अहमदनगर प्रतिनिधी-चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तर असिफ नासिर शेख (रा. वाळुंज, औरंगाबाद), गुलाब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव ता. नेवासा) हे पसार झाले आहेत. दरम्यान चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्र परिषदेत दिली.आरोपींकडून सुमारे 9 लाख 12 हजार रूपये किंमतीचे 172 ग्रॅम सोन्याचे दागिणे हस्तगत केला आहे. श्रीरामपूर येथील दादासाहेब ज्ञानदेव मरकड (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा मोठा मुद्देमाल लंपास केला होता. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. नेवासा परिसरामध्ये चोरी केलेले सोने काही चोरटे विकण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खडका फाटा रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तीन चोरटे तेथे आले. त्यातील सचिन भोसले याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या तर असिफ शेख, गुलाब्या भोसले हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान पोलिसांनी भोसले याच्या ताब्यातून सुमारे 9 लाख 12 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे. त्याच्यावर आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे जामखेड, सोनई, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर पसार झालेले दोघे आरोपी देखील सराईत असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार सुनील चव्हाण, दत्ता गव्हाणे, मनोहर गोसावी, भाऊसाहेब कुरूंद, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, संदीप दरदंले, सचिन आडबल, विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, रणजित जाधव, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, रोहित येमुल, मयुर गायकवाड, विजय धनेधर, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.

Post a Comment