बेलापुरात शेतातील उसात सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुरात ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या ऊसाच्या शेतात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला असुन मयताचे नाव चंदु वायदंडे आहे बेलापुरातील आयोध्या काँलनीच्या पाठीमागे असणाऱ्या ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या गट नंबर ४६ मधील ऊसाच्या शेतातुन दुर्गंधी येत असल्याचे ओहोळ लक्षात आले .सडलेला उग्र वास कशाचा येतो म्हणून सेवानिवृत्त मंडलाधिकारी जनार्धन ओहोळ हे पहाण्यासाठी गेले असता तेथे सडलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुधीर हापसे यांना कळवीले हापसे आपले सहकारी भारत तमनर तसेच पोलीस पाटील अशोक प्रधान यांना घेवुन घटनास्थळी पोहोचले ही वार्ता बेलापुरात पसरताच घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी रवाना केले पुढील तपास सहाय्यक फौजदार सुधीर हापसे हे करत आहेत या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा सुरु असुन चंदु वायदंडे हा आचारी काम करत होता ,त्यामुळे त्याने आत्महत्या केली की या मागे काही वेगळे कारण आहे ? अशी चर्चा सुरु आहे
Post a Comment