ऊसाची वहातुक करणारे जुगाड पलटी दुकान विक्रेता थोडक्यात वाचला

बेलापूर :(प्रतिनिधी  )- तालुक्यातील बेलापूर येथून लोणीकडे जाणारा भरगच्च भरलेल्या उसाचा ट्रॅक्टरचे जुगाड ऐन कोल्हार चौकात पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला मांसाहारी विक्री करणारा विक्रेता बालबाल बचावला                       शनिवारी दुपारी ( दि.२०) साडेचार वाजेच्या सुमाराला हि घटना घडली.उसाचा ट्रॅक्टर ऐन चढावर आल्याने पलटी झाला.लोणीच्या दिशेने निघालेल्या ट्रॅक्टर जुगाड ओव्हरलोड असल्याने कोल्हार रस्त्याच्या कडेला बसलेल्या 

मासांहारी विक्री करणाऱ्या दुकानावरच कोसळले.नशीब बलवत्तर

म्हणून तो विक्रेता थोड्क्यात बचावला आहे.ऊसाचा ट्रक्टर पलटी होताच दुकानदार दबला गेला असेल अशा शंकेने अनेकांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली.परतु त्याला काही दुखापत झाली नाही. सामानाचे व मांसाहारी विक्री करणाऱ्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले होते. त्या वेळी नागरिकांनी  मोठी गर्दी

केली होती. एकाच ट्रँक्टरला दोन ऊसाच्या भरलेल्या ट्राँल्या जोडल्या जातात त्याही अवस्थेत चालक भरधाव वेगाने ट्रँक्टर चालवत असतात शिवाय ट्रँक्टरवर मोठ्या आवाजात गाणे लावलेले असते .त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे शिवाय शेतकऱ्याचेही नुकसान होत आहे शिवाय चालकही १८ वर्षाच्या आतीलच असतो या सर्व बाबींची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घ्यावी आशी नागरीकांची मागणी आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget