नाशिक प्रतिनिधी-नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्वच धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत भोंगे लावण्यातही परवानगी घ्यावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे. राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागून असून काय प्रतिक्रिया उमटत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना भोंगे, ध्वनी प्रक्षेपण यंत्र लावण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज करून लेखी मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतरच त्याचा वापर करावा. सदर आदेश ३ मे २०२२ पासून अंमलात येईल असे परिपत्रक पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी जारी केले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे १८ जुलै २००५ चे ध्वनीक्षेपक संबंधी निर्णयाच्या अनुषंगाने मशिदीवरील भोंग्यामधून उच्च स्वरात घोषणांमुळे सार्वजनिक शांतता भंग होत असल्याने ३ मे २०२२ पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरविण्याकरिता ईशारा दिला आहे.त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी सदर अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशात असे नमूद केले आहे कि,मनसेला मशिदी समोर हनुमान चालीसा पठणाचा अधिकार नसून फक्त सामाजिक तेढ निर्माण करण्याचा सदर प्रयत्न असून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मशिदींच्या १०० मिटर परिसरात ध्वनी क्षेपकाद्वारे अजनच्या पाचही वेळी १५ मिनिट आधी व नंतर हनुमान चालीसा किंवा कुठल्याही प्रकारचे भजन,गाणे किंवा ईतर भोंगे प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.कुणालाही भोंगे वाजवण्यास परवानगी हवी असेल त्यांना ३ मे पर्यंत मुभा देण्यात आली आहे.सदर आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामध्ये ४ महिने ते १ वर्षे शिक्षेची तरतूद असून विशेष परिस्थिती मध्ये ६ महिन्यापर्यंत तडीपारीची कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.ध्वनी क्षेपकासाठी आवाज मर्यादा कशी असेल? 1)औद्योगिक क्षेत्र रात्री ७० डेसिबल व दिवसा ७५ डेसिबल. 2)व्यावसायिक क्षेत्र व वाणिज्य क्षेत्र रात्री ५५ डेसिबल,दिवसा ६५ डेसिबल. 3) निवासी क्षेत्र रात्री ४५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल. 4)शांतता परिक्षेत्रात रात्री ४० डेसिबल व दिवसा ५० डेसिबल.

Post a Comment