हजरत सैलानी बाबा दरबार उर्स कमिटी यांच्या वतीने श्रीरामपुरातील श्री राम मंदिर चौक या ठिकाणी श्रीरामांचा रामनवमीनिमित्त हरिपाठ चालू असल्याने उर्स कमिटीचे अध्यक्ष कृष्णा धुवावीया व ट्रस्टचे अध्यक्ष असलम बिनसाद तसेच कायदेशीर सल्लागार अजित डोखे यांनी मंदिराचे पावित्र्य राखत सदर श्रीराम मंदिर परिसरामध्ये ढोल ताशे नगारे तसेच म्युझिकल बँड बंद करून मिरवणूक शांतपणे गांधी चौकापर्यंत घेऊन गेलेत गांधी पुतळा पोलीस स्टेशन समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी रोड मार्गे गिरमे चौक व हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी चादर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला
संदल शरीफ हजरत सैलानी बाबा दरबार या ठिकाणी दहा वाजता सर्व विधिवत सलाम दुवा पूजा करून बाबांच्या दर्गा मजांवर चढविण्यात आला
मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून सुव्यवस्थितपणे तसेच शिस्तबद्ध होण्यासाठी हजरत सैलानी बाबा उर्स कमिटीचे सर्व सदस्य सभासद तसेच भाविक भक्तगण शहरातील सुजाण नागरिक शहराची शान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस प्रशासन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बरमे पोलीस उप विभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे व श्रीरामपूर शहराचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment