श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीती जैसे थे ठेवण्याचे मा.उच्च न्यायालयाचे आदेश

बेलापुर  (प्रतिनिधी  )-श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीती बरखास्तीला मा. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगीती मिळाली असुन मा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या ४५ (१ )च्या नोटीशीच्या कारवाई विरोधात संरक्षण दिले आहे .         जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना ४५ ( १)ची नोटीस बजावली होती या नोटीस विरोधात बाजार समीतीचे सभापती सुधीर नवलेसह १२ संचालकांनी मा. उच्च न्यायालयात पिटीशन क्रमांक २९५० /२०२४ दाखल केले होते या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर व्ही घुगे व न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्यासमोर झाली,दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती घुगे व न्यायमूर्ती जोशी यांनी ४५ ( १ )ची कारवाई झाल्यास १५ दिवसाचे संरक्षण दिले असुन ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे मान्या केले दुसरे अपील बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दाखल केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की समीतीला ४० अ  ब खाली बेकायदेशिर नोटीसा दिलेल्या आहेत .बाजार समितीचे आर्थिक वर्ष संपलेले नाही .समीतीचे नफा तोटा पत्रक तयार नाही बाजार समीतीची दोन वेळेस चौकशी झाली परंतु कुठलाच गंभीर दोष आढळून आलेला नाही त्यामुळे दिलेली नोटीस ही बेकायदेशीर आसल्याचे अँड महेश देशमुख व अँड राहुल कर्पे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर न्यायमूर्ती एस जी मेहेरे यांनी जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले.वादीचे वकील आँड राहुल कर्पे यांनी सांगितले की न्यायमूर्ती  मेहेरे यांनी संचालक मंडळ हे लोकनियुक्त संचालक मंडळ असुन त्यांना संरक्षण मागण्याचा पुर्ण अधीकार असल्याचे म्हटले असल्याचे सांगितले न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रीरामपुर कृषी बाजार समीती जैसे थे राहणार आहे    (बाजार समीतीला एक वर्ष पुर्ण झाले नाही तरी सात महीन्यात दोनदा चौकशी केली कुठल्याही विकास कामांना परवानगी न देता विरोधकांनी अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु संचालक मंडळाच्या चोख कामामुळै बाजार समीतीला ५०लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले चार कोटी पन्नास लाखाच्या पावत्या झाल्या हे संस्थेच्या इतिहासात प्रथमच घडले आहे न्यायालयाचा निकाल हा विरोधकांनी केलेल्या खोट्या तक्रारीला चपराक आहे .. सुधीर नवले सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती श्रीरामपुर

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget