१९ फेब्रुवारी रोजी श्रीरामपूरात पुणे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) :अहमदनगर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने २१ वर्षाखालील मुले व मुली यांची पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेकरिता -  जिल्हास्तरीय निवड चाचणी सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ सकाळी १०:०० वा महाले पोदार,श्रीरामपूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय व्हॉलीबॉल सचिव श्री नितीन बलराज यांनी दिली.पात्र खेळाडूंची जन्मतारीख १/१/२००४ पुढील असावी. निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी खालील कागदपत्रे आपल्याबरोबर घेऊन यावेत M V A फॉर्म,स्वतःचे ३ पासपोर्ट साईज फोटो,बोर्ड सर्टिफिकेट,ओळखपत्र,आधार कार्ड,जन्मतारखेचा दाखला,शाळेचे किंवा,महाविद्यालयाचे बोनाफाईट.निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी श्री राजेंद्र कोहकडे,श्री शलींद्र त्रिपाठी,श्री सुनील चोळके,श्री पापा शेख,श्री दत्ता घोरपडे,श्री नितीन गायधने आदिशी संपर्क साधावा.


सूचना: येताना सर्वांनी MVA भरून आणायचा आहे. निवड चाचणीसाठी MVA फॉर्म भरणाऱ्या खेळाडूंनाच सहभागी होता येईल.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget