Latest Post

राहता (गौरव डेंगळे): प.पू गुरुमाऊलींचे आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र साकुरी ता.राहता जि. अहमदनगर येथे दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी भव्य एक दिवसीय श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ (मोठा ग्रंथ) पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून ३५१ सेविकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज चरणी नवनाथ पाराण्याची सेवा रुजू केली.सेवा सकाळी ७:०० वाजता सुरू झाली तर सायंकाळी ४:३० वाजता संपन्न झाली व त्यानंतर आयोजकाकडून प्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे. साकुरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र हे राज्यभरात प्रसिद्ध असून या ठिकाणी त्रिकाल आरती, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी प्रश्न-उत्तर विभाग, रविवारी बालसंस्कार व ग्राम अभियान तसेच रविवारच्या दिवशी विवाह मंडळाचे कामकाज सुरू असते.केंद्र प्रतिनिधी म्हणून प्रभाकर दंडवते, गुरुपीठ प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण पांगरकर शास्त्री,बाल संस्कार प्रतिनिधी म्हणून उज्वला बावके,ग्राम अभियान प्रतिनिधी म्हणून उर्मिला गायकवाड,कृषी प्रतिनिधी म्हणून निर्मला पोटे तर विवाह मंडळ प्रतिनिधी म्हणून शालिनी वाणी काम बघतात.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-येथील विश्वकर्मा मित्रमंडळाच्या वतीने मानव सृष्टीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली या वेळी महाराष्ट्र राज्य सुतार समाजाचे विभागीय अध्यक्ष अँड. व्ही. टी. शिंदे ,बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे  पत्रकार देविदास देसाई  शेलार बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे  काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड ,शिवाजी पा वाबळे प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले ,समता परिषदेचे प्रकाश कुर्हे  ,गणेश लढ्ढा, पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार आदि मान्यवरांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले ,या वेळी बल्लु दायमा अरविंद राठी ,विशाल मेहेत्रे  ,विशाल आंबेकर ,सचिन शर्मा ,बाळासाहेब शर्मा ,सतीश शर्मा शुभम शर्मा ,संजय शर्मा ,राजेंद्र शर्मा ,रामभाऊ वाकचौरे ,गोविंद भराटे ,राजु पोपळघट ,भाऊसाहेब पोपळघट ,निर्मलराज , ईंद्रजीत ,गीरीश परांजपे ,अर्जुन कुर्हे गोरक्षनाथ शिंदे जालींदर शिंदे , आप्पासाहेब महाले , जयराम शर्मा आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते

कोपरगाव (गौरव डेंगळे): येथील सोमैया विद्या विहार संचलित 

श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे वाहन चालक श्री.शरद अशोकराव त्रिभुवन यांना 

सन २०२३-२४ च्या सर्वोत्तम कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्री शारदा इंग्लिश मिडीयम  स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान श्री.शरद त्रिभुवन यांना प्रमुख पाहुणे श्री.संदीप कोते,

सौ .सारिका कोते,के.जे.सोमैया कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी .एस.यादव,विधीज्ञ 

श्री. सी.एम.वाबळे, शाळेचे प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या सौ.शुभांगी अमृतकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह  प्रमाणपत्र व रोख रक्कम ५०००/- प्रदान करण्यात आले.

श्री.त्रिभुवन हे सन २०१६ पासून शारदा शाळेमध्ये वाहन चालक म्हणून काम करत असून आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मागील सलग २  वर्षापासून सोमैया वार्षिक पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कारार्थी म्हणून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते.संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या भल्या करीता प्रत्येक कामाला त्रिभुवन हे कायम तत्पर असतात. वाहन  चालक म्हणून ते आपली कामगिरी अतिशय चोख  बजावतातच परंतु त्याचबरोबर शाळेतील सर्व कामामध्ये शिक्षकांना सहकार्य देखील करतात.शाळेतील विविध कार्यक्रमासाठी मंडप उभारणी तसेच शाळेतील विविध रंगरंगोटीचे काम यामध्ये ते आपल्या सहकाऱ्यांची नेहमीच मदत करतात.शारदा संकुल हे जणू आपलं घरच आहे अशी भावना त्यांच्या मनात नेहमीच असते.त्यांच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना हा सर्वोत्तम कर्मचाऱ्यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.श्री.शरद त्रिभुवन यांचे या पुरस्काराबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे माननीय प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपस्थित प्रमुख अतिथी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

श्रीरामपूर, शिर्डी लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्हीआयपी गेस्ट श्रीरामपूर या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकी व प्रवेश सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चरणदादा त्रिभुवन यांनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष विशाल भैया कोळगे होते आपल्या अध्यक्षीय भाषणात विशाल भैय्या कोळगे म्हणाले की सध्या देशामध्ये 2024 लोकसभा निवडणूक होणार आहे सध्या देशांमध्ये भाजपचा सरकार आहे या सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी खाजगीकरण भ्रष्टाचार ईडी सीबी आयचा गैरवापर फोडाफोडीचे राजकारण यामुळे जनता त्रस्त झाली आहे या सरकारला खाली खेचण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी बरोबर युती हो या ना हो परंतु आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपला खासदार निवडून द्यायचा आहे यासाठी जनजन पछाडा जीवाचं रान करा असा आव्हान कोळगे यांनी कार्यकर्त्यांना केले, यावेळेस असंख्य महिलांनी पुरुषांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला तसेच काही कार्यकर्त्यांना महत्त्वाची जबाबदारी देऊन पदही दिले  त्यामध्ये महिला आघाडीच्या श्रीरामपूर  महासचिव म्हणून दर्शना ताई काळे तालुका संघटक वैशालीताई मुसळे तालुका उपाध्यक्ष ताई जाधव शहराध्यक्ष रिंकू लोखंडे तालुका संघटक रेखाताई बर्डे कार्याध्यक्ष नीताताई साळवे तसेच फादर बॉडी चे  तालुका उपाध्यक्ष शिवा भाऊ साठे तालुका कार्याध्यक्ष प्रमोद भाऊ बारसे तालुका संघटक कृष्णा महांकाळे तालुका संघटक रमेश दिवे शहर उपाध्यक्ष कुणाल भाऊ वाघ  व विद्यार्थी तालुका बॉडी सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष संघराज त्रिभुवन शहराध्यक्ष रितेश पाळंदे तालुका उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष  सौरभ जगताप निखिल विघावें कार्याध्यक्ष सार्थक नवले यांच्या निवडी करण्यात आल्या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जिल्हा महासचिव अनिल भाऊ जाधव जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दोंदे साहेब महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका सल्लागार ऍड अण्णासाहेब मोहन जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव दिवे सल्लागार लक्ष्मणराव मोहन तालुका कोषाध्यक्ष वसंतराव साळवे  बाबाभाई शेख प्रवीण भाऊ साळवे अब्बास भाई शेख सुमेध भैय्या पडवळ किशोरभाऊ ठोकळ सोपनिल गायकवाड प्रफुल्ल बारसे सुयोग तोरणे रोहित अमोलिक सचिन चक्रनारायण अक्षय चक्रनारायण आकाश भाऊ  आदित्य यादव, प्रशांत चव्हाण कैवल्य लावंड जैद शेख सौरभ जगताप नयन  नवले अजय कमाने तनिष्क वैद्य ओम लेकुरवाळे राज वाकचौरे रवींद्र शिंदे,अक्षय कांगणे, सुरज विटेकर विशाल बनकर, प्रकाश वेताळ ऋषिकेश औताडे,तेजस जगताप , रितेश पाळंदे,,यश गायकवाड,साहिल अटांगरे,निलेश येवलेअधिक कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप सुमेधभैय्या पडवळ यांनी केला

श्रीरामपुर (प्रतिनिधी) :अहमदनगर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने २१ वर्षाखालील मुले व मुली यांची पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेकरिता -  जिल्हास्तरीय निवड चाचणी सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी १०:०० वा महाले पोदार,श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री नितीन बलराज यांनी दिली.पात्र खेळाडूंची जन्मतारीख १/१/२००४ पुढील असावी. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी खालील कागदपत्रे आपल्याबरोबर घेऊन यावेत M V A फॉर्म,स्वतःचे ३ पासपोर्ट साईज फोटो,बोर्ड सर्टिफिकेट,ओळखपत्र,आधार कार्ड,जन्मतारखेचा दाखला,शाळेचे किंवा,महाविद्यालयाचे बोनाफाईट.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री राजेंद्र कोहकडे,श्री शलींद्र त्रिपाठी,श्री सुनील चोळके,श्री पापा शेख,श्री दत्ता घोरपडे,श्री नितीन गायधने आदिशी संपर्क साधावा.


सूचना: येताना सर्वांनी MVA भरून आणायचा आहे. निवड चाचणीसाठी MVA फॉर्म भरणाऱ्या खेळाडूंनाच सहभागी होता येईल.

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रीका धारक प्रत्येक कुटुंबाला  दर वर्षी एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकुण ८८०३७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधीकारी हेमा बडे यांनी दिली आहे .कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत अंत्योदय लाभार्थी ( २० किलो तांदुळ व १५  किलो गहु मिळणारे लाभार्थी ) यांना प्रति कुटुंब दर वर्षी  एक साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतला होता त्या करीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल  संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे .महामंडळामार्फत अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करुन ते  दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुका स्तरावरील गोदामापर्यत पोहोचविण्यात येणार आहे .महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS )यंत्रणेकडील गोदामापर्यत साड्यांचा पुरवाठा केल्यानंतर तेथुन अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबापर्यत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आहे .अहमदनगर जिल्ह्यातील ८८०३७ अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना या योजनेतंर्गत एक साडी प्रति कुटुंब मिळणार आहे  त्यात नगर तहसील ४७४६पारनेर ३६३८ पाथर्डी ६२७६ कर्जत ३५४७ शेवगाव ९७५८ जामखेड ५६३८ श्रीगोंदा ८७४४ संगमनेर ६३८६ कोपरगाव ६७७८ अकोले ६१९९ श्रीरामपुर  ५७३४ नेवासा ७१५७ राहाता ५५९२ राहुरी ६१५२ नगर एफडीओ १७०१ या प्रमाणे लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे होळी सणापूर्वी अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचे शासनाचे निर्देश आहेत                                [शासनाने केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा त्रास, कटकटी वाढणार आहे सर्वच कार्डधारक साड्यांचा आग्रह धरुन धान्य दुकानदारांशी वाद घालणार आहेत.                            देविदास देसाई  जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदनगर  ]

शिव छत्रपती क्रीडा संकुलान बालेवाडी पुणे येथे पहिली साऊथ येशिया चॅम्पियनशिप 2024, 3 व 4 फेब्रुवारी 2024 या दोन दिवशीय पाहिली साऊथ येशीया तायकोन स्पर्धा पार पडली त्या मध्ये 5 देश सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक प्राप्त केला. सहभागी झालेले देश1) भारत 2) नेपाळ, ३) भूतान, 4) बांगला देश, 5) श्रीलंका हे देश या स्पर्धा साठी सहभागी झाले होते त्या मध्ये भारताचा पहिला क्रमांक आला. व दुसरा क्रमांक नेपाळ ने प्राप्त केला. व तिसरा क्रमांक भूतान ने प्राप्त केला. तायकोन संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ आप्पा शिंदे सर  व तायकोन संघटने चे महासाचिव श्री ऑ. राज वागडकर सर  याच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. व या स्पर्धसाठी साठी संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले व  संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे विद्यार्थ्यांना संस्थाक श्री सचिन पवार, सचिव अशोक शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्रचे विजयी विद्यार्थी 

1) वेदांत शेजुल.दोन Gold, २) दीप्ती महेंद्र जगताप Bronze,Silver, 3) निकिता सुनिल जगताप Silver,Silver, 4) निकिता कैलास जगताप. Bronze,Gold  5) तृप्ती रमेश वाघ.Bronze,Silver 6) स्वामींनी दत्तात्रय दरेकर.Bronze,bronze, 7) ओम दिगंबर लोहकने.Gold,Gold, 8) श्रावणी गणेश शेजुळ.Silver,gold, 9) श्रुतिका बापु वाघ.Gold  10) तेजस संजय राऊत Bronze,gold, 11)अधिरज अनिल अरांडे Gold,Gold, 

संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र चे  प्रमुख मार्गदर्शक सचिन पवार ,प्रशिक्षक श्री अशोक शिंदे, सचीन जाधव, अमोल माळी, व प्रशिक्षक आदित्या माळी , ओम लोहकने, सार्थक शिंदे, रोहन घोडके  रवींद्र शिंदे , व महिला प्रशिक्षक रेश्मा शिंदे, प्रतिभा गायकवाड , दिपीका पोल , येश्र्वर्या जोगदंड . संघर्ष स्पोर्ट्स अँड मिक्स मार्शल आर्ट महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या विजय होण्यामागे यांनी अधिक परिश्रम घेतले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget