आमदार कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन झालेला श्रीरामपुर बेलापुर रस्ता अंधारातच, अपघात वाढले
बेलापुर (प्रतिनिधी )-श्रीरामपुर तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन श्रीरामपुर बेलापुर रस्त्याचे चौपदरीकरण झाले असले तरी ठेकेदाराच्या चुकीमुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत तसेच रस्त्याची स्ट्रीट लाईट बंद पडली असल्याने या बाबत चिंता व्यक्त होत आहे. विकास काय असतो हे आमदार लाहु कानडे यांच्या रुपाने श्रीरामपुर तालुक्याला समजले आमदार कानडे यांच्या विशेष प्रयत्नातुन श्रीरामपुर बेलापुर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पुर्ण झाले रस्त्यावर लाईट देखील लावण्यात आले परंतु सध्या रसवंती ते गायकवाड वस्तीपर्यतचे लाईट तर कायमच बंद असतात.विजेच्या पोलवर बसविलेल्या निम्म्यापेक्षा जास्त लाईट माळा बंद अवस्थेत आहेत तसेच रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे त्यावर रिफ्लेक्टर बसविणे गरजेचे होते रिफ्लेक्टर न बसविल्यामुळे रात्रीच्या वेळेस लवकर गती रोधक लक्षात येत नाही त्यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे.स्ट्रीट लाईट चे काम निकृष्ट झाले असून स्ट्रीट लाईट बंद आहेत.ज्या ज्या ठिकाणी गतीरोधक बसविलेले आहे. तेथे तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत श्रीरामपुर ते मोसंबी बागेपर्यत रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे परंतु मोसंबी बाग ते बेलापुर पर्यंतचे डांबरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे ते काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे तसेच नादुरुस्त विज जोड दुरुस्त करुन रस्त्यावरील सर्व बंद लाईट पूर्ववत सुरु करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
Post a Comment