अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना मिळणार आता एक साडी

बेलापुर  ( प्रतिनिधी  )- कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रीका धारक प्रत्येक कुटुंबाला  दर वर्षी एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एकुण ८८०३७ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहीती जिल्हा पुरवठा अधीकारी हेमा बडे यांनी दिली आहे .कँप्टीव्ह मार्केट योजनेतंर्गत अंत्योदय लाभार्थी ( २० किलो तांदुळ व १५  किलो गहु मिळणारे लाभार्थी ) यांना प्रति कुटुंब दर वर्षी  एक साडी वाटप करण्याचा निर्णय शासनाने १० नोव्हेंबर २०२३ रोजी घेतला होता त्या करीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल  संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे .महामंडळामार्फत अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करुन ते  दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुका स्तरावरील गोदामापर्यत पोहोचविण्यात येणार आहे .महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS )यंत्रणेकडील गोदामापर्यत साड्यांचा पुरवाठा केल्यानंतर तेथुन अंत्योदय शिधापत्रीका धारक कुटुंबापर्यत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आहे .अहमदनगर जिल्ह्यातील ८८०३७ अंत्योदय लाभार्थी कुटुंबांना या योजनेतंर्गत एक साडी प्रति कुटुंब मिळणार आहे  त्यात नगर तहसील ४७४६पारनेर ३६३८ पाथर्डी ६२७६ कर्जत ३५४७ शेवगाव ९७५८ जामखेड ५६३८ श्रीगोंदा ८७४४ संगमनेर ६३८६ कोपरगाव ६७७८ अकोले ६१९९ श्रीरामपुर  ५७३४ नेवासा ७१५७ राहाता ५५९२ राहुरी ६१५२ नगर एफडीओ १७०१ या प्रमाणे लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे होळी सणापूर्वी अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचे शासनाचे निर्देश आहेत                                [शासनाने केवळ अंत्योदय लाभार्थ्यांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा त्रास, कटकटी वाढणार आहे सर्वच कार्डधारक साड्यांचा आग्रह धरुन धान्य दुकानदारांशी वाद घालणार आहेत.                            देविदास देसाई  जिल्हाध्यक्ष अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदनगर  ]

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget