठारी ,स्वप्नेश बोरा, शांतीलाल संचेती ,कांतीलाल मुथा तसेच सौ अर्चना कोठारी ,संगीता मुथा मंगलताई चेंगेडीया पदमा ताथेड ज्योती लुंक्कड ,चंद्रकला लुंक्कड ,मंगल लुंक्कड ,कविता मुथा ,पुजा गांधी ,सरला देसर्डा ,हर्षीता कोठारी, मोनाली लुंक्कड ,सोनाली लुंक्कड ,दिपाली कोठारी ,निलम देसर्डा ,राखी संचेती ,निकीता लुंक्कड ,सुवर्णा लुंक्कड ,राखी लुंक्कड आदिसह महीला-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
Post a Comment