Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-आरटीओ कार्यालय परिसरातील बोगस एजंट व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रशासनातील प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, येथे गैरमार्गाने कार्यरत असलेल्या काही एजंटांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांच्या माध्यमातून या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खोटे व गैरकायदेशीर काम करून घेणेकरिता दबाव आणला आहे. यापूर्वी या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटक व दलालांवर कायदेशीर करावाई करण्यासाठी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत. सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रज्ञा अभंग, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी फिर्यादी दिल्या आहेत. या प्रकारामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रचंड दहशतीखाली काम करत आहेत. संबंधित समाजकंटक व एजंटांवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत कार्यालयीन कामकाज निषेध म्हणून बंद ठेवणार आहोत.बोगस एजंट व समाजकंटकांना या कार्यालयाच्या परिसरात येण्यास बंदी करण्यात यावी, अन्यथा सामूहिकरित्या काम बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अधिकारी व कर्मचार्‍यांनी दिला आहे.निवेदनावर मोटार वाहन निरिक्षक सर्वश्री पद्माकर गो. पाटील, विकास सूर्यवंशी, विनोद घनवट, धर्मराज पाटील, सुनील गोसावी, श्रीमती जयश्री बागुल, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती प्रज्ञा अभंग, श्रीमती श्वेता कुलकर्णी, श्रीमती मयुरी पंचमुख, श्रीमती सुजाता बाळसराफ, अतुल गावडे, धिरजकुमार भामरे, हेमंत निकुंभ, मयुर मोकळ, वरिष्ठ लिपिक हर्षल माळी, दर्शन सोनावणे, अमोल मुंडे, प्रकाश शिलावट, तसेच गोकुळ सुळ, अंकुश अंडे, वैभव गावडे, रावसाहेब शिंदे, नरेंद्र इंजापुरी, शंकर काटे, श्रीकांत शिरे, विशाल पाटील, सचिन असमार, सुनील शेवरे, परेश नावरकर, हेमंत नागपुरे आदींची नावे आहेत.

श्रीरामपूर-लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख पवित्र कुरआन म्हणते की, निःसंशय अल्लाहाकडून तुमच्यावर जर कोणता प्रतिबंध असेलतर तो म्हणजे तुम्ही मृत प्राण्यांचे मांस,रक्त,डुकराचे मांस, आणि त्या गोष्टीही ज्यावर अल्लाहाव्यतिरिक्त अन्य कुणाचे नाव घेतलेले असेल त्या गोष्टी तुमच्यासाठी वर्ज्य (मनाई,मना,हराम) आहेत,

हो ..., परंतू जे लाचार असतील व जे अतिरेक करणारे नसतील अल्लाहाच्या मर्यादांचे उल्लंघन करण्याचा हेतू नसेलतर (त्यांनी जर खाल्लं), तर त्यामध्ये ‌कोणताही गुन्हा नाही,निःसंशय अल्लाहा क्षमाशील व कृपावंत आहेत"(सुराह नं.२ अल- बकराह आ.नं.१७३),

ईमानवंतांनी अन्न काय खावं व काय नाही  हे ही पवित्र कुराण मधे अधोरेखित केले आहे. कुराण नुसार समुद्रात आठरा (१८,०००) हजारापेक्षा जास्त जीव राहतात, समुद्राच्या जलचर प्राणी उदा. बेडूक ,कासव,खेकडे,मगर ई. खाण्यासं मनाई (हराम) केली गेली.त्या व्यतिरिक्त मासे व ईतर सर्व पदार्थ खाण्यांस अनुमती दिली आहे.तसेच ज्या प्राण्यांच्या पक्षींना नखे आहेत,नखांनी व दातांनी क्रुरपणे फाडून खाणारे प्राणी व पक्षी उदा.वाघ,सिंह, कुत्रा,मांजर ई. व पक्षांमध्ये उदा. चिल (घार) व वगैरे.

डुक्कर खाण्यासही मनाई (हराम) करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर अल्लाहा चे नाव घेऊन कापले नाही असे प्राणी ही मनाई (हराम) करण्यात आले आहे.

ईस्लाममधे कोणत्याही गोष्टींसाठी एक विशिष्ट पद्धत आहे तशीच प्राण्यांना (जुंबा) कापताना पध्दती सांगितले आहे .(वजू) स्वच्छ पाण्याने नमाजमधे जसे स्वच्छता करतो त्याप्रमाणेच वजू करुण,ज्या प्राण्यांची कुरबानी करणार आहे त्याला अगोदर व्यवस्थित पोटभर खाऊपिऊ घालून त्यांचं समाधान झाले पाहिजे असं शांत बसवून

ज्या सुऱ्याने त्याला जुबा (कापणार) करणार आहे,त्या सुऱ्याला व्यवस्थितपणे धार लावून घेणं.विशेषत: त्या प्राण्याच्या डोळ्यासमोर ते हत्यार न दिखवता हे केलं पाहिजे. त्याला जाणीव झाली नाही पाहिजे,त्याला दया,माया दाखवूनच जुबासाठी तय्यार करून आडवं धरुन "पहिल्या प्रथय अल्लाहाचे नामस्मरण व नांव घेऊन" च मानेच्या शिरा , श्वास नलीका,असं करीत तीन हिस्से मधे कापणे.त्या प्राण्याचे हाल हाल , (ईस्लाम क्रुर , निर्दयताला विरोध करतो) प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे "हलाल" झालं, काही लोकं "झटका" देऊन प्रक्रिया करतात यांस ईस्लाम हराम समजतो,कारण हलाल शास्त्रिय कारणं,या प्रक्रियेत प्राण्यांला निर्दयी,क्रुरता न होता व तीन वेळा हत्यार फिरवून प्रक्रिया केल्यामुळे प्राण्यांची हृदय जवळ जवळ १-१.५ दीड दोन मिनिटे पंपिंग चालू राहील्यामुळे  रक्ताभिसरण संस्था चालू असल्याने शरीरातील रक्त आतमध्ये न राहता बाहेर फेकले जाते यामुळे रक्त शिरां,शरीरात साकळले (गोठणं,थरबोसिस) होत नाही.यामुळे बॅकटेरीयाज (जिवाणू) व व्हायरस (विषाणू) तयार न होता निरोगी, हेल्थि मांस खाण्यास मिळाल्याने आजारी पडत नाही,हे शास्त्रीय कारण.

 "झटका" पध्दती फार क्रुरते, निर्दयी पद्धत मानली जाते, ईस्लाम निर्दयी पध्दतीला विरोध- मनाई करतो,झटक्यामुळे प्राण्यांची हृदय एकदम बंद पडते जी हलाल ने चलणारी हृदय क्रिया एकदम बंद होईन,पंपिंग थांबून, शिरां,शरीरात रक्त गोठले जाऊन  त्यामुळे अनेक जंतू संसर्ग होऊ शकतो व गंभीर आजाराचे कारण बनते हे शास्त्रीय कारण,पुन्हा त्या प्राण्याची निर्दयीपणे हत्या होते,हे ईस्लामला मान्य नाही.आशा प्रथेला,प्रक्रियेला मनाई "हराम" घोषीत करण्यात आले आहेत.

पुन्हा त्यावेळी वाहण्याऱ्या रक्ताला खाणं हे गंभीर आजाराचे कारण बनू शकतात म्हणून त्याचे सेवन करण्याला 'हराम ' मनाई केली.

तसेच तीक्ष्ण नखे असणारे प्राणी व पक्षीं. उदा. वाघ ,सिंह , बिबट्या,चित्ता,कुत्रा,हिंस्र प्राणी, हिंसक पशू उदा‌ चिल (घार) गिधाड इत्यादीं हे प्राणी पक्षी जंगलात सतत भांडखोर वृत्ती असल्याने त्यांना वारंवार जखमी अवस्थेत असल्याने त्यांना विविध प्रकारचे जीवाणू विषाणू व गंभीर स्वरूपाचे जीवजंतू चिकटलेले असतात धनुर्वात,रॅबिज व असे अनेक गंभीर आजार ह़ोण्याची शक्यता उदभवू शकते म्हणून  आशा प्राणी पक्षीच्या मांस सेवनास "हराम" केलेले आहे.

तसेच "डुक्कर" खाणं,पाळणं  हराम केले आहे,या प्राणी केसाळ असल्याने त्याची मानसिकता ही घाणेरड्या पाण्यात राहणे व तिथिल घाणंचं खाणे त्यामुळे त्यांच्या शरीरात असंख्य प्रकारचे जीवाणू विषाणू व जंतू संसर्ग करणारे जीवजंतू असल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते व खुप संशोधकांच्या संशोधनाने सिद्ध ही झाले की डुक्करांच्या शरीरात  जीवजंतूंचे प्रमाण जास्त आहे . यामुळे ईस्लामने  याला खाण्यांस,पाळण्यांस बंदी घातली आहे, "हराम" केले आहेत.

सृष्टीच्या निर्मित्याने नैसर्गिक रित्या जे पदार्थ प्राणी,पक्षी वनस्पतीचे अन्नधान्य म्हणून वापरले जाते अशा सर्वांची पैदास ही असंख्य प्रमाणात होत असते, जे हिंस्र प्राणी,पक्षी किटक असतात त्यांची पैदास कमी प्रमाणात होते,हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नियम ही असू शकतो.असो.अशा विविध शास्त्रांच्या कसोटीवर तपासून सिध्द झालेले ईस्लामी धारना, संहीता,संस्कृती ने जग आश्चर्यचकित होत असते. "हलाल" विश्वासावर व त्यांच्या गॅरंटीवर जग विश्वास करु राहील्याने जगात अनेक देशांमध्ये हलाल केलेल्या वस्तुंना अतिशय मागणी असल्याने तेथील स्थानिक व मल्टी नॅशनल कंपन्या या असंख्य प्रमाणात फुड, अन्नधान्य उत्पादन व विक्रीमधे उतरले आहेत.युरोपीयन युनीयन अमेरिकन देश,इंग्लंड,फ्रान्स, जर्मनी,रशिया अशा अनेक देशांमध्ये तेथील शॉपिंग मॉलमध्ये  "हलाल" प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत व त्यांना मागणीही फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या प्रत्येक अन्नधान्य उत्पादनाच्या प्रोडक्ट,डब्ब्यावर बॉक्सवर  लिहिले असते " ईट इज ए हलाल " यह हलाल है "  व काही मल्टी नॅशनल कंपन्यांनी काही हराम मालाच्या प्रोडक्टच्या, डब्यांवर,बॉक्सवर प्रामाणिकपणे " यह हराम है " " ईट इज हराम "  .असे भावनिक आवाहन "साद" लिहून आपल्या प्रामाणिक पणाची ग्वाही देऊन शॉपिंग मॉलमध्ये भरपूर प्रमाणात विक्री केली आहे. यामध्ये काही भेसळयुक्त पदार्थ विकणारे विक्रेते यांनीही भेसळयुक्त हलाल पदार्थ विकण्यास सुरुवात केली आहे, त्यांची विक्री जास्त व्हावी म्हणून "हलाल' पदार्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, उदा. हलाल पदार्थांमधे मौलवी, मुस्लिम समाज आपल्या थुंकी टाकून विकतात हा आरोपकरुन बदनाम करीत आहेत परंतू ईस्लाम अशा विपरीत व अंधश्रद्धा प्रथेला कायमच विरोध करत आला आहे, ईस्लाम अंधश्रद्धा कदापीही मानत नाहीत .मित्रांनो "हलाल" पवित्रच आहेत व "हलाल" पदार्थ खाणे आरोग्यासाठी उत्तमच आहे.-  लेखक - डॉ.सलीम सिकंदर शेख,श्रीरामपूर 9271640014.

श्रीरामपूर -लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख "पवित्र कुराआन मजिद" हे ईमानधारकां (श्रद्धावंत) नों, तुम्ही पवित्र वस्तुंचे सेवन करावे ज्या आम्ही तुम्हाला बहाल केल्या आहेत (सुराहा नं.२ अल -बकरा आ.नं.१७२), व जे काही वैध व विशुद्ध अन्न अल्लाहाने दिले आहेत ते सर्व खा व प्या (सुराहा अल - माईदाह आ.नं.८८),

तसेच पुढे तुमच्या कष्टाच्या कमाईने अल्लाहाच्या मार्गावर हलाल कमाई (इमानदारीने कमावलेली) खर्च करा (सुरह अल - माईदाह आ.नं.८८),

 पुन्हा पुढे हे इमानवंतांनो

तुम्ही शुद्ध पदार्थ खा आणि चांगले कर्म करीत चला,तुम्ही जे काही करतात ते मी चांगले जाणतो ," सुराहा अल - मोमिनून अ.नं.५१).

ईस्लामी धारना व दंड विधाना नुसार प्रत्येक घटनेला,वस्तुला मग ती खाण्याची का असेना ती मग "हलाल"का" हराम" या गोष्टीला फार महत्त्व असते" हलाल  म्हणजेच कष्टाच्या, घामाच्या, प्रामाणिकपणे केलेल्या इमानदारीच्या कमाईने सत्य व्यवसाय,व्यवहार करुन व इस्लामच्या तार्किक पातळीवर प्रत्येक कसोटीवर सत्य,खरे व एकदम शुध्द व त्याबरोबरच शास्त्रीय सायंटिफीक दृष्टीने सिध्द होते ती गोष्ट "हलाल" त्यामध्ये तुमची कमाई ही सत्य बोलून तसेच तुम्ही जिथे काम करता ते तुम्ही ईमानदारीने केलेले आहे का ?,  तुम्ही सरकारी नोकरी ही संपूर्ण जबाबदारीने वेळ देऊन  केली आहे का ,? तराजू ही व्यवस्थितपणे व ज्यांच्याकडुन माल,वस्तू खरेदी करताना ती वाजवी दरात,भावात घेतली की नाही ,? नाही तर तुम्ही त्या व्यावसायिकांची लुबाडणूक तर केली नाही ना ? या सर्व गोष्टींची  खातरजमा करून घेतली का ?, ,जर आशा सर्व पध्दतीने घेतलेल्या व कसोटीला उतरलेले, कमावलेल्या गोष्टीला कमाईला " हलाल " म्हणतात.. आता " हराम " म्हणजेच या विरूद्ध .हलालच्या बिलकुल विरूद्ध .. सर्व कमाई ही बनवाबनवी व बनवाबनवी करून गरीबांचे,मजुरांचे,कष्टकऱ्यांचे हक्क हिरावून, चोरी,डकैत,सट्टा, जुगार,दारु दुकान,खोटे बोलून, नोकरीत असालतर करपशन ( लाच घेऊन)  करुन कमावलेल्या पैशाला "हराम " कमाई  मानली जाते,तसेच ईस्लाम दंड विधान संहितानुसार ज्याला मान्यता देण्यात आली नाही आशा वस्तू ,गोष्टी खाणे -पिणे याला "हराम" खाणे- पिणे म्हणतात.

हल्ली बाजारात,समाजात अपण सोशल मिडियावर बहुतेक ठिकाणी,बहुतांश ग्रुपवर मुस्लिम विरोधी वातावरणातील "हलाल " पदार्थाबद्दल काही विरोधी लोकं हलाल विरूद्ध अपप्रचार करून मुस्लिम विरोधी नाहक वातावरण निर्माण करीत आहेत व  समाजाचे स्वास्थ्य बिघडवत आहेत.

आज पश्चिमेकडे युरोप अमेरिका आणि इंग्लंड व असंख्य देशांत माॉल संस्कृतीने जन्म घेतला आहेत व जगातील सर्वच देशांमध्ये विविध धर्मियांचे लोकं राहतात व जगातील एकही देश असा नाही की फक्त एकच समाज तिथे वास्तव्य करून राहतो,जवळ जवळ प्रत्येक देशात सर्व धर्म समभाव जपणारे लोक आहेत,तर तिथे प्रत्येक देशात नोकरी करणारे,व्यापार व्यवहार करणारे रहात असतात, तर ज्या घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वेळेच नाही,आपल्या वेळेच्या कमतरतेमुळे आशा ठिकाणी तिथे घरी स्वयंपाक करून खाणारे खुप कमी प्रमाणात असतात,तिथे फुड बाजार,शॉपिंग मॉल संस्कृती आहेत त्या शॉपमधे अन्न,फुड बाजारात काही वस्तूवर "हलाल " "हराम" - यह हलाल है " ,ईट ईज ए हलाल"  ईट ईज ए हराम " असं ठिकठिकाणी या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आपल्याला दिसतात हे खुप वर्षांपासून युरोपियन युनियनमधे , अमेरिकेत,इंग्लंडमध्ये चालू आहेत अरेबियन देशाततर ईस्लाम जन्मापासून चालुच होती व आहेत,सध्या आपल्या देशात सुध्दा मोठंमोठ्या शहरांमधील शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना बघायला मिळते.हे पदार्थ फक्त मुस्लिमच खातात असे नाही,हे फार महत्त्वाचे आहे कारण हलाल पदार्थ फार शुद्धपणे विचारपूर्वक बनवलेले पदार्थ असतात, म्हणूनच बहुतेक युरोपियन युनियन,अमेरिकेत जाऊन आलेले दुसऱ्या समाजातील लोकांचीही मागणी हलाल फुड बद्दल वाढलेली आहे,आशा ठिकाणी मल्टी नॅशनल कंपन्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातही भाग घेऊन हलाल अन्नधान्य वितरण करीत आहेत व आपल्या बाजारपेठेतील स्थान बळकट करण्यासाठी विविध जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.तर काही भारतातील छोट्या अन्नधान्य उत्पादन व फुड इंडस्ट्रीतील आघाडीच्या कंपन्या ही बाजारपेठ मिळवून राहीलेले आहे या कंपनींच्या स्पर्धेत काही प्रामाणिक कंपन्या आपला दर्जा स्टेट्स राखून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.

व  काही भेसळ,मिसळ, मिश्रण करण्याऱ्या बाजारातील काही डुपलिकेट कंपन्या राजकीय पक्षांच्या,नेत्यांना आपल्या झाशामधे घेऊन पैसे पुरवून" हलाल" विरोधी वातावरण सोशल मिडियामध्ये निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी उत्तेजित करीत आहेत,परंतू खरे ते खरेच असतं,

मात्र आशा व्यापार,व्यवहार करण्याऱ्या लोकांना प्रेषित मुहम्मद स्व.स्पष्टपणे सांगतात की, जो व्यावसायिक जी वस्तू खराब व भेसळयुक्त आहेत ती वस्तू तुम्ही चांगली सांगून विकल्यास, तर तुम्ही अल्लाहाच्या निराशेच्या गर्तेत सापडलात म्हणून समजा व फरिशते (देवदूत) त्या व्यक्तींवर धिक्कार करतील" .(इबने माजा.२२४७),

(उद्याच्या भाग क्र २ या लेखात कोणकोणत्या वस्तू खाण्यास हलाल व शास्त्रीय कारणं पाहु ...)( क्रमशः ).

लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख

बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर ९२७१६४००१४ - (भाग क्र.१) 


अहमदनगर- ३ खूनप्रकरणात सहभागी असणारा व ८ वर्षापासून मोक्का गुन्ह्यात फरार असणा-या कुख्यात गुंडास पकडण्याची धडकेबाज कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. भरत विठ्ठल एडके (वय ३९, रा. भाईदंर, जिल्हा ठाणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या आरोपीने अनेक गंभीर गुन्हे केले असून, याला पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी झाली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी (दि.१८) आयोजित पञकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके आदिंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनकर मुंढे, सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, सुरेश माळी, रवि सोनटक्केव चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पुणे येथील बिल्डर फैजल खान व बेलवंडी येथील आकाश मापारी खून प्रकारणात सहभागी असणारा व तात्कालीन मुखेड (जि. नांदेड) शिवसेना तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या खून प्रकारणीसह मोक्का गुन्ह्यात आठ वर्षापासून आरोपी भरत एडके हा फरार होता. दि. ३ सप्टेंबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास जामखेड बीड रोडवरील, मोहागावचे शिवारात, अज्ञात ५-६ चोरट्यांनी त्यांचेकडील एक पांढरे रंगाची चारचाकी गाडीमध्ये पाठीमागून येऊन मला व साक्षीदार यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीस आडवी लावून थांबवून रिव्हॉल्वरचा (गावठी कट्टयाचा) धाक दाखवून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन, तुमच्याकडील माल काढा असे म्हणून एका आरोपीने मयत शंकर पाटील माधवराव ठाणेकर, (मुखेड, जि. नांदेड) येथील शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख यांच्या छातीवर गुप्ती सारखे धारदार हत्याराने भोकसून जिवे ठार मारुन ६ लाख ५९ हजार रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इनोव्हा कार दरोडा चोरी करुन चोरुन नेली. या भालचंद्र बापूसाहेब नाईक (वय ५३ रा. पेठवडज ता. कंधार जिल्हा नांदेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३ /२५ व ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन ६ आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी ५ आरोपींना तत्कालीन तपास पथकाने अटक करुन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील ६ लाख ५९ हजार रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. यावेळी गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी भरत एडके हा गुन्हा घडले पासून फरार होता.या तपासकामो स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की,आरोपी भरत एडके हा कोथरुड (जि. पुणे) येथे केटरर्सकडे काम करत आहे. आता गेल्यास तो मिळून येईल. अहमदनगर पथक तात्काळ कोथरुडेला रवाना होऊन आरोपीची माहिती घेतली. आरोपी हा चांदणी चौक, कोथरुड, ( जि. पुणे) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे अहमदनगर पोलिसांनी सापळा लावला. थोडयाच वेळात आरोपी हा संशयीतरित्या फिरताना दिसला. पोलिसांना खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु पोलिस खाक्या दाखविताच त्याने त्याचे नाव व पत्ता तसेच, जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३/२५ व ४/२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) बाबत चौकशी करता त्याने गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. अहमदनगर जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी भरत विठ्ठल एडके हा अहमदनगर जिल्ह्यातील चार गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यात फरार आहे.श्रीगोंदा ९७/२०१५ भादविक ३९४, ३०२, २०१, १०९, ३४१, १२० (ब), ३४ प्रमाणे आरोपी भरत यास ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस हे करीत आहे.आरोपी भरत विठ्ठल एडके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला मोक्का, खून, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे १० गुन्हे दाखल आहेत, असे श्री पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर प्रतिनिधी-चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तर असिफ नासिर शेख (रा. वाळुंज, औरंगाबाद), गुलाब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव ता. नेवासा) हे पसार झाले आहेत. दरम्यान चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली.आरोपींकडून सुमारे 9 लाख 12 हजार रूपये किंमतीचे 172 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत केला आहे. श्रीरामपूर येथील दादासाहेब ज्ञानदेव मरकड (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास केला होता. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. नेवासा परिसरामध्ये चोरी केलेले सोने काही चोरटे विकण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खडका फाटा रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन चोरटे तेथे आले. त्यातील सचिन भोसले याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तर असिफ शेख, गुलाब्या भोसले हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान पोलिसांनी भोसले याच्या ताब्यातून सुमारे 9 लाख 12 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. त्याच्यावर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे जामखेड, सोनई, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर पसार झालेले दोघे आरोपी देखील सराईत असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार सुनील चव्हाण, दत्ता गव्हाणे, मनोहर गोसावी, भाऊसाहेब कुरूंद, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, ज्ञानेश्‍वर शिंदे, शंकर चौधरी, संदीप दरदंले, सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, रोहित येमुल, मयुर गायकवाड, विजय धनेधर, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.

नाशिक प्रतिनिधी-नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत भोंगे लावण्यातही परवानगी घ्यावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे. राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून असून काय प्रतिक्रिया उमटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना भोंगे, ध्वनी प्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करून लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्याचा वापर करावा. सदर आदेश ३ मे २०२२ पासून अंमलात येईल असे परिपत्रक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी जारी केले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे १८ जुलै २००५ चे ध्वनीक्षेपक संबंधी निर्णयाच्या अनुषंगाने मशिदीवरील भोंग्यामधून उच्च स्वरात घोषणांमुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याने ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविण्याकरिता ईशारा दिला आहे.त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सदर अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात असे नमूद केले आहे कि,मनसेला मशिदी समोर हनुमान चालीसा पठणाचा अधिकार नसून फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्याचा सदर प्रयत्न असून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मशिदींच्या १०० मिटर परिसरात ध्वनी क्षेपकाद्वारे अजनच्या पाचही वेळी १५ मिनिट आधी व नंतर हनुमान चालीसा किंवा कुठल्याही प्रकारचे भजन,गाणे किंवा ईतर भोंगे प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.कुणालाही भोंगे वाजवण्यास परवानगी हवी असेल त्यांना ३ मे पर्यंत मुभा देण्यात आली आहे.सदर आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये ४ महिने ते १ वर्षे शिक्षेची तरतूद असून विशेष परिस्थिती मध्ये ६ महिन्यापर्यंत तडीपारीची कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.ध्वनी क्षेपकासाठी आवाज मर्यादा कशी असेल? 1)औद्योगिक क्षेत्र रात्री ७० डेसिबल व दिवसा ७५ डेसिबल. 2)व्यावसायिक क्षेत्र व वाणिज्य क्षेत्र रात्री ५५ डेसिबल,दिवसा ६५ डेसिबल. 3) निवासी क्षेत्र रात्री ४५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल. 4)शांतता परिक्षेत्रात रात्री ४० डेसिबल व दिवसा ५० डेसिबल.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशनजवळील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात काल हनुमान जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.काल पहाटे 4 वाजता एक तालात एक सुुरात भजने व हनुमान चालिसा पठण करण्यात आले. या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोसत्वाचे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. लहू कानडे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, सौ. भारती फंड, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, प्रांताधिकारी अनिल पवार, सौ. सई अनिल पवार, माजी नगरसेवक दिलीप नागरे, रवी पाटील, पोलीस निरीक्षक संजय सानप, श्री. पगारे, हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, काँग्रेेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, कुणाल करंडे, तेजस बोरावके, कुणाल करंडे, चंपालाल फोफळे, चंदू गुप्ता, सुर्यकांत तांबडे, आदिंनी दर्शन घेवून अभिषेक केला.सायंकाळी 5 ते 5.30 वाजता हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. रात्री 8.00 ते 8.30 वाजता श्री महाआरती करण्यात आली होती. पहाटे हनुमान जन्मोत्सवादरम्यान ढोल ताशांच्या गजरात, मंत्रोच्चाराच्या सुरात तसेच फटाक्यांच्या अतिषाबाजीत हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.हनुमान जन्मोत्सवानिमित्त यावेळी स्व. चंद्रप्रकाश खुशिराम गुप्ता यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या भंडार्‍याचा कार्यक्रम गुप्ता परिवाराच्यावतीने काल संध्याकाळी 6 ते 9 या दरम्यान आयोजित करण्यात येवून भाविकांनी त्याचा लाभ घेतला.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री हनुमान ट्रस्ट, हनुमान मंदिर सेवेकरी व भाविकांसह ट्रस्टचे चेअरमन मणिलाल पोरवाल, खजिनदार सुनिल गुप्ता, चंपालाल फोफळे, सुभाष फेगडे, राजेंद डावखर, कल्याण कुंकूलोळ, अरुण गुप्ता, मोहन नारंग, सतिश ताकटे, प्रल्हाद महाराज, आदिनाथ खरात, अगस्ती त्रिभूवन, विष्णू लबडे, महेंद्र नारंग, अनिल छाबडा, पुनित सुनिल गुप्ता, प्रथम गुप्ता, शिवनाथ गुप्ता, रमेश निकम, संजय पांडे, गोस्वामी बंगाली, वाल्मिक राऊत, हरि अछडा, गौरव गुप्ता, बंटी गुलाटी, मनोज थापर, श्रीहनुमान मंदिर खिचडी सेवेकरी मंडळ, हनुमान मंदिर भजनी मंडळ, श्री साईसेवक परिवार, यांनी विशेष परिश्रम घेतले. हनुमान जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget