बेलापुर ग्रामपंचायतीला आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार मिळाल्याबद्दल पदाधीकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

बेलापूर (प्रतिनिधी): बेलापूर ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा "आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार" चे वितरण महसूलमंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते तसेच खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धराम शालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियांका कुऱ्हे, सुशिलाबाई पवार, वैभव कुऱ्हे आदींनी स्विकारला.                               सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांचेसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला.                                                   बेलापूर ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजने अंतर्गत १२६ कोटी खर्चाची पाणी पुरवठा योजना,साठवण तलाव,बंदिस्त गटारीची कामे,नियमित घंटागाडीव्दारे कचरा संकलन,नियमित लसीकरण,घरकुल योजनेची काटेकोर अंमलबजावणी ,विना पोलिस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक ,विविध सांस्कृतिक उपक्रम,क्रीडा स्पर्धा,दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण आदि कामे करुन पुरस्कारासाठीची निकषपूर्ती केल्याने सदरचा पुरस्कार देण्यात आला.                   सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी            ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे, भाजपा जिल्हा अल्पसंख्यांक आघाडीचे हाजी ईस्माईल शेख, पत्रकार देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, सोसायटीचे माजी चेअरमन भास्कर बंगाळ, माजी उपसरपंच प्रकाश नाईक, बाबुराव पवार, गोपी दाणी, बाबुलाल पठाण, महेश कुऱ्हे, भाऊसाहेब तेलोरे, भैय्या शेख, मधुकर अनाप, अली शेख, मछिंद्र खोसे, सुभाष रशिनकर आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget