श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे वाहन चालक श्री.शरद अशोकराव त्रिभुवन यांना
सन २०२३-२४ च्या सर्वोत्तम कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन दरम्यान श्री.शरद त्रिभुवन यांना प्रमुख पाहुणे श्री.संदीप कोते,
सौ .सारिका कोते,के.जे.सोमैया कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी .एस.यादव,विधीज्ञ
श्री. सी.एम.वाबळे, शाळेचे प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपप्राचार्या सौ.शुभांगी अमृतकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम ५०००/- प्रदान करण्यात आले.
श्री.त्रिभुवन हे सन २०१६ पासून शारदा शाळेमध्ये वाहन चालक म्हणून काम करत असून आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मागील सलग २ वर्षापासून सोमैया वार्षिक पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कारार्थी म्हणून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते.संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या भल्या करीता प्रत्येक कामाला त्रिभुवन हे कायम तत्पर असतात. वाहन चालक म्हणून ते आपली कामगिरी अतिशय चोख बजावतातच परंतु त्याचबरोबर शाळेतील सर्व कामामध्ये शिक्षकांना सहकार्य देखील करतात.शाळेतील विविध कार्यक्रमासाठी मंडप उभारणी तसेच शाळेतील विविध रंगरंगोटीचे काम यामध्ये ते आपल्या सहकाऱ्यांची नेहमीच मदत करतात.शारदा संकुल हे जणू आपलं घरच आहे अशी भावना त्यांच्या मनात नेहमीच असते.त्यांच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना हा सर्वोत्तम कर्मचाऱ्यांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.श्री.शरद त्रिभुवन यांचे या पुरस्काराबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शाळेचे माननीय प्राचार्य श्री.के.एल.वाकचौरे,उपस्थित प्रमुख अतिथी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Post a Comment