अहमदनगर- ३ खूनप्रकरणात सहभागी असणारा व ८ वर्षापासून मोक्का गुन्ह्यात फरार असणा-या कुख्यात गुंडास पकडण्याची धडकेबाज कारवाई अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. भरत विठ्ठल एडके (वय ३९, रा. भाईदंर, जिल्हा ठाणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. या आरोपीने अनेक गंभीर गुन्हे केले असून, याला पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी झाली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी (दि.१८) आयोजित पञकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके आदिंसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.ही महत्त्वपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिनकर मुंढे, सपोनि गणेश इंगळे, सफौ राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना भिमराज खर्से, सुरेश माळी, रवि सोनटक्केव चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पुणे येथील बिल्डर फैजल खान व बेलवंडी येथील आकाश मापारी खून प्रकारणात सहभागी असणारा व तात्कालीन मुखेड (जि. नांदेड) शिवसेना तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या खून प्रकारणीसह मोक्का गुन्ह्यात आठ वर्षापासून आरोपी भरत एडके हा फरार होता. दि. ३ सप्टेंबर २०१४ रोजी रात्रीच्या सुमारास जामखेड बीड रोडवरील, मोहागावचे शिवारात, अज्ञात ५-६ चोरट्यांनी त्यांचेकडील एक पांढरे रंगाची चारचाकी गाडीमध्ये पाठीमागून येऊन मला व साक्षीदार यांच्या ताब्यातील इनोव्हा गाडीस आडवी लावून थांबवून रिव्हॉल्वरचा (गावठी कट्टयाचा) धाक दाखवून, लाथाबुक्यांनी मारहाण करुन, तुमच्याकडील माल काढा असे म्हणून एका आरोपीने मयत शंकर पाटील माधवराव ठाणेकर, (मुखेड, जि. नांदेड) येथील शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख यांच्या छातीवर गुप्ती सारखे धारदार हत्याराने भोकसून जिवे ठार मारुन ६ लाख ५९ हजार रु. किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम व इनोव्हा कार दरोडा चोरी करुन चोरुन नेली. या भालचंद्र बापूसाहेब नाईक (वय ५३ रा. पेठवडज ता. कंधार जिल्हा नांदेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३ /२५ व ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करुन ६ आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी ५ आरोपींना तत्कालीन तपास पथकाने अटक करुन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील ६ लाख ५९ हजार रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. यावेळी गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले होते. आरोपी भरत एडके हा गुन्हा घडले पासून फरार होता.या तपासकामो स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की,आरोपी भरत एडके हा कोथरुड (जि. पुणे) येथे केटरर्सकडे काम करत आहे. आता गेल्यास तो मिळून येईल. अहमदनगर पथक तात्काळ कोथरुडेला रवाना होऊन आरोपीची माहिती घेतली. आरोपी हा चांदणी चौक, कोथरुड, ( जि. पुणे) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे अहमदनगर पोलिसांनी सापळा लावला. थोडयाच वेळात आरोपी हा संशयीतरित्या फिरताना दिसला. पोलिसांना खात्री होताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु पोलिस खाक्या दाखविताच त्याने त्याचे नाव व पत्ता तसेच, जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३०/२०१४ भादविक ३९६, ३४९, ३२३, ५०४, ५०६ सह आर्म ॲक्ट ३/२५ व ४/२५ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (II), ३ (२) व ३ (४) बाबत चौकशी करता त्याने गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. अहमदनगर जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी भरत विठ्ठल एडके हा अहमदनगर जिल्ह्यातील चार गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यात फरार आहे.श्रीगोंदा ९७/२०१५ भादविक ३९४, ३०२, २०१, १०९, ३४१, १२० (ब), ३४ प्रमाणे आरोपी भरत यास ताब्यात घेऊन जामखेड पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस हे करीत आहे.आरोपी भरत विठ्ठल एडके हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला मोक्का, खून, खुनासह दरोडा, दरोडा, जबरी चोरी असे १० गुन्हे दाखल आहेत, असे श्री पाटील यांनी सांगितले.

Post a Comment