साकुरी येथे राष्ट्रकल्याणासाठी ३५१ सेवेकरांनी केली एकदिवसीय नवनाथ पाराण्याची सेवा.
राहता (गौरव डेंगळे): प.पू गुरुमाऊलींचे आशीर्वादाने व आदरणीय श्री चंद्रकांतदादा मोरे मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र साकुरी ता.राहता जि. अहमदनगर येथे दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी भव्य एक दिवसीय श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथ (मोठा ग्रंथ) पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला.या एक दिवसीय नवनाथ पारायण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून ३५१ सेविकाऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज चरणी नवनाथ पाराण्याची सेवा रुजू केली.सेवा सकाळी ७:०० वाजता सुरू झाली तर सायंकाळी ४:३० वाजता संपन्न झाली व त्यानंतर आयोजकाकडून प्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे. साकुरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र हे राज्यभरात प्रसिद्ध असून या ठिकाणी त्रिकाल आरती, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी प्रश्न-उत्तर विभाग, रविवारी बालसंस्कार व ग्राम अभियान तसेच रविवारच्या दिवशी विवाह मंडळाचे कामकाज सुरू असते.केंद्र प्रतिनिधी म्हणून प्रभाकर दंडवते, गुरुपीठ प्रतिनिधी म्हणून बाळकृष्ण पांगरकर शास्त्री,बाल संस्कार प्रतिनिधी म्हणून उज्वला बावके,ग्राम अभियान प्रतिनिधी म्हणून उर्मिला गायकवाड,कृषी प्रतिनिधी म्हणून निर्मला पोटे तर विवाह मंडळ प्रतिनिधी म्हणून शालिनी वाणी काम बघतात.
Post a Comment