तसेच पुढे तुमच्या कष्टाच्या कमाईने अल्लाहाच्या मार्गावर हलाल कमाई (इमानदारीने कमावलेली) खर्च करा (सुरह अल - माईदाह आ.नं.८८),
पुन्हा पुढे हे इमानवंतांनो
तुम्ही शुद्ध पदार्थ खा आणि चांगले कर्म करीत चला,तुम्ही जे काही करतात ते मी चांगले जाणतो ," सुराहा अल - मोमिनून अ.नं.५१).
ईस्लामी धारना व दंड विधाना नुसार प्रत्येक घटनेला,वस्तुला मग ती खाण्याची का असेना ती मग "हलाल"का" हराम" या गोष्टीला फार महत्त्व असते" हलाल म्हणजेच कष्टाच्या, घामाच्या, प्रामाणिकपणे केलेल्या इमानदारीच्या कमाईने सत्य व्यवसाय,व्यवहार करुन व इस्लामच्या तार्किक पातळीवर प्रत्येक कसोटीवर सत्य,खरे व एकदम शुध्द व त्याबरोबरच शास्त्रीय सायंटिफीक दृष्टीने सिध्द होते ती गोष्ट "हलाल" त्यामध्ये तुमची कमाई ही सत्य बोलून तसेच तुम्ही जिथे काम करता ते तुम्ही ईमानदारीने केलेले आहे का ?, तुम्ही सरकारी नोकरी ही संपूर्ण जबाबदारीने वेळ देऊन केली आहे का ,? तराजू ही व्यवस्थितपणे व ज्यांच्याकडुन माल,वस्तू खरेदी करताना ती वाजवी दरात,भावात घेतली की नाही ,? नाही तर तुम्ही त्या व्यावसायिकांची लुबाडणूक तर केली नाही ना ? या सर्व गोष्टींची खातरजमा करून घेतली का ?, ,जर आशा सर्व पध्दतीने घेतलेल्या व कसोटीला उतरलेले, कमावलेल्या गोष्टीला कमाईला " हलाल " म्हणतात.. आता " हराम " म्हणजेच या विरूद्ध .हलालच्या बिलकुल विरूद्ध .. सर्व कमाई ही बनवाबनवी व बनवाबनवी करून गरीबांचे,मजुरांचे,कष्टकऱ्यांचे हक्क हिरावून, चोरी,डकैत,सट्टा, जुगार,दारु दुकान,खोटे बोलून, नोकरीत असालतर करपशन ( लाच घेऊन) करुन कमावलेल्या पैशाला "हराम " कमाई मानली जाते,तसेच ईस्लाम दंड विधान संहितानुसार ज्याला मान्यता देण्यात आली नाही आशा वस्तू ,गोष्टी खाणे -पिणे याला "हराम" खाणे- पिणे म्हणतात.
हल्ली बाजारात,समाजात अपण सोशल मिडियावर बहुतेक ठिकाणी,बहुतांश ग्रुपवर मुस्लिम विरोधी वातावरणातील "हलाल " पदार्थाबद्दल काही विरोधी लोकं हलाल विरूद्ध अपप्रचार करून मुस्लिम विरोधी नाहक वातावरण निर्माण करीत आहेत व समाजाचे स्वास्थ्य बिघडवत आहेत.
आज पश्चिमेकडे युरोप अमेरिका आणि इंग्लंड व असंख्य देशांत माॉल संस्कृतीने जन्म घेतला आहेत व जगातील सर्वच देशांमध्ये विविध धर्मियांचे लोकं राहतात व जगातील एकही देश असा नाही की फक्त एकच समाज तिथे वास्तव्य करून राहतो,जवळ जवळ प्रत्येक देशात सर्व धर्म समभाव जपणारे लोक आहेत,तर तिथे प्रत्येक देशात नोकरी करणारे,व्यापार व्यवहार करणारे रहात असतात, तर ज्या घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वेळेच नाही,आपल्या वेळेच्या कमतरतेमुळे आशा ठिकाणी तिथे घरी स्वयंपाक करून खाणारे खुप कमी प्रमाणात असतात,तिथे फुड बाजार,शॉपिंग मॉल संस्कृती आहेत त्या शॉपमधे अन्न,फुड बाजारात काही वस्तूवर "हलाल " "हराम" - यह हलाल है " ,ईट ईज ए हलाल" ईट ईज ए हराम " असं ठिकठिकाणी या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आपल्याला दिसतात हे खुप वर्षांपासून युरोपियन युनियनमधे , अमेरिकेत,इंग्लंडमध्ये चालू आहेत अरेबियन देशाततर ईस्लाम जन्मापासून चालुच होती व आहेत,सध्या आपल्या देशात सुध्दा मोठंमोठ्या शहरांमधील शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करताना बघायला मिळते.हे पदार्थ फक्त मुस्लिमच खातात असे नाही,हे फार महत्त्वाचे आहे कारण हलाल पदार्थ फार शुद्धपणे विचारपूर्वक बनवलेले पदार्थ असतात, म्हणूनच बहुतेक युरोपियन युनियन,अमेरिकेत जाऊन आलेले दुसऱ्या समाजातील लोकांचीही मागणी हलाल फुड बद्दल वाढलेली आहे,आशा ठिकाणी मल्टी नॅशनल कंपन्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगातही भाग घेऊन हलाल अन्नधान्य वितरण करीत आहेत व आपल्या बाजारपेठेतील स्थान बळकट करण्यासाठी विविध जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.तर काही भारतातील छोट्या अन्नधान्य उत्पादन व फुड इंडस्ट्रीतील आघाडीच्या कंपन्या ही बाजारपेठ मिळवून राहीलेले आहे या कंपनींच्या स्पर्धेत काही प्रामाणिक कंपन्या आपला दर्जा स्टेट्स राखून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.
व काही भेसळ,मिसळ, मिश्रण करण्याऱ्या बाजारातील काही डुपलिकेट कंपन्या राजकीय पक्षांच्या,नेत्यांना आपल्या झाशामधे घेऊन पैसे पुरवून" हलाल" विरोधी वातावरण सोशल मिडियामध्ये निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी उत्तेजित करीत आहेत,परंतू खरे ते खरेच असतं,
मात्र आशा व्यापार,व्यवहार करण्याऱ्या लोकांना प्रेषित मुहम्मद स्व.स्पष्टपणे सांगतात की, जो व्यावसायिक जी वस्तू खराब व भेसळयुक्त आहेत ती वस्तू तुम्ही चांगली सांगून विकल्यास, तर तुम्ही अल्लाहाच्या निराशेच्या गर्तेत सापडलात म्हणून समजा व फरिशते (देवदूत) त्या व्यक्तींवर धिक्कार करतील" .(इबने माजा.२२४७),
(उद्याच्या भाग क्र २ या लेखात कोणकोणत्या वस्तू खाण्यास हलाल व शास्त्रीय कारणं पाहु ...)( क्रमशः ).
लेखक- डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल,श्रीरामपूर ९२७१६४००१४ - (भाग क्र.१)
Post a Comment